DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणाकरीता आर्थिक मदत अर्ज करण्याचे आवाहन कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना अनुदान अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित

पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणाकरीता आर्थिक मदत 

अर्ज करण्याचे आवाहन

    कोविड महामारीमुळे बालकांनी आईवडील किंवा दोन्ही पालक गमावलेले आहेत अशा १८ वर्षा खालील बालकांच्या शालेय शुल्क, वसतीगृह व शालेय साहित्य खरेदीकरीता आर्थिक मदत दिली जाणार आहे. पात्र गरजू बालकाच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले.
 
            पालक गमावलेल्या बालकांकरीता महिला व बाल विकास विभागाव्दारे विविध योजनेचा लाभ दिला जातो. त्याअंतर्गत पालक गमावलेल्या बालकाच्या आर्थिक मदतीकरीता बाल न्याय निधी उपलब्ध झाला आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता तालुक्यातील मिशन वात्सलय समितीतील सदस्य सचिव, बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुका संरक्षण अधिकारी यांच्याकडे आवश्य कागदपत्रासह अर्ज करावा. जिल्हा कृती दलामार्फत अर्जाची तपासणी करुन गरजु बालकांना लाभ दिला जाणार आहे. बाल न्याय निधीव्दारे कोविडमुळे अनाथ व निराधार झालेल्या बालकांना शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक साहित्यसाठी मदत केली जाणार आहे. त्यामुळे गरजु बालकांनी त्वरीत अर्ज दाखल करावा. अधिक माहितीकरीता जिल्हा बाल संरक्षणक कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.
कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना अनुदान अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित

कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना अनुदान;





अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित

    कोविड १९ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तिंच्या निकट नातेवाईकांना ५० हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपत्ती व मदत पुनर्वसन विभागाने शासन निर्णयही निर्गमित केला आहे. त्यानुसार शासनाने अर्जदारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन वेब पोर्टल विकसित केले आहे, त्यावर मयत व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकास कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करता येईल.त्या संकेतस्थळावर अर्जदारांनी अर्ज करावा, 
कोविडमुळे मृत व्यक्तिंच्या निकट नातेवाईकांस सानुग्रह अनुदान
लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अकोला,दि.१५(जिमाका)- कोविड १९ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तिंच्या निकट नातेवाईकांना ५० हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने विकसित केलेल्या पोर्टलवर कोविड मुळे मृत पावलेल्या व्यक्तिंच्या नातेवाईक, वारसांनी लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती-
 
त्यासाठी अर्जदाराने CLICK HERE या संकेतस्थळावर लॉग ईन करणे आवश्यक आहे. त्यासाठी 
CLICK HERE यावर लिंक देण्यात आली आहे. अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे आधार कार्ड (पीडीएफ, जेपीजी), मृत्यू प्रमाण पत्र(पीडीएफ, जेपीजी), अर्जदाराचा आधार संलग्न बॅंक खाते क्रमांक, अर्जदाराने खाते कमांक दिलेल्या बॅंक खात्याचा रद्द केलेला धनादेश (पीडीएफ, जेपीजी),आणि रुग्णालयाचा तपशिल आरटीपीसीआर रिपोर्ट, सीटी स्कॅन रिपोर्ट किंवा ज्यावरुन त्या व्यक्तीस कोविड १९ चे निदान झाले असे कागदपत्र (पीडीएफ, जेपीजी), तसेच कुटुंबातील सर्व वारसांचे हमीपत्र व स्वयंघोषणा पत्र अपलोड करावे. या कागदपत्राच्या आधारे अर्जदाराला स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून सहाय्य मिळविण्यासाठी लॉग ईन करता येईल
.
अर्ज सादर करण्याबाबत आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती CLICK HERE वर Document Required या टॅब वर उपलब्ध आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात सानुग्रह सहाय्य निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती-

मार्गदर्शक व्हिडिओ बघा 



त्यासाठी अर्जदाराने 


 या संकेतस्थळावर लॉग ईन करणे आवश्यक आहे. त्यासाठी

 यावर लिंक देण्यात आली आहे. अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशिल जसे मृत्यू प्रमाण पत्र आणि रुग्णालयाचा तपशिल या कागदपत्राच्या आधारे त्याचा स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून सहाय्य मिळविण्यासाठी लॉग ईन करता येईल. अर्ज सादर करण्याबाबत आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती 


वर Document Required या टॅब वर उपलब्ध आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात सानुग्रह सहाय्य निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

कोविड-19 आजाराने मृत्यु पावलेल्यांच्या  वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान
कोविड-19 आजाराने मृत्यु पावलेल्यांच्या 
वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान

GR DOWNLOAD pdf 

कोविड 19 आजारामुळे निधन सानुग्रह सहाय्य प्रदान
मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोविड-१९ या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास ₹ ५०,०००/-(रू.पन्नास हजार) सानुग्रह सहाय्य प्रदान करणेबाबतचा शासन निर्णय..


वाशिम, दि. २१ (जिमाका) : कोविड-19 या आजाराने मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार एवढे सानुग्रह अनुदान देण्याबाबत सर्वोच्च न्ययालयाने आदेश दिले असून, त्याच अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार ही मदत मिळणार आहे. 50 हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, वाशिम, जिल्हा नियंत्रण कक्ष (आपत्ती व्यवस्थापन प्रभाग), दुसरा मजला, वाशिम-444505 संपर्क क्रमांक 07252-234238, 8379929414 आणि ई-मेल आयडी rdcwashim@gmail.com असा आहे. जिल्हाधिकारी, वाशिम हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहे. मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती लवकरच अधिसुचित करण्यात येणार आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी कळविले आहे.      

सविस्तर पत्र वाचा 

 


हेही वाचा 

कोविड विमा मंजूर रक्कम Covid-19 Insurance

हे हि वाचा 


कोविड आजाराचे २१ मे २०२० किंवा त्यापासून पुढच्या दिनांकाचे बिल निघू शकतात याबाबत शासन निर्णय. दि ३० एप्रिल २०२१  


शासन आदेशान्वये खाजगी हाॅस्पिटलने घ्यावयाचे बील चार्जेस शासनआदेशान्वये खाजगी रूग्णालयाने कोविड१९च्या अॅडमिट पेशंट कडून  खालील प्रमाणे बील आकारण्याचे आदेश दिलेले आहेत.यापेक्षा जास्त बील आकारणार्‍या हाॅस्पिटलवर कारवाई होईल

शासकीय कर्मचारी सेवेत असताना १० वर्षे शासन सेवा होण्यापूर्वी मृत्यू पावल्यामुळे सानुग्रह अनुदान मंजुरीचा शासन निर्णय

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon