माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा एप्रिल मे २०२१ ही दहावीची परीक्षा कोरोना - १९ च्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारे रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याचे परिपत्रक सुद्धा महाराष्ट्र शासनाने काढले आहे.बोर्डामार्फत आजच ( दि.२जून २०२१ ) त्याबाबत कार्यालयीन परिपत्रक काढण्यात आले आहे , त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की श्रेणी विषयाची परीक्षा तोंडी परीक्षा आपल्याला आपल्या शाळा स्थरावर घ्यायचे आहे त्याचे मार्गदर्शक तत्वे या परिपत्रकात दिलेली आहे त्यानुसार आपल्याला कार्यवाही करायची आहे ,आता नवीन पद्धती नुसार आपल्याला त्या विद्यार्थ्यांचे श्रेणी विषयाचे मूल्यमापन कसे करायचे आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊया.
आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाचे मूल्यमापन -
विद्याथ्र्यांसाठी असलेले आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाची परीक्षा दोन्ही सर्वात न घेता एकाच म्हणजे दिवतीय सत्रात घ्यावी. प्रात्यक्षिक व लेखन कार्य प्रत्येकी ५० गुणांची परीक्षा घेऊन मिळालेल्या १०० गुणांपैकी प्रचलित पदधतीनुसार श्रेणी देण्यात यावी.
दर वर्षी आपण १० वी च्या नियमित मूल्यांकन पध्दत अश्या
प्रकारे करत होतो
प्रात्यक्षिक कार्य - ५० गुण
लेखन कार्य - ५० गुण
प्रात्यक्षिक कार्य - ५० गुण
लेखन कार्य - ५० गुण
याप्रमाणे परीक्षा घेऊन
प्रथम सत्र - 100 गुण
द्वितीय सत्र - 100 गुण
एकूण - 200 गुण
रूपांतरित - 100 गुणा
मध्ये रुपांतरीत करत होतो
प्रथम सत्र
दिवतीय सत्र
परंतु या वर्षी आपल्याला एकच परीक्षा घायची आहे
प्रात्यक्षिक कार्य - ५० गुण
लेखन कार्य - ५० गुण
एकूण गुण - १०० गुण
आणि या 100 गुणांच्या आधारे त्यांना श्रेणी द्यायची आहे !
ज्या विद्यार्थ्यांचे लेखन कार्य अपूर्ण राहिले आहे त्यांचेकडून उशिरात उशिरा १० जूनपर्यंत जमा करून घ्यावे.
प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अभ्यासक्रमानुसार १० घटकांपैकी कोणत्याही ०५ घटकांची निवड करावी. दिव्यांग विद्यार्थ्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा न घेता लेखन कार्य पूर्ण करून घ्यावे व प्रचलित पद्धतीनुसार त्यांना श्रेणी (H) देण्यात यावी.
सदर विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा व लेखन कार्य इ. घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित माध्यमिक शाळांना राहिल. त्यामुळे सदर परीक्षेचे शालेय स्तरावर आयोजन करून त्याचे मूल्यांकन विभागीय मॅडळाकडे जमा करावे.
कोविड-१९ ची परिस्थिती पाहता सर्व शासन नियमांचे पालन करुन मुख्याध्यापक शिक्षकांनी परीक्षेचे आयोजन करावे. संबंधित विषय
१० वी परीक्षा मार्गदर्शक सूचना :-
कमीत कमी विद्याथ्र्यांच्या बॅचेस करून शारीरिक अंतर ठेवून गटागटाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात याव्यात. कॉमन साहित्याचा वापर टाळून वैयक्तिक स्वरूपाच्या क्षमता प्रात्यक्षिके घेण्यात यावीत.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रात्यक्षिक परीक्षेसाठी लागणारे शक्य होईल ते साहित्य विद्याथ्र्यांनी स्वतः आणण्याचा प्रयत्न करावा. उदा. स्किपिंग रोप, योगा मॅट / सतरंजी इ.
हेही वाचा
इयत्ता - दहावी मूल्यमापन २०२०-२१ बोर्डाने जाहीर केल्या प्रमाणे करावयाचे गुणपत्रक मूल्यमापन तक्ता
इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचे ‘असे’ होणार मूल्यांकन
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon