DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

I hear and I forget. I see and I remember. I do and I understand


    अध्ययन अध्यापन मूल्यमापन हे शिक्षणाचे अविभाज्य अंगे आहेत मूल्यमापन हे सर्वसमावेशक असायला हवे सर्वसमावेशक मूल्यमापनासाठी एकाच प्रकारच्या मूल्यमापन साधनाचा उपयोग करून चालत नाही विद्यार्थ्यांची विविधांगी प्रगती झालेली असते तिचे सम्यक चित्र हवे असल्यास विविध मूल्यमापन तंत्राचा वापर करावा लागतो

“I hear  and I forget. 

I see and I remember. I do and  I understand.”

     या उक्तीप्रमाणे कृतीयुक्त अभ्यासावर आमचा शिक्षकमित्रांचा नेहमीच विश्वास आहे परंतू आजच्या मूल्यमापन पद्धतीत संख्यात्मक गुण / मार्क्स मिळविण्याला प्राधान्य दिल्या जाते चाचणी मधले फक्त मार्क्स बघून आपली प्रगती होणे शक्य नाही.महत्वाचे हे आहे की, जी उत्तरे चुकली त्यांचे उत्तरे पाठ्यपुस्तकात पुन्हा - पुन्हा पाहून का चुकलो ते शोधणं.पैकीच्या पैकी गुण मिळविण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे की,कालच्या तुलनेत मी आज चांगले केले का ?,मी आज कोठे आहे ?

सन २०-२१ या वर्षी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी हे शाळा व शिक्षक न बघता पुढील वर्गात वर्गोनत / प्रवेशीत झाले. ही खूप गंभीर बाब आहे.

     गेली वर्षभर झाले शाळा बंद आहेत अजूनही शाळा कधी सुरू होतील याची कोणीही भाकित करू शकत नाही शिक्षकाने विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकलेली नाही शिक्षण क्षेत्रात अनिश्चिततेचे वातावरण आहे आरोग्य क्षेत्राकडे केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम देश भोगत आहे कोरोनामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडत आहेत शिक्षण क्षेत्रातही सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत आहे त्यामुळे कित्येक पिढ्या बरबाद होणार आहेत.

    अहो, अशिक्षीत पालकही या गोष्टीला मान्य करत नाही परंतू "कळते पण वळत नाही" अशी अवस्था पालकांची कोरोणामुळे झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत पालक वर्ग जरी हवालदिल झाला असेल, पण आपण सर्व बुद्धीजीवी वर्ग असेच हातावर हात देऊन बसलो तर मग या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना न्याय कोण देणार शिक्षणाच्या बाबतीत अनेक शिक्षणतज्ञ आहे पण हे सुद्धा गप्प बसले आहे, कुणीच काही बोलायला तयार नाही. देशाच्या प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाचा कणा म्हणजे शिक्षण आहे.कोरोनामुळे शिक्षणाची खुप गंभीर अवस्था झाली आहे. याचा गांभीर्याने विचार होतो का? मग या देशातील भावी उज्वल भविष्याचे काय?
  
    लोक आरक्षणासाठी रस्त्यावर यायला तयार आहेत, व्यावसायिक व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आंदोलन करत आहेत. नेते निवडणूकीसाठी रस्त्यावर सभा घेत आहेत. प्रत्येक जण आपापल्या स्वार्थासाठी सर्वकाही करत आहे. परंतु या देशातील भावी पिढीला शिक्षण कसे मिळेल ? यासाठी कुणीच पुढे येत नाही. काय होणार या चिमुकल्यांच्या भविष्याचं ? आजची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कायदा, सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासन व पोलिस ज्याप्रमाणे आपले काम चोखपणे बजावत आहे तसेच आरोग्य विभागातील प्रशासन, तज्ञ डॉ. परिचारिका, सेवक  जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार आपले कार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाने सुद्धा आपली भुमिका सिद्ध करण्याची ही खरी वेळ आहे.आपल्याला या परिस्थितीवर मात करायची असेल तर चिंता, निराशा किंवा भितीमुळे पांगळे होण्याची ही वेळ नाही मग यासाठी शिक्षण विभाग, शिक्षणतज्ञ, राज्य शैक्षणिक संशोधन मंडळ आणि सर्व शिक्षक यांनी समोर आले पाहिजे. विद्यार्थी अध्ययन व अध्यापन प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी नवनविन उपक्रम व उपाययोजना संकल्पना आखल्या पाहिजेत.

मुलांना शिकण्यासाठी सुलभ वातावरण निर्माण करायचे  आहे

       जे॑व्हा औपचारिक शिक्षण बंद होते ते॑व्हा परिसरातले अभ्यासू उत्साही पालक ताई-दादा मावशी काका स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतात व अनौपचारिक शिक्षण सुरू करतात व मुलांना ज्ञानरचना करायला सुलभ करतात शेवटी मुलांना आपल्याला केवळ शिकवायचे नसून मुलांना शिकण्यासाठी सुलभ वातावरण निर्माण करायचे आहे

       ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अपुऱ्या सोई सुविधेच्या कमतरते अभावी ऑनलाईन शिक्षण हा उपक्रम फारसा प्रभावी वाटत नाही. शिक्षण तज्ञांच्या सल्ल्याने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची आवश्यकता आज निर्माण झाली आहे. कोरोना परिस्थितीतही तळागाळातील ग्रामीण भागातील गरिब, वंचित, मजुर, शेतकरी, आदिवासी  या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी व शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागावर खुप मोठी जबाबदारी आहे व ती परिपुर्ण होण्यासाठी मोठे पाऊल उचलणे गरजेचे आहे. आज शाळेत हजेरीवर विद्यार्थी नाव नोंदणी जरी झाली असेल तरी तो शाळेत शिक्षण मिळत नसल्याने शाळाबाह्यच आहे. परिस्थिती कठीण असेल तेंव्हा निराश न होता स्वतःच समस्या निर्माण करण्यास सुरुवात करू नये, त्याऐवजी आपण जागृत होऊन उपायाचा एक भाग म्हणून स्वतःला समर्पित केले पाहिजे. "शिक्षक जेंव्हा ज्ञानाच्या रंगात रंगतो तेवढाच तो कर्माच्या रंगातही शोभून दिसतो". तुमची सर्जनशीलता ही भावी पिढीला नवीन विचार व्यक्त करण्यास भाग पाडते.सध्याच्या परिस्थितीत सर्वात महत्त्वाची भुमिका ही आता शिक्षकांची आहे. शिक्षक हा शिक्षणाचा महत्वाचा कणा आहे. ज्याप्रमाणे कोरोना काळातही डॉ. परिचारिका ह्या दवाखान्यात प्रामाणिकपणे आपली सेवा देत आहे. त्याचप्रमाणे एक सामाजिक बांधिलकीची जाणीव लक्षात घेऊन आपल्या ज्या चिमुकल्यांच्या समोर आपण आदर्श आहोत त्या शाळेतील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मनापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे.पगारापुरते नव्हे तर त्यापलीकडे जाऊन माणूसकीच्या नात्याने ध्येयवेडे होऊन आपल्या शाळेतील चिमुकल्यांना आवश्यक शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेणे हे प्रत्येक शिक्षकाचे कर्तव्य आहे.कोरोना परिस्थितीला घाबरून जाऊन स्वतःच्या सर्जनशील विचारांची आहुती देऊ नका. कारण शिक्षकाचे विचार व कृती ही अमुल्य आहे, ती अतुल्य भारत निर्माण करण्यासाठी आहे हे विसरून चालणार नाही. लक्षात ठेवा सकारात्मक व आशावादी व्यक्ती योग्य आणि दुरगामी परिणामाचे निर्णय घेतात. "उत्कृष्ट कार्य करण्यासाठी माणसाची आर्थिक स्थिती महत्वाची नसते तर त्याची मानसिक स्थिती महत्वाची असते" सध्या सकारात्मक मानसिकतेची गरज आहे.या परिस्थितीत आपण आपल्या शाळेतील चिमुकल्यांना काय देतो? याचा अंदाज आपल्या मानसिकतेतून व विचारावरून सिध्द होतो आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम

      शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०१५-१६  मध्ये एक शासन निर्णय काढला होता या परिपत्रकानुसार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची घोषणा केली होती भाषा व गणित या विषयाचा राज्यभर तीन परीक्षा घेण्याचे सूतोवाच केले होते विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीचा हा अनोखा प्रयोग राज्यभर राबविण्यात आला आदिवासी पाडा पासून ते भौतिक व आर्थिक दृष्ट्या परिपूर्ण शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकाच प्रकारची परीक्षा घेण्यात आली यातून सुरू झालेली स्पर्धा ही शिक्षणाला मारक ठरले पेपर फुटू लागले शिक्षकांच्या हातात पेपर येण्याअगोदरच झेरॉक्स मशीन वर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका मुलांना विकत मिळू लागल्या आपलं मूल मागे पडू नये यासाठी पालकांनी मुलांच्या या गोष्टींना पाठबळ दिलं काही ठिकाणी सामूहिक कॉपी प्रकार सुरू झाला शिक्षकांना खोटे आकडे भरावी लागली कारण आपल्या क्षेत्रातील शाळा मागे पडू नये अशी अधिकाऱ्याची धारणा होती त्यामुळे गुणांचा प्रचंड फुगवटा झाला या परीक्षांमुळे शाळांचे  स्वतःचे वेळापत्रक कोलमडलं विद्यार्थ्यांना ही परीक्षा झाली की ती परीक्षा केवळ परीक्षेच्या चक्रात अडकवलं यातील फोलपणा लक्षात यायला किती वर्षे गेली केवळ प्रिंटिंग साठी या सगळ्या गोष्टी केल्याने वृत्तपत्रांमध्ये वाचण्यात आले शेवटी शिक्षण विभागाला हा कार्यक्रम गुंडाळून ठेवावा लागला

    कोरोना महामारीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अशा अडचणीच्या वेळी मदत करणे हे आपले परम कर्तव्य आहे.आपल्याजवळ जे काही ज्ञान तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते अशा या बिकट परिस्थितीच्या वेळी बाहेर काढून विद्यार्थ्यांना पोचविण्यास मदत करावी ज्ञान दिल्याने ते कमी न होता उलट वाढतच जात असते अन्यथा ही पिढी दहा वर्षे मागे गेल्याशिवाय राहणार नाही.

मुलाचं मूल्यमापन हे केवळ लेखी परीक्षेतून कसं कळेल

     महाराष्ट्रात सर्व मुलांची मातृभाषा मराठी अथवा शालेय भाषा नाही काही मुलांना मराठी ही इंग्रजी एवढीच परकी आहे जवळपास विविध पन्नास च्या वर  भाषा महाराष्ट्रात बोलल्या जातात मुलांना बोली भाषेपासून शालेय भाशे पर्यंत आणण्याचे दिव्य शिक्षकांना पार पाडावे लागते अनेक मुलांना शाळेपर्यंत आणि शाळेत आलेल्या मुलांना टिकवून ठेवणे ही गोष्ट सामान्य नाही शिवाय त्याच्या कलाने त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकविणे सोपी गोष्ट नाही प्रत्येक मूल हे एक आव्हान असते सर्व मुलांच्या बौद्धिक क्षमता या सारख्या नसतात त्या मुलाचं मूल्यमापन हे केवळ लेखी परीक्षेतून कसं कळेल राज्य पातळीवरून एकाच साच्यातल्या मूल्यमापन हे झापडबंद शिक्षणाला प्रोत्साहन देणारे ठरेल शिक्षकांना चौकटीबाहेरचे पुस्तका बाहेरचं शिक्षण देण्यावर मर्यादा घालणारे ठरेल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाला खीळ बसणारे ठरेल गुण म्हणजे गुणवत्ता हे समीकरण होईल म्हणजे गुणवत्ता याचे अवडंबर माजेल यासर्व गोष्टी अनुभवलेले आहे कुणाच्या हव्यासामुळे जीवघेण्या स्पर्धा सुरू झाले आहेत अनेक कोवळ्या मनाच्या मुलांनी आत्महत्या केल्या शेवटी गुणवत्ता यादी रद्द झाली आठवीपर्यंत गुणांऐवजी श्रेणी देण्यात आली असताना पुन्हा एकदा गुणाचे महत्त्व वाढवले जात आहे त्यासाठी शिक्षकांच्या पगाराचा वेतनवाढी ला जबाबदार धरण्यात येणार आहे माध्यमिक स्तरावर प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक शिकवत असतो विद्यार्थ्यांची प्रत्येक विषयातील गती वेगळी असते त्यामुळे शिक्षकांचे मूल्यमापन कसे होणार हे शिक्षकाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी निकोप नाही एक तर माध्यमिक शाळेत दहा टक्के लोकांनाच मुख्याध्यापक पद मिळते संपूर्ण सेवे मध्ये केवळ एकदा वरिष्ठ वेतन श्रेणी मिळते २०टक्के लोकांनाच निवड श्रेणी मिळते त्यासाठी किचकट अटी आणि शर्ती आहेत आहेरे वर्गातील मुलांना शिकवणारे शिक्षक व नाहिरे वर्गातील मुलांना शिकवणारे शिक्षक यांच्यात फार मोठी तफावत आहे या वर्गातील मुलांसाठी चॅलेंजेस ही वेगवेगळी आहेत सर्वांना एकाच तराजूत तोलण्याचा अट्टाहास सोडून देण्यात यावा गुणवत्ता वाढीचा नावाखाली शिक्षकांचे पगार आणि तुटपुंजी मिळणारी वेतन वाढ यावर डोळा ठेवू नये कित्येक शाळांच्या शिक्षकांनी स्वतःचे पैसे खर्च करून लोकांकडून पैसे जमा करून शाळा  पुनर्जीवित केल्या आहेत कित्येक शिक्षक स्व वेतनातून शाळा चालवत आहेत शाळेचे लाईट बिल व मेंटेनन्स स्वतः वर्गणी काढून भरताहेत मुलांना गणवेशापासून प्रवासापर्यंत चा खर्च करत आहे स्वतः तंत्रकुशल नसतांना गेली वर्षभर स्वतःचे मोबाईल लॅपटॉप व नेटचा वापर करून स्वतः शिकून मुलांना शिकवत आहेत या सरकारने काय केले प्रशिक्षणही सर्व शिक्षकांना दिले नाही शिक्षकांनी मुलांना घरी जाऊन स्वखर्चाने स्वाध्याय पत्रिका काढून त्याच्या झेरॉक्स करून वाटल्या परंतू शिक्षणात खंड पडू दिला नाही व कोव्हीड काळात शिक्षकांनी लाखो रुपये जमा करून गरज असेल तेथे कोव्हीड सेंटर उभे केले राज्यातील  प्रत्येक संकटाशी शिक्षक विनाअट लढताहेत शैक्षणिक कामाचे ओढ्यात शिक्षक पिचलेला आहे शिक्षण विभाग महसूल विभागाचा कर्मचारी झालेला आहे महसूल विभागातील एक साधा लिपिक  शिक्षकांना अपमानित करत आहेत अटकेच्या धमक्या देत आहेत हे सगळे सहन करत व आपल्या वर्गातील मुलांसाठी पूर्ण क्षमतेने ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहे मानसिक रित्या खचलेल्या शिक्षकांना मानसिक आधार देण्याची गरज आहे त्याला पूर्णवेळ वर्गात मुलांना शिकवू द्यायला हवं त्यांच्यावर विश्‍वास ठेवायला हवा शिक्षकांचा आर्थिक व सामाजिक सन्मान राखला जायला हवा नाहीतर पुन्हा एकदा चुकीचा पायंडा पडू शकतो विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्याची फक्त गुणाची सुरू झालेली स्पर्धाच आपल्याला दिसेल.

     विद्यार्थी संख्येचा व शिक्षणाच्या ज्ञानशाखांचा विस्फोट झालेला आहे ते पाहता हे काम करणे एवढे सोपे नसून एकट्याचे तर नाहीच नाही.

हे हि वाचा 

  विद्यार्थ्यांच्या परीक्षेतीलकामगिरीनुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्याची योजना राबविण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणप्रणालीची ३० कोटी ची निविदा वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon