DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

थॉमस अल्वा एडिसन : प्रश्नमंजुषा Thomas Alva Edison Quiz

थॉमस अल्वा एडिसन : प्रश्नमंजुषा Thomas Alva Edison Quiz

संशोधक थॉमस अल्वा एडिसन जन्मदिन
जन्म - ११ फेब्रुवारी १८४७ (अमेरिका)
स्मृती - १८ ऑक्टोबर १९३१
प्रश्न मंजुषा 
● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा

    थॉमस अल्वा एडिसन याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादीं सारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत. जेव्हा आपण दिवा लावण्या करिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच.
    ११ फेब्रुवारी १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झाला. तो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय 'ढ' आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली.
    एडिसन घरी बसला. त्याच्या उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे काम केले.
    १८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उचलून त्याने त्याचे प्राण वाचवले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझी यांचा होता. एडिसनचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझीने त्याला आगगाडीच्या तारायंत्राचे शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले. 
    दिवसभर नाना प्रयोगात दंग असल्यामुळे एडिसनला रात्री झोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमच्या फोन मधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.
एकाधिका :
    इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या मतनोंदणी मशीनसाठी अमेरिकन एकाधिकार (पेटंट) ९०,६४६
विद्युत दिव्यासाठी अमेरिकन एकाधिकार (पेटंट) २,२३,८९८ (४ नोव्हेंबर १८७९ ला मागणी केली व २७ जानेवारी १८८० रोजी एकाधिकार मिळाला.)
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी 
CLICK HERE
 
CLICK HERE
 
चार्ल्स डार्विन : प्रश्नमंजुषा Charles Darwin Quiz   सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

स्त्रोत - इंटरनेट


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon