HSC परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ च्या परीक्षेची आवेदन पत्रे ऑनलाइन सादर करावयाच्या तारखा बाबत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
सुधारित सूचना
इ. १२वी फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्याच्या नियमित शुल्काच्या तारखांना मुदतवाढीबाबत व विलंब शुल्काच्या तारखांबाबत
विषय सन २०२४-२५ परीक्षा शुल्क जमा करणेसाठी ICICI बँकेत नव्याने उघडण्यात आलेले खाते क्रमांकाचा वापर करणेबाबत.
नवीन खाते क्रमांकाची यादी सोबत पाठविण्यात येत आहे.
सविस्तर परिपत्रक वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
• प्रकटन •
क. रा.मं/परीक्षा-३/४३०५
दिनांक २९/१०/२०२४
विषय - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्याच्या नियमित शुल्काच्या तारखांना मुदतवाढीबाबत व विलंब शुल्काच्या तारखांबाबत
संदर्भ- १.क.रा.मं./ले-पे०६/परीक्षा शुल्क २०२४-२५/१७८७, दि.३०/०४/२०२४ चे पत्र २.क.रा.मं./परीक्षा-३/३७७४ दि.२७/०९/२०२४ चे पत्र
उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु मार्च २०२५ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.
व्यवसाय अभ्यासकम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने दि. ३०/१०/२०२४ पर्यंत भरावयाची होती. सदर तारखांना मुदतवाढ देण्यात येत असून मुदतवाढीच्या तसेच शुल्क व कागदपत्रे जमा करावयाच्या तारखांचा तपशील खालीलप्रमाणे
शुल्क प्रकार
विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी RTGS/NEFT पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची तारीख बुधवार दि.२७/११/२०२४
नियमित शुल्क (मुदतवाढ) गुरूवार, दिनांक ३१/१०/२०२४ गुरूवार, ते गुरूवार, दिनांक १४/११/२०२४
विलंब शुल्क शुक्रवार, दिनांक १५/११/२०२४ ते शुक्रवार, दिनांक २२/११/२०२४
सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी College Profile मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन (College Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख/प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इ. १२ वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहेत
१ उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी SARAL
DATABASE मध्ये विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक आहे. सदर SARAL DATABASE वरुनच नियमित
विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. २ व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational)/औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (III) नियमित विद्यार्थ्यांची माहिती SARAL DATABASE मध्ये नसल्याने सदर विद्याथ्यांची आवेदनपत्रे नियमित पध्दतीने ऑनलाईन भरावयाची आहेत, याची नोंद घेण्यात यावी.
३ सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी Website द्वारे प्राप्त Online चलनावर नमूद केलेल्या ICICI बँकेच्या Virtual Account मध्ये कोणत्याही बँकेमधून RTGS/NEFT द्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात यावा व चलनाची प्रत व Pre-list विहित मुदतीमध्ये विभागीय मंडळास जमा करावे रक्कम जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या application status मध्ये " Draft" चा "Send to Board" व Payment status मध्ये "Not Paid" चा "Paid" असा बदल आला आहे का याची खातरजमा करावी. अशा "Send to Board" व "Paid" Status प्राप्त झालेली आवेदनपत्रे मंडळास प्राप्त झाले असे गृहीत धरून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. व उर्वरित आवेदनपत्रे Draft Mode मध्येच राहतील व त्याबाबत कोणतीही कार्यवाही होणार नाही.
४ यापूर्वी वापरात असणाऱ्या Bank Of India/HDFC Bank/Axis Bank च्या जुन्या चलनांचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही.५ शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना भरलेल्या आवेदनपत्रांमधून निवड करून एक किंवा एकापेक्षा अधिक चलने तयार करता येतील. परंतु शुल्काचा भरणा करताना प्रत्येक चलन स्वतंत्रपणे भरण्यात यावे. जेणेकरून त्यात समाविष्ट विद्यार्थ्यांनेचे Status Update होईल.
६ उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत.
७ विलंब शुल्काने आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घेण्यात यावी.
८ अतिविलंब शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा यथावकाश कळविण्यात येतील. उपरोक्त सर्व बाबी आपल्या विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.
(देविदास कुलाळ )
सचिव, राज्य मंडळ, पुणे
क. रा.मं./लेखा ११/नि. वि./२४/४२२९पुणे
दिनांक २२/१०/२०२४
प्रति,
विभागीय सचिव,
सर्व विभागीय मंडळ,
विषय सन २०२४-२५ परीक्षा शुल्क जमा करणेसाठी ICICI बँकेत नव्याने उघडण्यात आलेले खाते क्रमांकाचा वापर करणेबाबत.
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, सन २०२४-२५ इ. १० वी व इ. १२ परीक्षा शुल्क जमा करणेसाठी ICICI बँकेमध्ये नव्याने खाते उघडण्यात आलेले आहे ICICI बँकेमार्फत नवीन खाते क्रमांकांची यादी सोबत जोडलेली आहे.
सर्व विभागीय मंडळांनी सन २४-२५ पासून इ. १० वी इ. १२ वी ची परीक्षा शुल्क जमा करणेकरीता फक्त याच ICICI बँक खात्याचा वापर करण्याची दक्षता घ्यावी. अन्य कोणत्याही खात्यांचा वापर करू नये. पुढील कार्यवाही करणेसाठी नवीन खाते क्रमांकाची यादी सोबत पाठविण्यात येत आहे.
५. स. मा. उच्च भा. शिक्षण मध् पुणे विभागीय मंडळ, पुणे
(अनुराधा ओक)
सचिव, राज्यमंडळ, पुणे
SSC-HSC BOARD EXAM FEE A/C
Division Name
HSC A/c No
Pune 532401000139
Mumbai 007401025507
Chh. Sambhaji Nagar 147501003089
Latur 336201001552
Nagpur 007401025505
Kolhapur 738501000679
Amravati 337601001984
Nashik 147501003091
Konkan 007401025512
SSC A/c No
Pune 532401000140
Mumbai 007401025506
Chh. Sambhaji Nagar 147501003090
Latur 336201001553
Nagpur 007401025504
Kolhapur 738501000680
Amravati 337601001981
Nashik 147501003092
Konkan 007401025511
Secretary
Maharashtra State Board of Secondary 8. Higher Secondary Education Board bamburda, Shivajinagar,
• प्रकटन •
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु मार्च २०२५ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत. व्यवसाय अभ्यासकम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची
आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे शुल्क प्रकार
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांचे नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Vocatioanl Stream) शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच ITI (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा नियमित शुल्क
मंगळवार, दिनांक ०१/१०/२०२४ ते बुधवार, दिनांक ३०/१०/२०२४
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क RTGS द्वारे भरणा करणे व RTGS/NEFT पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व उच्च माध्यमिक शाळा प्रमुख/प्राचार्य यांनी नोंद घ्यावी.
सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी College Profile मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची
आवेदनपत्रे भरुन सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन (College Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख/प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इ. १२ वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे
१ उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी SARAL DATABASE मध्ये विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक आहे. सदर SARAL DATABASE वरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे.
२ व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational)/औद्यागिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) नियमित विद्यार्थ्यांची माहिती SARAL DATABASE मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे नियमित पध्दतीने ऑनलाईन भरावयाची आहेत, याची नोंद घेण्यात यावी.
दिनांक १७/०९/२०२४
(अनुराधा ओक)
सचिव,
राज्य मंडळ, पुणे
हे ही वाचा 👇
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
दिनांक ०६/१०/२०२३
विषय :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु/मार्च २०२४ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांबाबत.
॥ प्रकटन ॥
विषय :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रुवारी/मार्च २०२४ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांबाबत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षा फेब्रु/ मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणान्या नियमित विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन ऑनलाईन पध्दतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम येणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट
Circular PDF format Download / View
Click Here 👇
तरच मिळणार विद्यार्थ्यांना गुण फेब्रुवारी / मार्च 2023 मध्ये आयोजित
करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेतील 'इंग्रजी' विषयाच्या प्रश्न पत्रिकेतील त्रुटी बाबत महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे प्रकटन
फेब्रुवारी / मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळाच्या पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व
कोकण या नऊ विभागीय मंडळा मार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ पासून आयोजित करण्यात आलेली आहे
दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ रोजी इंग्रजी विषयाची परीक्षा झाली आहे प्रचलित
पद्धतीप्रमाणे इंग्रजी विषयाची संयुक्त सभा विषय तज्ज्ञ व सर्व विभागीय
मंडळाचे प्रमुख नियमक यांच्या समवेत दिनांक ०३/०३/२०२३ रोजी आयोजित करण्यात आली सदर इंग्रजी प्रश्नपत्रिका मध्ये त्रुटी चुका आढळून आले असल्याने इंग्रजी
विषयाच्या संयुक्त सभेच्या अहवालावरून निदर्शनास येते या अहवालानुसार
त्रुटी असलेल्या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना पुढील परिस्थितीमध्ये
देण्यात येतील
१. Poetry Section - 2 / Poetry /
Section-2 असा केवळ उत्तर पत्रिकेमध्ये उल्लेख केला असल्यास
२. Poetry
Section - 2 मधील अन्य कोणतीही प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडविण्याचा प्रयत्न
केला असल्यास
३. त्रुटी असलेल्या प्रश्नांचे क्रमांक A-3 A-4 A-5 असे केवळ उत्तर पत्रिकेत नमूद केले असल्यास
उपरोक्त
तीन पैकी कोणत्याही एका प्रकारचे लेखन उत्तर पत्रिकेत विद्यार्थ्यांनी
केली असल्यास विद्यार्थ्यास प्रत्येक प्रश्नाचे दोन याप्रमाणे एकूण सहा गुण
देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे
सचिव
राज्य मंडळ पुणे
परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी मारा क्लिक
Maharashtra State board / HSC Exam
Circular PDF format Download / View
Click Here 👇
HSC परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२३ च्या परीक्षेची आवेदन पत्रे ऑनलाइन सादर करावयाच्या तारखा बाबत
फेब्रुवारी / मार्च २०२३
फेब्रुवारी/मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थातच इयत्ता बारावी परीक्षेची आवेदन पत्रे ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या तारखा बाबतचे प्रकटन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे दि.२९ सप्टेंबर २०२२ चे परिपत्रक वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या CLICK HERE वर टिचकी मारा
SSC/HSC परीक्षा 2023 वेळापत्रक जाहीर (संभाव्य)
Also read हेही वाचा
HSC परीक्षा मार्च / एप्रिल २०२२ च्या प्रात्यक्षिक परीक्षे संदर्भात मार्गदर्शक सूचना व विषय निहाय सुधारित नियोजन
हे हि वाचा
हे हि वाचा
हे हि वाचा
HSC परीक्षा एप्रिल मे 2021 करीता प्रात्यक्षिक,तोंडी परीक्षा,श्रेणी परीक्षा,प्रकल्प गुणविभागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कडून मुख्याध्यापकांसाठी मार्गदर्शक सूचना
हेही वाचा
Covid-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा एप्रिल-मे २०२१ च्या परीक्षा त्यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना दिनांक २१/०३/२०२१ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा.
SSC व HSC वाढीव वेळेनुसार सुधारित वेळापत्रक.वेळापत्रक Download करण्यासाठी वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon