World Wetlands Day Quiz विश्व पाणथळ दिवस / जागतिक पाणथळ भूमी दिन: प्रश्नमंजुषा सोडवा
World Wetlands Day
World Wetlands Day: जैविक विविधतेचं (Biodiversity) जतन करायचं असेल आणि ते वाढवायचं असेल तर पाणथळांचं (Wetlands) संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. या वर्षी जागतिक पाणथळ दिवसासाठी 'Wetlands and Water' ही थीम आहे.
पाणथळ जागा तशा दुर्लक्षित केल्या जातात. जागतिक स्तरावर पाणथळ प्रदेशांचं संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने 2 फेब्रुवारी 1971 साली इराणमधील रामसर या ठिकाणी एक परिषद आयोजित करण्यात आली होती. पाणथळ प्रदेशांच संवर्धन करण्यासाठी त्या परिषदेत 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जावा असं ठरलं. पण 1997 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
भारत हा या रामसर कराराचा एक सदस्य देश असल्याने भारतातील एकूण 27 जागांचा 'रामसर पाणथळ' (Ramsar Wetlands) मध्ये समावेश होतो. महाराष्ट्रातील एकही जागेचा यात समावेश होत नाही.

१९७१ साली इराण मधील कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावरील रामसर या शहरी ‘पाणथळ प्रदेशांचे महत्त्व’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वाना समजावे या हेतूने दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘वर्ल्ड वेटलँड्स डे’ अर्थात 'जागतिक पाणथळ भूमी दिन' म्हणून साजरा केला जावा, असा निर्णय या परिषदेत घेतला गेला. १९९७ सालापासून हा दिवस साजरा केला जात आहे.
नदी, तलाव, सागरकिनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या आणि गवतांनी व झुडपांनी (खारफुटी) भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला आढळतात. यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्स्यशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो. आपण भूगर्भातील पाणी वापरतो; या पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम असे प्रदेश करतात.
अनेकदा आपण प्रदूषित पाणी व इतर हानीकारक द्रव्ये अशा प्रदेशांत फेकतो; परंतु पाणथळ जागी वाढणाऱ्या वनस्पतीच या घटकांना गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात. सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किनाऱ्यांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते. अतिवृष्टी झाल्यास अधिकचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशांत मुरते आणि मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते.
बदके, करकोचे, खंड्या, बगळे, रोहित तसेच शिकारी प्रजातींच्या अनेक पक्ष्यांना पाणथळ भूमीतून अधिवास मिळतो. हे पक्षी या अन्नसाखळीतला महत्त्वाचा दुवा ठरतात. ज्या पाणथळ जागेवर एकाच वेळी २० हजारांपेक्षा जास्त पक्षी आढळतात तसेच त्या ठिकाणचे भौगोलिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचे स्थान असल्यास, अशा ठिकाणांना ‘रामसर’चा दर्जा प्राप्त होतो. महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याला लवकरच ‘रामसर’चा दर्जा प्राप्त होणार असून, राज्यातील हे पहिले ठिकाण ठरणार आहे!
Subscribe to Next Update -
सर्वांना एक विनंती आहे की
लिंक ओपन केल्यावर अनेक
पक्षी दिसतील, सदर पक्षाला बोट लावताच तो आपला मुळ आवाज काढून दाखवेल.
किती छान टेक्नॉलॉजी आहै.
कृपया सर्वांनी आपल्या शाळेचा ग्रुप वरती टाकावी आणि मुलांना त्याचा आनंद घेण्यासाठी सांगावे आणि स्वतः देखिल त्याचा आनंद घ्यावा
हेही वाचा
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, अभ्यासात अडचणी येताहेत? मग ही बातमी वाचाच !
समुपदेशक आणि विषय तज्ज्ञांची यादी पाहण्यासाठी येथे ►

क्लिक करा
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने 426 तज्ज्ञ समुपदेशक आणि 596 विषय तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिलपासून सुरू होत आहेत. करोनामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच, अभ्यासक्रमातही कपात केली आहे. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य पद्धतीने शिक्षण घेता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागामार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे.
तसेच, त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी आणि शंकाचे समाधान करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांकडून प्रश्नोत्तरातून संवाद साधला जाणार आहे. त्यासाठी ५९६ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. जिल्हानिहाय शिक्षकांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘‘दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत एकदा विषय कळाला नाही तर विषय तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. तर इतर समस्या समुपदेशक संवादातून सोडवू शकता. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेसाठी आत्मविश्वासाने सामोरे जाईल.’’
- वर्षा गायकवाड, शिक्षण मंत्री
- समुपदेशक आणि विषय तज्ज्ञांची यादी पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon