DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Students' Day डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी दिवस प्रश्नमंजुषा


बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी दिवस प्रश्नमंजुषा



डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गौरवगाथा प्रश्नमंजुषा  
विद्यार्थी दिवसा निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 
विनम्र अभिवादन ! 
डॉ.भीमराव रामजी आंबेडकर उपाख्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्या निमित्त गौरवगाथा प्रश्नमंजुषा.

🙂 World Students Day जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो जाणून घ्या या ओळीला स्पर्श करा 

चाचणी सोडविण्यासाठी  

@ ७ नोव्हेंबर @
भारतीय विद्यार्थी दिन

'भारतीय विद्यार्थी दिन' हा दिवस साजरा करण्यामागे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी बाबासाहेबांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक, सातारा येथील शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भिवा होते. या शाळेच्या रजिस्टरला ‘१९१४’ या क्रमांकासमोर आजही त्यांची स्वाक्षरी असून, हा ऐतिहासिक दस्तावेज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाचा ७ नोव्हेंबर हा दिवस शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत सर्व शाळांमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि काव्यवाचन आदी उपक्रम आयोजित करण्यात येतो. डॉ. आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाचा ७ नोव्हेंबर हा दिवस भारतीय इतिहासातील वैचारिक, समानतेची, बंधुत्वाची, शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल मानली जाते. डॉ. आंबेडकर हे शाळा प्रवेशाने स्वतः प्रज्ञावंत झालेच आणि कोट्यवधी शोषित, दलितांचे नि वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. त्यांच्या संविधानामुळे भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मानवी मूल्ये रूजू शकली. त्यामुळेच त्यांच्या शाळा प्रवेशाचा दिवस ही महत्त्वाची घटना आहे व म्हणूनच हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रभरात 'विद्यार्थी दिन' म्हणून साजरा केला जात आहे. 'विद्यार्थी दिन' हा दिनविशेष विद्यार्थ्यांचे प्रश्न वा समस्या ऐरणीवर मांडण्यासाठी महत्त्वाचा समजला जावा अशी आमची अपेक्षा आहे.

विद्यार्जन करतो तो विद्यार्थी. विद्या हा शब्द येथे गंभितार्थाने घ्यावयाचा आहे. स्वतःच्या सर्वांगिण विकासासाठी, स्वतः मधील सर्व ज्ञान-कला-कौशल्ये ही शिक्षणरुपात स्वतःहुन, स्वयंप्रेरणेने वा मार्गदर्शनाने विकसित करणे म्हणजेच विद्यार्जन करणे. सर्वांगिण विकास म्हणजे बौद्धिक (तर्कशक्ती विकसन), मानसिक (मनाला स्थैर्य व संयमाने धैर्य देणारी जीवन कौशल्ये विकसन), शारिरीक (श्रमप्रतिष्ठा व विविध कला तसेच कायिक कौशल्ये विकसन करणारी जीवन कौशल्ये), भावनिक (भावनांचे समायोजन तसेच व्यक्तिमत्त्व विकसन करणारी जीवन कौशल्ये), आत्मिक (भारतीय संस्कार, संस्कृती, शिक्षण व मानवता संरक्षित व संक्रमित करणारी जीवन कौशल्ये विकसन), सामाजिक (कुटुंबाचा, समाजाचा व भारताचा आदर्श नागरिक म्हणून जगण्याच्या सवयी विकसित करणारी जीवन कौशल्ये), राजकीय (नेतृत्व गुण तसेच कुटुंब, समाज व देश यांच्या विकासासाठी जबाबदारी घेण्याची व पेलण्याची ताकद विकसित करणारी जीवन कौशल्य), आर्थिक (स्व-कष्टाच्या कमाईतून कुटुंब, समाज व देश यांचा आर्थिक विकास करणारी जीवन कौशल्ये) तसेच इतर सर्व महत्त्वाची जीवन कौशल्ये व दृष्टिकोन यांचा सर्व बाजूंनी सारखा विकास होणे. हा असा विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास करणे हे भारतीय शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिक्षणाच्या या मुख्य उद्दिष्टाशी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर यांनी प्रामाणिक राहण्यासाठी, काय करायला हवे याचा गांभीर्याने विचार शासनाने करायला हवा. 'विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास या उद्दिष्टापासून भारतीय शिक्षण अजूनही कोसो मैल दूर आहे ही आजच्या दिवसाबाबत मांडण्यासारखी मूळ समस्या आहे. शिक्षण घेवून आदर्श भारतीय नागरिक तयार होणे हे शिक्षण प्रक्रियेतले मुख्य साध्य होण्यासाठी विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास होणे सर्वांत महत्त्वाचे ठरते. हे साध्य होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेवून त्या समस्यांचे निराकरण करणे हा भारतीय शैक्षणिक विकासाला अनेक महत्वाच्या पैलू पैकी अधिक महत्त्वाचा आहे आणि यावर विचार करण्याची नितांत गरज आहे. आज या विद्यार्थी दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या समस्या थोडक्यात पाहु या.

१) शैक्षणिक अभ्यासक्रम हा जीवनाभिमुख हवा. त्या अभ्यासक्रमाला व्यावहारिक मूल्य हवे. आजचे पुस्तकी ज्ञान व्यवहारात कुचकामी ठरते ही मूळ समस्या आहे.
२) अभ्यासक्रम ठरविताना ग्रामीण व शहरी अशा भागांतील विद्यार्थ्यांचा विचार व्हायला हवा. ग्रामीण व शहरी भाग यांचा सूवर्णमध्य वेधणारा आजचा अभ्यासक्रम नाही ही सुध्दा महत्त्वाची समस्या आहे.
३) 'काय शिकावे?' या अभ्यासक्रमाच्या जोडीला,
'कसे शिकावे?' हा उप-अभ्यासक्रम सुध्दा असणे अत्यंत आवश्यकच आहे. 'कसे शिकावे?' हा भागच बहुतेकांना आत्मसात होणे दूरच पण ज्ञात ही होत नाही हे भारतीय शिक्षणाचे सर्वांत मोठे दुर्दैव आहे.
४) स्वयं अभ्यास पद्धतीचे तंत्रशुध्द ज्ञान देणारा भाग अभ्यासक्रमातच हवा. वाचन क्षमता वाढवून संदर्भ ग्रंथांचा सुयोग्य वापर करायला शिकविणे हा भाग यात महत्त्वाचा समजला जावा.
५) शाळा वा कॉलेजच्या दैनंदिन वेळा ठरविताना विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक क्षमतेचा विचार व्हावा. शिक्षण क्षेत्र हे बौध्दिक क्षेत्र असल्याने, अवधान केंद्रित करण्याची क्षमता लक्षात घ्यायला हवी. शाळा वा कॉलेजचा दैनंदिन कालावधी तासांमध्ये वाढविल्यास त्या तासांचा शारिरीक ताण आपोआपच मनावर येवून बौध्दिक ताण वाढतो. अत्यंत करमणूक प्रधान व आवडता चित्रपट असला तरी सुद्धा आपली सलग तीन तास बैठक क्षमता नसते. पाच मिनिटात वाचली जावू शकणारी पोस्ट आपल्याला लांबलचक वाटून आपण ती वाचायचीच टाळतो, तर दैनंदिन शालेय कालावधी तासांमध्ये वाढ करुन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे भले करायचे की आणखी काही, याचा ही अत्यंत गांभीर्याने विचार व्हायलाच हवा.
६) विद्यार्थ्यांना पुस्तके वा तत्सम महत्त्वाची शैक्षणिक साधने कमी खर्चात सर्वत्र उपलब्ध असावीत.
७) शाळा वा कॉलेज या ठिकाणी परिपूर्ण भौतिक सुविधा असाव्यात. या भौतिक सुविधांत विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य यांचा विचार व्हायला हवा. पाणी, मध्यान्ह भोजनगृह वा कँटिन तसेच स्वच्छता गृह यांची सोय असावीच. शालेय मध्यान्ह भोजन हे सकस नि आरोग्यदृष्ट्या समतोल असणारे, ताजे व निर्जंतुक हवे.
८) शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तर ओझ्याची समस्या चावून चोथा झाली तरी सुद्धा सक्षम उपाययोजना करण्यात आलेली नाही. आम्ही स्वतः दोन तीन वेळा दप्तर ओझे कमी करण्या संदर्भात महत्त्वाची पोस्ट दिल्यात. चांगले कॉमेंटस् येण्यापलिकडे त्या पोस्टस् चे फलित मिळाले नाही. म्हणूनच दप्तर ओझ्याविषयी आमच्या त्या पोस्ट मधील महत्त्वाचा मुद्दा पुन्हा सांगावासा वाटतो. आम्ही सदर पोस्ट मध्ये पुढील मुद्यांवर भर दिला होता-
अ) प्रत्येक शालेय विद्यार्थ्याने दप्तरात केवळ भाषा विषयक पाठ्यपुस्तके व जास्तीत जास्त अर्धा डझन फुलस्केप रेघी कागद न्यावेत. चित्रकला वा हस्तकलेसाठी, सदर विषयांच्या तासिका असतील त्याच दिवशी फक्त पूर्णतया कोरे कागद वा हस्तकला साहित्य न्यावे.
ब) वर्गात नेलेल्या फुलस्केप कागदावरच वर्गकाम लिहावे व घरी येवून ते कागद फाईल करावे.
क) गृहपाठ, निबंध, स्वाध्याय या सारखी शालेय कामे सुध्दा फुलस्केप कागदावरच करुन, शालेय सूचनांनुसार त्या त्या दिवशीच हे कागद शाळेत नेवून तपासावेत व पुन्हा हे कागद घरीच फाईल करावेत. तोंडी परीक्षा वा शाळा सांगेल तेव्हा ही फाईल शाळेत जमा करावी. थोडक्यात विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हे घरीच असलेल्या फाईल्स मध्ये एकवटते हा आमचा विचारच शैक्षणिक क्षेत्रात पोहोचला नाही हे आमचे व शालेय विद्यार्थ्यांचे दुर्दैव आहे.
९) परगावाहुन ये-जा करणाऱ्य विद्यार्थ्यांच्या समस्यांचे ही निरसन व्हावे. वसतिगृह वा खोली करुन राहणारे विद्यार्थी यांचे आरोग्य, भौतिक सुविधा व गरजापूर्ती आणि संरक्षण यांचा ही विचार व्हावा.
१०) मुलींच्या शिक्षणा सोबतच त्यांच्या आरोग्यदृष्ट्या व समाजातील निर्धोकपणे वावरण्या संबंधी संरक्षणासाठीच्या समस्या डोके वर काढून उभ्या ठाकल्या आहेत याचाही शांततेत विचार करुन यांवर ठोस उपाययोजना समाजाचा सहभाग घेवून शिक्षण क्षेत्राने करायला हवा.

विद्यार्थी, मग तो शालेय शिक्षण घेणारा असो वा उच्च शिक्षण घेणारा; त्याच्या जीवनातील सर्व टप्प्यांतील समस्यांचा मागोवा घेवून या समस्यांचा त्या त्या टप्प्यावर बिमोड करणे हे शासन, शिक्षण क्षेत्र, पालक व स्वतः विद्यार्थी या सर्वांचेच काम आहे आणि हे काम प्रामाणिकपणातूनच तडीस जाईल याची जाणीव ठेवून हे कार्य पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन !


 





मागील सर्व सामन्य ज्ञान चाचण्या सोडविण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा 

मागील सर्व दिन विशेष चाचण्या सोडविण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा 




बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी दिवस प्रश्नमंजुषा
Babasaheb Ambedkar's First Day of School Student's Day Quiz
World Students Day जागतिक विद्यार्थी दिन
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon