तथा
ए. पी. जे. अब्दुल कलाम
भारताचे ११ वे राष्ट्रपती, वैज्ञानिक, अभियंता
जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर
मृत्यू : २७ जुलै २०१५ शिलाँग
जागतिक विद्यार्थी दिवस
दि १५ ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि विख्यात अंतराळ शास्त्रज्ञ यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस भारतासह सर्व जगात
जागतिक विद्यार्थी दिवस
म्हणून पाळला जातो. सन २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्राने UNO त्यांचा सन्मान
करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला. १५
ऑक्टोबर १९३१ हा दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. या महान
शास्त्रज्ञाने क्षेपणास्त्रात भारताला स्वयंपूर्ण केले. ते नेहमी
विद्यार्थ्यांमध्ये रमले. त्यामुळे त्यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त १५
ऑक्टोबर हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन घोषीत केला. त्या दिवसापासून जगभरात
हा दिवस साजरा केला जातो.कलामांनाच स्मरुन आज 'वाचन प्रेरणा दिन' ही साजरा केला जातो.
सन्मान : भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण
कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य
लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
कार्य
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
शिक्षण
त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
स्वभाव
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
गौरव
अब्दुल कलाम यांचा दि १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
निधन
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी दि.२७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.
जयहिंद
विनम्र अभिवादन
वाचन प्रेरणा दिवस तथा जागतिक विद्यार्थी दिवस निमित्ताने एक आँनलाईन चाचणी / प्रश्नमंजुषा सोडवून डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन करूयात.
ज्यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिवस तथा जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केल्या जातो अशा महान विभूतीचा आज पुण्यस्मरण दिन त्या निमित्ताने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी आँनलाईन प्रश्न मंजुषा / चाचणी सोडवून डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन करूयात.
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन !
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी खालिल CLICK HERE वर टिचकी मारा आवश्यक ती माहिती नोंदवा आणि आपल्या ज्ञानात भर घाला सर्व इयत्ता व सर्व स्पर्धा परीक्षा करीता उपयुक्त प्रश्न मंजुषा
For Next Update पुढील अद्यावत माहिती साठी

“आझादी का अमृत महोत्सव”
उत्सव आझादी का
महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा
Dr.A.P.J.Abdulkalam Space Research Payload Cubes Challenge - 2021 विद्यार्थ्यांद्वारे १०० उपग्रह बनवून एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा जागतिक विक्रम करणार डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन
डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे कलाम सर यांचे विद्यार्थ्यांसाठी टेकनॉलॉजिचे स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी बनविलेले १०० उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करणार आहे.या उपक्रमामुळे शेकडो विद्यार्थ्यांना उपग्रह बनविण्याची संधी मिळणार आहे. कदाचित उद्याचे डॉ. कलाम या विद्यार्थ्यांमध्ये दडलेले असू शकतात.
भारतात प्रथमच अश्या प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे. महाराष्ट्रामधून सुद्धा अनेक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
हा उपक्रम ९ वी ते १२ वि च्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. १० विद्यार्थ्यांची एक टीम एक उपग्रह स्वतः बनवेल. हे उपग्रह बनविण्याचे ६ ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाईल. २ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान ऑनलाईन प्रशिक्षण होईल. सातव्या एक दिवसीय प्रत्यक्ष उपग्रह बनविणाच्या प्रशिक्षणासाठी चेन्नई येथे स्वखर्चाने जावे लागेल. १८ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान बॅच प्रमाणे एक दिवसीय प्रशिक्षण चेन्नई येथे दिले जाईल. विद्यार्थ्यांकडून त्यांचा उपग्रह प्रत्यक्ष बनवून टेस्ट करून घेतली जाईल.
७ फेब्रुवारी रोजी डी आर डी ओ चे चेअरमन यांचे उपस्थित रामेश्वरम येथून हेलियम बलूनमार्फत पृथ्वीच्या समांतर कक्षेत हे उपग्रह अवकाशांत सोडण्यात येतील.
या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् , आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये केली जाईल .
प्रत्येक विदयार्थ्यामागे प्रशिक्षण, उपग्रह बनविणे आणि अवकाशात सोडणेचा खर्च रुपये १०,०००/- आहे.
उपग्रह प्रत्यक्ष बनविण्यासाठी चेन्नई येथे स्वखर्चाने जावे लागेल.
महाराष्ट्रातील सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ट्रेन च्या ए सी ने नेणे आणि आणणे , एक दिवसीय हॉटेल चे वास्तव्य आणि इतर खर्च मिळून प्रत्येक विद्यार्थ्यास १०,०००/- खर्च आहे.
म्हणजे एकत्रित खर्च २०,०००/- होईल. महाराष्ट्रातील फाऊंडेशन चे पदाधिकारी स्वतः विद्यार्थ्यांसोबत जातील. आणि सर्व विद्यार्थ्यांची सर्व व्यवस्था करतील.
या प्रकल्पाची नोंदणी
१) वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स
२) आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्
३) इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये करण्यात येईल आणि प्रकल्पाचे सहभागपत्र विद्यार्थ्यांना मिळेल .
_*विदयार्थ्यास या प्रकल्पाचे होणारे फायदे*_
१) जागतिक पातळीवर नोंद होणाऱ्या प्रकल्पात सहभाग
२) उपग्रह तंत्रगण्यानं शिकण्याची संधी
३)स्वतः प्रत्यक्ष उपग्रह बनविण्याची संधी
४) पूरक अवजारांचे मोफत किट
५) उपग्रह बनविण्याचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उपग्रह बनविण्याची संधी .
तरी अश्या शाळा ज्या हा भार घेऊ शकतील किंवा एखाद्या स्पॉन्सर तर्फे विदयार्थी येऊ शकत असतील, ज्या जिल्हा परिषद आणि महानारपालिका , नगरपालिका आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांचे खर्चाने पाठवू इच्छित असतील त्यांनी तर
मिलिंद चौधरी ९१६७१२८९०५ ठाणे,
मनीषा ताई चौधरी ९५४५९३८९३८ नाशिक,
डॉ ज्योती महाजन 94234 90886 जळगाव,
शाहू संभाजी भारती ९९७५७३८३२१ पालघर,
दामोदर डहाळे ९६५७६७९९९७ तुमसर,
श्रीरंग औचर्मल ९८२३०२८४९४ औरंगाबाद यांचेशी संपर्क करावा.
सोबत पीडीफ आणि व्हीडिओ जोडत आहे.
टीप:- महाराष्ट्रामधून १०० मुले आणि मुली जॉईन झाल्यास चेन्नई ला जाण्याची गरज नाही. उपग्रह पुणे किंवा मुंबई मधेच बनविले जातील. या मुळे चेन्नईला जाण्याचा खर्च वाचेल.
धन्यवाद !
मिलिंद चौधरी ( सचिव )
डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन
हाऊस ऑफ कलाम, रामेश्वरम , तामिळनाडू
TAG - Dr APJ Abdul Kalam Quiz
Bharat Ratna Avul Pakir Jainulabdeen Abdul Kalam
Missile Man
Reading Inspiration
Vachan Prearana
World Students Day
Wings of Fire
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon