जाणून घ्या ! कुठ मिळतील दर्शनासाठी E-Pass - महत्वाचे अपडेट
दि ०७/१०/२०२१ पासून राज्यातील मंदिर प्रवेश सुरु झाला आहे , दरम्यान अनेक ठिकाणी दर्शनासाठी E-Pass ची सुवीधा दिली आहे तर काही ठिकाणी ठराविक संख्येने लोकांना प्रवेश मिळणार आहे , दरम्यान काही ठिकाणच्या E-Pass च्या लिंक आपल्याकडे आल्या आहेत
श्री गजानन महाराज संस्थान, शेंगाव
मंदिर ०७/१०/२०२१ ला उघडणार आहे दर्शनासाठी ई पास काढावे लागणार आहे तर या लिंक ला जाऊन दर्शनसाठी ई पास काढ़ा.
पास काढ़ायची असल्यास आधार कार्ड आणि एक फ़ोटो आवश्यक
जय गजानन माऊली श्री भक्तांनी दर्शनाकरीता येतांना श्री ई - दर्शन पास व आधारकार्ड सोबत आणावे.
२. ज्या भक्तांनी स्वतःचे किंवा दुसऱ्याचे स्मार्ट/ॲन्ड्रॉईंड फोनवरुन ई - दर्शन पास करीता नोंदणी केली असेल त्यांनी श्री ई- दर्शन पास/पासचा आय.डी. क्रमांक सोबत आणावा.
३. निःशुल्क ई-दर्शन पासची नोंदणी करीत असतांना तांत्रिक अडचण आल्यास - 9529658074 / 8766573487 या मोबाईल नंबरवर २४ तास संपर्क करता येईल
४. श्री दर्शनार्थी भाविकांनी ई-दर्शन पास काढतांना आधारकार्ड वरील पत्ता टाकणे / नोंदविणे गरजेचे आहे.
५. प्रत्येक दर्शनार्थी भाविकांसाठी स्वतंत्र ई-दर्शन पास असणे बंधनकारक राहील.
६. श्रींचे दर्शनाकरीता एक दिवस आधी ऑनलाईन बुकींग करुन घ्यावी.
७. कोविड नियमानुसार सेवेत श्री महाप्रसाद सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरु राहील.
८. श्री दर्शनार्थी भाविकांकरीता पर्याय म्हणून पादत्राणे ठेवण्याची नियमानुकूल स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
९. प्रति दिवस नियमाप्रमाणे सरासरी ९,००० भाविकांना ई-दर्शन पासद्वारे श्रींचे दर्शनाचा लाभ घेता येईल.
१०. श्री मंदिरात प्रवेश करतांना मास्क वापरणे, थर्मल स्क्रिनिंग व सॅनिटायझर करणे बंधनकारक राहील.
११. हार, फुले, प्रसाद, नारळ, चिरंजी, पेढे, उदबत्ती इत्यादी पुजेचे व प्रसादाचे साहित्य सोबत आणू नये.
१२. नियमानुसार ६ फुटाचे सामाजिक / सुरक्षीत अंतर ठेवावे लागेल.
१३. शासनाचे निर्देशानुसार १० वर्षाचे आतील व ६५ वर्षाचे वरील तसेच गर्भवती महिलांनी व रेड झोन, कन्टेंन्मेंट झोन व होम क्वारंटाईन असलेल्या भक्तांनी श्रींचे दर्शनाकरीता येऊ नये.
(नेट, कॅफे, सेतू, स्मार्ट फोनवरुन सुध्दा ई - दर्शन पासची सुविधा उपलब्ध करुन घेता येईल.)
टिप - श्री दर्शन सुविधा ही निःशुल्क आहे, कृपया भाविकांनी याची नोंद घ्यावी.
भक्तनिवास संकूल व विसावा भक्तनिवास संकुल आणि आनंदविहार भक्तनिवास संकूल येथे भाविकांकरीता निवास व भोजन प्रसादाची व्यवस्था नियमानुसार उपलब्ध आहे.
पहा कुठ करता येईल E-Pass साठी नोंदणी
● श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव E-Pass नोंदणी - 
लवकरच खालिल ठिकाणच्या सुविधा अद्यावत / Update होतील
● श्री साईबाबा संस्थान शिर्डी E-Pass नोंदणी -
● श्री विठ्ठल मंदीर पंढरपूर E-Pass नोंदणी -
● श्री शनिमहाराज शनिशिंगणापूर E-Pass नोंदणी -
● श्री सिद्धिविनायक दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग Apps व्दारे करावं लागणार -
● *दर्शनासाठी आवश्यक असणाऱ्या* - E-Pass नोंदणीच्या ह्या वेबसाईट नक्कीच खूप महत्वाच्या आहेत
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon