Swayam Arthasahayit Shala portal Link
Self Financed Schools Portal Link
Swayam Arthsahayit Shala portal
स्वयं-अर्थसहायित शाळा पोर्टल
नवीन SFS (Self-Financed Schools) पोर्टलचे शालेय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन
मा. ना. श्री. दादाजी भुसे, मंत्री महोदय, शालेय शिक्षण विभाग यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील शाळा व शैक्षणिक संस्थांशी संबंधित विविध प्रशासकीय सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या नवीन SFS (Self-Financed Schools) पोर्टलचे उद्घाटन शुक्रवार, दिनांक 30 ऑक्टोबर २०२६ रोजी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
पोर्टलच्या माध्यमातून सद्यस्थितीत एकूण १० सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे..
नवीन SFS पोर्टलवरील प्रमुख सेवा
नवीन SFS पोर्टलवर खालील १० सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
१. बोर्ड संलग्नता एनओसी (Board Affiliation NOC)
२. ना-हरकत प्रमाणपत्राचे नूतनीकरण (NOC Renewal)
३. दोन सत्रांच्या शाळेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र (NOC Two-Shift School)
४. शाळेचे स्थलांतर (School Re-location)
५. शाळा व्यवस्थापनाचे हस्तांतरण (Transfer of School Management)
६. अतिरिक्त तुकडी सुरू करण्याची परवानगी – इयत्ता ११ वी (Additional Division - Std. 11)
७. अतिरिक्त शाखा सुरू करण्याची परवानगी – इयत्ता ११ वी (Additional Stream - Std. 11)
८. मंडळ बदल तसेच शाळेचे नाव व माध्यम बदलण्याची परवानगी (Permission for Board Change, Changes in School Name and Medium)
९. एनओसी संलग्नता रद्द करणे (NOC Affiliation Cancellation)
१०. प्रवेश क्षमता वाढविणे (Admission Capacity Increase)
या सुविधांमुळे (एसएफएस/SFS पोर्टल) शाळा व शैक्षणिक संस्थांसाठी संबंधित सेवांच्या अर्जप्रक्रियेला डिजिटल स्वरूप प्राप्त होणार आहे. ऑनलाइन अर्ज, कागदपत्रांचे सादरीकरण आणि अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेण्याच्या सुविधांद्वारे प्रशासकीय कामकाज अधिक सुव्यवस्थित व पारदर्शक व गतीने होण्यास मदत होण्याचा विश्वास मा मंत्री महोदय यांनी व्यक्त केला.तसेच सदर पोर्टल विकसित करणाऱ्या सर्व टीमचे अभिनंदन केले.
विभागामार्फत राबविले जात असलेले उपक्रम/अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून शालेय गुणवत्ता वाढण्यासाठी सर्वांनी आवश्यक प्रयत्न करण्याचे आवाहन मा मंत्री महोदय यांनी विभागातील अधिकाऱ्यांना केले.तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावर विपरीत परिणाम होणार नाही याची सर्वांनी काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.
सदर ऑनलाईन बैठकीला शिक्षण आयुक्त मा.सचिंद्र प्रताप सिंह,सर्व संचालक,विभागीय शिक्षण उपसंचालक ,डायट प्राचार्य,सर्व शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख उपस्थित होते.
https://mahasfs.org

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon