DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

हात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सन २०२७ हे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याबाबत Mahatma Fule 200 Vi Janmshatabdi Varsh

Mahatma Fule 200 Vi Janmshatabdi Varsh

हात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सन २०२७ हे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याबाबत Mahatma Fule 200 Vi Janmshatabdi Varsh



महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सन २०२७ हे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याबाबत.

दिनांक :- ४ नोव्हेंबर, २०२६.

वाचा :- सामान्य प्रशासन विभाग यांचा शासन निर्णय क्रमांकः शताब्दी-२०२६/प्र.क्र.०९/समन्वय-२, दिनांक १० मार्च, २०२६.

प्रस्तावना :-
महात्मा जोतीराव फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ व मानवी मूल्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी १९ व्या शतकात जातीय विषमता, अंधश्रद्धा आणि शिक्षणावरील बंदी याविरोधात निर्भयपणे लढा दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि मानवमुक्तीचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला.स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. वंचित, शोषित समाजासाठी शिक्षण, प्रतिष्ठा आणि समानतेसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यामुळेच महात्मा फुले यांचे विचार आजही संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि समतेवर आधारित लोकशाहीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरतात.
महात्मा फुले यांच्या जयंतीला सन २०२७ मध्ये २०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमीत्ताने मा. मुख्यमंत्री महोदयांनी महात्मा जोतीराव फुले यांचे सन २०२७ हे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासंदर्भात सन २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे. यानुसार सन २०२७ मध्ये महात्मा जोतीराव फुले यांचे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी राबवावयाच्या उपक्रमासाठी शासन निर्णय दि. १० मार्च, २०२६ अन्वये समिती गठीत करण्यात आली आहे.
महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजात सामाजिक समता, स्त्री शिक्षण, शेतकरी कल्याण व सामाजिक न्याय या क्षेत्रांत केलेले कार्य अद्वितीय आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित, समावेशक व कौशल्याधारित शिक्षणाची जोपासना करण्यासाठी त्यांच्या विचारांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त या विभागाच्या अधिनस्त संचालनालये/ सर्व विद्यापीठे/महाविद्यालये / संस्थांमध्ये विविध उपक्रम, कार्यक्रम साजरे करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रकः-
महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजात सामाजिक समता, स्त्री शिक्षण, शेतकरी कल्याण व सामाजिक न्याय या क्षेत्रांत केलेले कार्य अद्वितीय आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित, समावेशक व कौशल्याधारित शिक्षणाची जोपासना करण्यासाठी त्यांच्या विचारांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त या विभागाच्या अधिपत्याखालील उच्च शिक्षण / तंत्र शिक्षण / कला / ग्रंथालय संचालनालये व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विद्यापीठे/महाविद्यालये / संस्था यांनी राबवायच्या विविध उपक्रमांचा कृती आराखडा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांनी राबवायच्या उपक्रमांचा कृती आराखडा
तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांनी राबवायच्या उपक्रमांचा कृती आराखडा
कला संचालनालय, मुंबई यांनी राबवायच्या उपक्रमांचा कृती आराखडा
ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांनी राबवायच्या उपक्रमांचा कृती आराखडा

महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्ताने निश्चित करण्यात आलेले उपक्रम, कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी होईल यासाठी संचालक (उच्च शिक्षण), संचालक (तंत्र शिक्षण), संचालक (कला) व संचालक (ग्रंथालय) यांनी आपल्या अधिनस्त राज्यातील सर्व विद्यापीठे / महाविद्यालये/संस्था यांसाठी आवश्यक ते आदेश / सूचना/परिपत्रके निर्गमित करावीत व सदर उपक्रमांच्या अंमलबजावणीकरीता नियोजन व सनियंत्रण करावे. तसेच राबविलेल्या उपक्रमांना प्रसार माध्यमे /समाजमाध्यमे यांद्वारे व्यापक प्रसिद्धी द्यावी.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२६११०४१३३१०४०७०८ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने सक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Digitally signed by DR SHRIKANT LAXMANRAO
PULKUNDWAR
Date: 2026.11.04 13:32:16 +05'30'

(डॉ. श्रीकांत पुलकुंडवार) सह सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण-२०२६/प्र.क्र.३३/समन्वय मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२. 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon