DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

सन २०२५-२६ चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार Aadarsh Shikshak Puraskar 2025-2026

 Aadarsh Shikshak Puraskar 2025-2026


State Teacher Award Declared For Year 2025-26
san 2025-26 che krantijyoti savitrimai phule rajya shikshak gunagaurav puraskar jahir

सन २०२५-२६ चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार.
दिनांक : २७ नोव्हेंबर, २०२६

वाचावे :
१) शासन निर्णय, शिक्षण व सेवायोजन विभाग, क्र. पीटीसी - २१६१/एफ, दिनांक १२ जानेवारी, १९६२.
२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. पीटीसी-२०१०/(९०/१०)/साशि-१, दिनांक १३ जून, २०११
३) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, क्र. संकीर्ण-२०१२/सं.क्र.२४८/१२/टिएनटी-२, दिनांक ०४ सप्टेंबर, २०१४.
४) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. पीटीसी-२०२२/प्र.क्र.३४/टीएनटी-४ दिनांक १६ जुलै, २०२५.
५) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, क्र. पीटीसी-२०२६/प्र.क्र.४६ (क)/टीएनटी-४ दिनांक ११ ऑगस्ट, २०२६.
६) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र.शिसं/राशिपु/२०२५-२६/ए-२/विद्या शाखा, दिनांक २७ ऑगस्ट, २०२६.

प्रस्तावना :
समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात.

२. राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३ पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागांमार्फत राबविली जाते. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारित करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येत आहेत. दिनांक १३ जून, २०११ च्या शासन निर्णयान्वये पुरस्काराची रक्कम रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) अदा करण्यात येते. तसेच राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिनांक ४ सप्टेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम रु.१,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) अदा करण्यात येते.

३. सन २०२५-२६ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दिनांक २५ ऑगस्ट, २०२६ रोजी राज्य निवड समितीची बैठक झाली. राज्य निवड समितीने संदर्भ क्र.६ येथील दिनांक २७ ऑगस्ट, २०२६ च्या पत्रान्वये शिक्षकांची गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय निवड यादी शासनास सादर केली. त्यानुसार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार घोषित करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय :-
सन २०२५-२६ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्रवर्गनिहाय १२३ शिक्षकांची खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निवड केली आहे.
अ.क्र प्रवर्ग पुरस्कार संख्या

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक :- पीटीसी-२०२६/प्र.क्र.४६/टीएनटी-४
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२५-२६ साठी राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या प्राथमिक शिक्षकांची यादी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२५-२६ साठी राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या माध्यमिक शिक्षकांची यादी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२५-२६ साठी राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) शिक्षकांची यादी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२५-२६ साठी राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार यादी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२५-२६ साठी राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या विशेष शिक्षक कला शिक्षकांची यादी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२५-२६ साठी राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या स्काऊट शिक्षकांची यादी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२५-२६ साठी राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या गाईड शिक्षकांची यादी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२५-२६ साठी राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या दिव्यांग शिक्षक/दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक पुरस्कार यादी


शासन निर्णय पीडीएफ लिंक 



Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon