DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

International Day of Older Persons १ ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याबाबत

International Day of Older Persons


 Jagtik Jyeshtha Nagrik divas



1 october jagtik jyeshtha nagrik divas sajara karnyababat


Regarding the celebration of World Senior Citizens Day on October 1st


१ ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याबाबत


महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक क्रमांक: ज्येष्ठना-२०२६/प्र.क्र.१५३/ज्येनाक मंत्रालय विस्तार, मुंबई - ४०० ०३२. दिनांक : २४ सप्टेंबर, २०२६.


वाचा :- शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांकः ज्येष्ठना-२०१६/प्र.क्र.७१/सामासु, दिनांक ९ जुलै, २०१८.


  शासन परिपत्रक :


भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वांमधील अनुच्छेद ३९ (क) व ४१ मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावेत अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या त-हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक/मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण दिनांक ९ जुलै, २०१८ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार, १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात "जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस" (international Day of Older Persons) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्यानुसार राज्यात सर्व ठिकाणी "१ ऑक्टोबर" हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात यावा व त्यानिमित्ताने वृत्तपत्रात जाहिराती देणे, सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीरे, चर्चासत्र/परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कायदे व योजना विषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात यावे.

३. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस राज्यात सर्व जिल्हाधिकारी, सर्व स्थानिक संस्था, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका/नगरपरिषदामार्फत आयोजित करण्यात यावा. सदर दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी वरीलप्रमाणे विविध कार्यक्रम/उपक्रम राबविण्यात यावेत.

४. प्रस्तुत शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२६०९२४१२१८५४५५२२ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

Digitally signed by SNEHA RAMESH BORGE Date: 2026.09.24 12:21:05 +05'30'


(स्नेहा बोरगे) अवर सचिव, महाराष्ट्र शासन

Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon