DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Internal Complaints Committee ICC राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये स्थापन केलेल्या 'अंतर्गत तक्रार समितीची' जिल्हास्तर व तालुकास्तर सविस्तर माहिती सादर करणेबाबत

Internal Complaints Committee ICC

राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये स्थापन केलेल्या 'अंतर्गत तक्रार समितीची' (Internal Complaints Committee-ICC) जिल्हास्तर व तालुकास्तर सविस्तर माहिती सादर करणेबाबत


Antargat Takrar Samiti

rajyatil sarv prathamik v madhyamik shalanmadhye sthapan kelelya 'antargat takrar samitichi' (Internal Complaints Committee-ICC) jilhastar v talukastar savistar mahiti sadar karanebabat

Regarding submission of detailed information at district and taluka levels of the 'Internal Complaints Committee-ICC' established in all primary and secondary schools in the state


महाराष्ट्र शासन

प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे

प्राधान्याने क्र. प्राशिसं/संकीर्ण-८०२/अंतस-समा/२०२६

दिनांक Digitally Signed


प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परीषद (सर्व)

३) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)

४) शिक्षण निरीक्षक (दक्षिण / पश्चिम / उत्तर), बृहन्मुंबई


    विषय - राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये स्थापन केलेल्या 'अंतर्गत तक्रार समितीची' (Internal Complaints Committee-ICC) जिल्हास्तर व तालुकास्तर सविस्तर माहिती सादर करणेबाबत

संदर्भ :- स्टेट नोडल ऑफिसर तथा प्रशासन अधिकारी, शिक्षण आयुक्तालय, महा. राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आशिका २०२६/आस्था-क १४३/अंतस., दि. २०/०७/२०२६


उपरोक्त विषयास अनुसरुन, आयुक्तालयाचे "राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये स्थापन केलेल्या 'अंतर्गत तक्रार समितीची' (Internal Complaints Committee-ICC) जिल्हास्तर व तालुकास्तर सविस्तर माहिती सादर करणेबाबत" चे पत्र संचालनालयास प्राप्त झाले आहे. (प्रत संलग्न)

विषयांकित प्रकरणी, आयुक्तालयाचे संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आल्यानुसार, "कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम, २०१३ मधील तरतुदींनुसार, राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमध्ये अंतर्गत तक्रार समिती (Internal Complaints Committee) स्थापना करणे बंधनकारक आहे.

शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी तसेच शालेय स्तरावर महिला कर्मचारी व विदयार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समितीचे गठन अत्यंत महत्त्वाचे असून, राज्यातील किती शाळांनी या समितीची स्थापना केली आहे, याचा अद्ययावत डेटा आयुक्तालय स्तरावर संकलित केला जात आहे.

त्यास अनुसरून, आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व संबंधित यंत्रणांकडुन खालील मुद्दयांच्या आधारे जिल्हास्तर व तालुकास्तर सविस्तर माहिती संकलित करण्यात यावी.


माहितीचे प्रमुख मुद्दे-

१. एकूण शाळांची संख्या (तालुका व जिल्हा निहाय).

२. अंतर्गत तक्रार समिती स्थापन केलेल्या शाळांची संख्या व टक्केवारी.

३. समिती स्थापन न केलेल्या शाळांची संख्या व त्याबाबत केलेली/प्रस्तावित कारवाई.

माहिती संदर्भिय पत्रासोबत प्राप्त झालेल्या खालील विहित प्रपत्रात (Format) संकलित करून, एकत्रित (Consolidated) अहवाल दि. २१/०८/२०२६ पर्यंत प्राथमिक/माध्यमिक संचालनालयास, hard copy, soft copy (Excel Sheet मध्ये) सादर करावा.

माहिती सादर करावयाचा विहित नमुना

सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये स्थापन केलेल्या 'अंतर्गत तक्रार समितीची' (Internal Complaints Committee-ICC) जिल्हास्तर व तालुकास्तर सविस्तर माहिती प्राथमिक ची माहिती

(प्राथमिक शाळांची माहिती-प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे व माध्यमिक शाळांची माहिती-माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे सादर करावी.)


अ. क्र.

जिल्हयाचे नाव

तालुक्याचे नाव

एकुण प्राथमिक/माध्यमिक शाळांची संख्या

अंतर्गत तक्रार

समिती स्थापन केलेल्या शाळांची संख्या

समिती स्थापन न केलेल्या शाळांची

संख्या

टक्केवारी

शेरा /केलेली /प्रस्तावित कारवाई

Sd/-

सक्षम प्राधिका-याचे नाव, पदनाम व स्वाक्षरी सह


सहपत्र संदर्भिय पत्र


Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 26-08-2026 08:34:17

(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक), माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 26-08-2026 07:29:56

(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे


प्रत माहितीस्तव - स्टेट नोडल ऑफिसर तथा प्रशासन अधिकारी, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे


परिपत्रक पीडीएफ लींक 


राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये स्थापन केलेल्या 'अंतर्गत तक्रार समितीची' (Internal Complaints Committee-ICC) जिल्हास्तर व तालुकास्तर सविस्तर माहिती सादर करणेबाबत



Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon