DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

SHVR Portal Link शाळांमध्ये स्वच्छता, हरितपणा आणि सर्व समावेशक उत्तमपणे शालेय वातावरण नियमितपणे टिकवून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२६-२७ मध्ये सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सहभाग घेण्याबाबत

SHVR Portal Link


SHVR Portal Link SHVR MOBILE APP LINK

shalanmadhye swachchata, haritpana aani sarv samaveshak uttampane shaley vatavaran niyamitpane tikvun thevanyasathi shaley shikshanatun vartanatmak parivartan, swachchata, swachchatebabatchya savayee aani paryavarniy sanrakshan rakhanyasathi swachh aani harit vidyalay mulyankan (SHVR) 2026-27madhye sarv vyavsthapananchya shalannee sahbhag ghenyababat

Regarding the participation of schools of all managements in the Clean and Green School Assessment (SHVR) 2026-27 to maintain cleanliness, greenery and an all-inclusive school environment on a regular basis, to promote behavioral change, cleanliness, hygiene habits and environmental protection through school education.


समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा.क्र. मप्राशिप/समग्र शिक्षा/SHVR/१/२०२६-२७/

प्रति, मा. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय : शाळांमध्ये स्वच्छता, हरितपणा आणि सर्व समावेशक उत्तमपणे शालेय वातावरण नियमितपणे टिकवून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२६-२७ मध्ये सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सहभाग घेण्याबाबत.

संदर्भ: केंद्रशासनाचे पत्र क्रमांक D.O.No.३-१/२०२६-SHVR, दि. १५/०७/२०२६

महोदय,

उपरोक्त संदर्भिय पत्राचे कृपया अवलोकन करावे.

स्वच्छ आणि हरित विद्यालय (SHVR) २०२५-२६ च्या यशाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत (SHVR) २०२६-२७ ची अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे. SHVR २०२६-२७ साठीची अंमलबजावणी रूपरेषा, मूल्यमापन पद्धती आणि मूल्यांकन प्रक्रिया या SHVR २०२५-२६ प्रमाणेच राहतील. शाळांची नोंदणी व स्वमूल्यांकन सुलभ करण्यासाठी SHVR पोर्टल आणि मोबाईल अॅप दि. १ ऑगस्ट २०२६ पासून कार्यान्वित करण्यात येतील, वैध UDISE + कोड असलेल्या सर्व शाळांनी SHVR पोर्टल किंवा मोबाईल अॅपद्वारे SHVR २०२६-२७ मध्ये अनिवार्यपणे सहभागी व्हावे.

SHVR २०२६-२७ साठी राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शन कार्यक्रम NCERT आणि UNICEF यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येतील.

SHVR २०२६-२७ हा कार्यक्रम देशातील वैध UDISE कोड असलेल्या सर्व शाळांसाठी अनिवार्य राहील. यात शासकीय, अनुदानित, खासगी, निवासी, आदिवासी, अल्पसंख्याक शाळांचा समावेश असेल. शाळांचे मूल्यमापन खालील सहा विषयाधारित क्षेत्रांमध्ये करण्यात येईल :

पाणी (Water)

शौचालये (Toilets)

साबणाने हात धुणे (Handwashing with Soap) संचालन व देखभाल (Operation & Maintenance) वर्तन परिवर्तन व क्षमता विकास (Behavlour Change & Capacity Buliding)bमिशन LIFE उपक्रम (Mission LIFE Activities)

SHVR पोर्टल हे शाळांमधील पाणी, स्वच्छता व स्वच्छताविषयक सवयी (WASH), शाश्वतता आणि मिशन LIFE उपक्रमांशी संबंधित माहितीचे राष्ट्रीय भांडार म्हणून कार्यरत राहील.

यामुळे जिल्हास्तरावर पुराव्यावर आधारित नियोजन, देखरेख आणि अहवाल निर्मिती सुलभहोईल.

शाळांची नोंदणी व स्वमूल्यांकन सुलभ करण्यासाठी SHVR पोर्टल आणि मोबाईल अॅप दि. १ ऑगस्ट २०२६ पासून कार्यान्वित करण्यात येतील. वैध UDISE कोड असलेल्या सर्व शाळांनी SHVR पोर्टल किंवा मोबाईल अॅपद्वारे SHVR २०२६-२७ मध्ये अनिवार्यपणे सहभागी होणेबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना सूचना देण्यात याव्यात.

सर्वेक्षणातील प्रश्नांचा अपवाद वगळता, सद्यस्थितीत कृपया SHVR २५-२६ च्या मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ घ्यावा. नवीन मार्गदर्शक तत्त्वे लवकरच उपलब्ध करून दिली जातील. सोबत स्वच्छ आणि हरित विद्यालय (SHVR) २०२६-२७ अंमलबजावणी वेळापत्रक जोडण्यात येत आहे.

आपला विश्वासू,

Digitally signed by Devidas Balkrishna Kulal Date: 20-07-2026 17:02:48

(देविदास कुलाळ)

सहसंचालक (प्रशासन) म.प्रा.शि.प., मुंबई.


प्रत माहितीस्तवः-

१) मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई. २) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.

३) मा. आयुक्त, महानगरपालिका, सर्व.

शाळांमध्ये स्वच्छता, हरितपणा आणि सर्व समावेशक उत्तमपणे शालेय वातावरण नियमितपणे टिकवून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२६-२७ मध्ये सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सहभाग घेण्याबाबत


Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon