DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Rangotsav Karyakram पूर्व तयारी स्तर व पूर्व माध्यमिक स्तरावरील (प्राथमिक) शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम (सन २०२६-२७) आयोजन करणेबाबत रंगोत्सव कार्यक्रम सन २०२६-२७ मार्गदर्शक सूचना

Rangotsav Karyakram




purv tayari star v purv madhyamik staravaril (prathmik) shikshakansathi rangotsav karyakram (san 2026-27) aayojan karanebabat

Regarding the organization of the 'Rangotsav' program for teachers at the pre-preparatory and pre-secondary (primary) levels (Year 2026-27).

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

जा.क्र. राशैसंप्रपम/कला व क्रीडा/रंगोत्सव कार्यक्रम / २०२६-२७ /

दिनांक:- स्वाक्षरीखाली नमूद आहे.

प्रति,

१. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व),

२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),

३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जि. प. (सर्व),

४. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई.

  विषयः - पूर्व तयारी स्तर व पूर्व माध्यमिक स्तरावरील (प्राथमिक) शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम (सन २०२६-२७) आयोजन करणेबाबत...

संदर्भ :-

१. GOI, MOE, Dept. Of School Education & Literacy, Samagra Shiksha PAB Minutes, F.No.१०-३/२०२६-९९.१, Dated 16 June, 2026.

२. Final Recommendation Sheet for Minutes (Samagra Shiksha of Maharashtra) GOI, MOE, Dept. Of School Education & Literacy, Samagra Shiksha, Dated 15 June,2026.

३. PAB Details Sheet, Dept. Of School Education & Literacy, Samagra Shiksha, (Quality Intervention -Experiential Learning (Elementary)- Rangotsav).

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार, पूर्व तयारी स्तर व पूर्व माध्यमिक स्तरावरील (प्राथमिक) शाळांतील इयत्ता ३ री ते इयत्ता ८वी च्या विद्यार्थी/शिक्षकांसाठी राज्यस्तर रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अनुभवात्मक शिक्षणाच्या द्वारे (Experiential Learning) शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग, स्वयं-पुढाकार, स्वयं-दिशा, स्वयं-शिस्त, संघ भावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

सदर रंगोत्सव कार्यक्रम राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता ३ री ते इयत्ता ८ वी च्या शाळांसाठी खुला आहे.

तद्नुषंगाने रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत अनुभवात्मक अध्ययन (Experiential Learning) आधारित उत्कृष्ट कृती राज्यस्तरावर सादरीकरण करण्याची संधी विद्यार्थी व शिक्षकांना प्राप्त होणार आहे. शाळांनी कला एकात्मता (Arts Integration), क्रीडा एकात्मता (Sports Integration), खेळण्यावर आधारित अध्यापनशास्र (Toy Based Pedagogy), व गोष्ट सांगणे (Story Telling) या चार मुद्द्यांच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन-अध्यापन करतांनाचे विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडीओची लिंक (०८ ते १० मिनिटांचे व्हिडीओ) व आवश्यक माहिती

https://forms.gle/KAbSZoVGLaSEZihL8

या लिंकमध्ये भरून पाठविणे आवश्यक आहे. सदर लिंकवर दि. २४/०७/२०२६ ते दि. ३०/०८/२०२६ या कालावधीत, शिक्षकांनी व्हिडीओची लिंक पेस्ट करावयाची आहे.

  रंगोत्सव कार्यक्रमासंदर्भात करावयाची कार्यवाही :-

सदर रंगोत्सव कार्यक्रमाच्या सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांनी आपले कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना निर्गमित करावेत. रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत सादरीकरणाच्या व्हिडीओची गुगल ड्राईव्ह वरील लिंक,

https://forms.gle/KAbSZoVGLaSEZihL8

या गुगल लिंकवर पेस्ट करणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक माहिती सदर लिंक वर भरणे बाबतही शाळांना सूचित करावे व लिंक भरण्यास सांगावे. रंगोत्सव कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम मुदत दि. ३० ऑगस्ट, २०२६ सायंकाळी ठीक ६.०० वाजेपर्यंत असेल, हे सुद्धा सूचित करण्यात यावे. तथापि सदर कार्यक्रमांत सहभाग घेणाऱ्या शिक्षकांनी सादर केलेल्या व्हिडीओला अक्सेस (Anyone with the Link) देणे आवश्यक आहे, असेही आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.

उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांचे मार्फत रंगोत्सव कार्यक्रमाच्या सूचना शालेय स्तरावर निर्गमित होत असल्याची खातरजमा करावी. तसेच रंगोत्सव कार्यक्रमाचा जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत / जिल्हास्तरीय बैठकीत आढावा घेण्यात यावा.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना राज्यस्तरावरून रंगोत्सव उपक्रमाचे प्राप्त व्हिडीओ जिल्हानिहाय वर्गीकरण करून पाठविण्यात येतील. जिल्हास्तरावर, जिल्हानिहाय प्राप्त व्हिडीओचे आपले अधिकारी अथवा अन्य शिक्षणतज्ज्ञ परीक्षक यांचे मार्फत परीक्षण (दि. ०७ सप्टेंबर, २०२६ पर्यंत) करून रंगोत्सव कार्यक्रमाचे ०५ उत्कृष्ट अध्ययन कृर्तीचा समावेश असलेल्या व्हिडीओची लिंक आपल्या विभागातील प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA)/ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना कळविण्यात येऊन या कार्यालयास अवगत करण्यात यावे.

तद्नंतर राज्यातील प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर, लातूर, नाशिक, पुणे व नागपूर यांना सदर रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत प्राप्त व्हिडीओचे विभागस्तरावर जि.शि.व प्र.सं मधील वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता यांचे मार्फत किंवा आवश्यक असल्यास बाह्य परीक्षक नियुक्त करून परीक्षणाचे
कामकाज पूर्ण करावयाचे आहे. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी रंगोत्सव कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागातून ०३ उत्कृष्ट विद्यार्थी व शिक्षक यांचे संघ अशी नामनिर्देशने परिषदेतील कला व क्रीडा विभागाच्या arts.sportsdept@maa.ac.in या ई मेल आयडी वर दि. १६ सप्टेंबर, २०२६ पर्यंत पाठवावयाचे आहेत.

राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) येथे रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत आठ विभागाकडून प्राप्त २४ उत्तम अध्ययन कृर्तीच्या शिक्षक व विद्यार्थी यांच्या संघांना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येईल.

रंगोत्सव राज्यस्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन अंदाजे दिनांक ०२ ते ०७ डिसेंबर, २०२६ या कालावधीत कोणत्याही एका दिवशी करण्याबाबतचे आदेश संबंधितास देण्यात येतील. रंगोत्सव कार्यक्रम राज्यस्तरापर्यंतच मर्यादित आहे. राज्यस्तरावर रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत सादरीकरणासाठी उपस्थित राहणाऱ्या संघांना / विद्यार्थी व शिक्षक यांना प्रवासभत्ता, निवास व भोजन याची व्यवस्था परिषदेतर्फे नियमानुसार करण्यात येईल.

उपरोक्त सविस्तर माहिती आपल्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालये व शाळांना देण्यात यावी. रंगोत्सव कार्यक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षक यांचा सहभाग घेतील याची दक्षता घेण्यात यावी.

रंगोत्सव कार्यक्रमासाठीच्या मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्या आहेत. त्याचे अवलोकन करून, त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.

   सोबत :- रंगोत्सव कार्यक्रम मार्गदर्शक सूचना

Digitally signed by HEMANT VASEKAR
Date: 28-07-2026
15:47:25
(डॉ. हेमंत वसेकर भा.प्र.से.)

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर:-

मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.

मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे- १

शिक्षण संचालक (प्राथमिक/ माध्य. व उच्च माध्य.), शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे- १

     रंगोत्सव कार्यक्रम सन २०२६-२७ :- मार्गदर्शक सूचना

१. एका शाळेतील एका वेळी एकच संघ सहभागी होऊ शकेल.

२. इयत्ता ३री ते इयत्ता ८ वी चे विद्यार्थी व शिक्षक सहभागी होऊ शकतात.

३. एका संघ मध्ये ०६ ते ०८ विद्यार्थी, व ०२ शिक्षक (०१- पुरुष व ०१- महिला) यांचा समावेश असेल.

४. संघ हा पूर्ण मुलांचा / मुलींचा किवा मुलामुलींचा एकत्र, असा असेल.

५. मोबाईलवर चित्रण केलेला व्हिडीओ चालेल.

६. साधारण ८ ते १० मिनिटांच्या व्हिडीओची लिंक राज्यस्तरावरील लिंक वर पेस्ट करावी.

७. राज्यस्तरावर प्रत्यक्ष सादरीकरणाचा कालावधी ०५ मिनिटाचा राहील.

८. सन २०२३-२४, सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात रंगोत्सव कार्यक्रमात राज्यस्तरावर सहभाग घेतलेल्या शाळांना व संबंधित शिक्षक यांना सहभाग घेता येणार नाही.

९. सादरीकरण करण्यात येणाऱ्या व्हिडीओचे या पूर्वी राज्यस्तरावर सादरीकरण झालेले नसावे.

१०. खालील विषयावर व्हिडीओ पाठविण्यात यावे.

i) कला एकात्मता (Art Integration).

II) क्रीडा एकात्मता / एकत्रीकरण (Sports Integration.)

III) खेळण्यावर आधारित अध्यापनशास्त्र (Toy Based Pedagogy).

IV) गोष्ट सांगणे (Story Telling).

११. शिक्षक वर्गात अध्यापन करत असतांना सर्व समावेशक अध्ययन अध्यापन कृती, विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त व शाब्दिक प्रतिसाद आदि बाबींचा समावेश वर्ग अध्यापनात असावा व त्याचे चित्रीकरण करून सदर व्हिडीओ गुगल लिंक

https://forms.gle/KAbSZoVGLaSEZihL8

या लिंकवर पेस्ट करावी. तसेच व्हिडीओचा Access - Anyone with Link देण्यात यावा.

        व्हिडीओ संबंधित निकष :-

१. व्हिडीओ चित्रीकरण करताना मोबाईल आडवा धरून शूट केलेला असावा.

२. उपरोक्त कोणत्याही एका विषयावर व्हिडीओ शूट केलेला असावा.

३. व्हिडीओचा दर्जा उत्तम असावा.

४. व्हिडीओ पाठवतांना सदर व्हिडीओची गुगल ड्राईव्ह लिंक पाठवावी.

५. व्हिडीओ मराठी, इंग्रजी, हिंदी यापैकी कोणत्याही एका भाषेतील असावा.


पूर्व तयारी स्तर व पूर्व माध्यमिक स्तरावरील (प्राथमिक) शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम (सन २०२६-२७) आयोजन करणेबाबत

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon