Mofat Ganavesh Yojana Sudharit GR
Sudharit Mofat Ganavesh Yojana GR
Mofat Ganavesh Yojanechya Sudharnebabat Shasan Nirnay
Government decision regarding the improvement of the free uniform scheme
मोफत गणवेश योजनेच्या सुधारणेबाबत शासन निर्णय
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः एसएसए-१२२०/प्र.क्र.१५४/एस.डी.३
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ दिनांकः २९ मे, २०२६
वाचा :-
१) शासन निर्णय क्रमांक एसएसए १२२०/प्र.क्र.१५४/एसडी-३, दि.०८ जून, २०२३
२) शासन निर्णय क्रमांक एसएसए १२१४/प्र.क्र.५०/एसडी-३, दि.०६ जुलै, २०२३
३) शासन निर्णय क्रमांक एसएसए १२२०/प्र.क्र.१५४/एसडी-३, दि.२० डिसेंबर, २०२४
४) शासन निर्णय क्रमांक एसएसए १२२०/प्र.क्र.१५४/एसडी-३, दि.०२ एप्रिल, २०२५
प्रस्तावना :
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. सन २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षापासून राज्य योजनेतून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्यात येतो. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्याचा निर्णय दि.२० डिसेंबर, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. तसेच, सदर शासन निर्णयान्वये गणवेशाचा रंग व रचना निश्चित करण्यात आली होती. दि.०२ एप्रिल, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मोफत गणवेश योजनेंतर्गत गणवेशाचा रंग व रचनादेखील स्थानिक पातळीवर निश्चित करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात आले आहेत. यामध्ये अंशतः बदल करुन मोफत गणवेश योजनेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
१) जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक यांच्या नियंत्रणाखाली शिक्षणाधिकारी (प्राथ.) / प्रशासन अधिकारी यांनी जिल्ह्यातील गावागावांमध्ये सर्व गणवेश पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यासाठी योजनेची अंमलबजावणी करावी.

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon