DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

शासन निर्णय निघाला जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू Juni Nivrutti Yojana Z P Karmcharyana Lagu

 Juni Nivrutti Yojana Z P Karmcharyana Lagu

Juni Nivrutti Yojana Z P Karmcharyana Lagu


खुशखबर! मोठी बातमी! जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू 

Old pension scheme also applicable to Zilla Parishad employees

WhatsApp Channel Follow Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now


दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.०१.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ लागू करताना अवलंबावयाची कार्यपद्धती जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांना लागू करण्याबाबत.

तारीखः २४ मार्च, २०२६

वाचा :-

१) शासन निर्णय वित्त विभाग क्रमांकः संकीर्ण-२०२३/प्र.क्र.२६/सेवा-४, दि.०२.०२.२०२४

२) शासन निर्णय वित्त विभाग क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१८/सेवा-४, दि.०२.०५.२०२४

३) शासन निर्णय ग्रामविकास विभाग क्रमांकः जिपअ२०२७/ प्र. क्र.५५/आस्था-४, दि.०१.१०.२०२४

प्रस्तावना :-

वित्त विभागाकडील संदर्भाधीन क्र.२ येथील दि.०२.०५.२०२४ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.०१.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ लागू करताना अवलंबावयाची कार्यपद्धती निर्गमित केली आहे. सदरहू कार्यपद्धती जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचारी यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक-संकीर्ण-२०२४/प्र.क. १८/सेवा-४, दिनांक ०२.०५.२०२४ मधील दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दि.०१.०१.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ लागू करताना अवलंबावयाची कार्यपद्धती योग्य त्या फेरफारासह जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचा-यांना लागू करण्यात येत आहे.

२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र जिल्हा परिषदा पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच) च्या कलम २४८ च्या परंतुकान्चये प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच वित्त विभागाने दिनांक १८.०३.२०२६ रोजीच्या टिप्पणीन्चये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेताक २०२६०३२४१५१०१५२६२० असा आहे. 

हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक


SUBHASH

BABAN INGALE

(सुभाष इंगळे) उप सचिव, महाराष्ट्र शासन


महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांकः वेतन-२०२६/प्र.क्र.३४ (ई.क्र.१५७०६१५)/आस्था-४ बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ फोर्ट, मुंबई- ४०० ००१ 

Juni Nivrutti Yojana Z P Karmcharyana Lagu


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon