SQAAF Self Assessment
Link for self-assessment in SQAAF 2025-2026
Shala Gunvatta Mulyankan aashvaasan Aarakhada SQAAF 2025-2026 Swyam Mulyankan
जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/SQAAF/२०२६/ दि.
विषय : शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) सन २०२५-२०२६ मध्ये होणाऱ्या स्वयं मूल्यांकना बाबत.
संदर्भ :
१. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४
२. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४
३. मा. संचालक सो. SCERT, PUNE यांचेकडील मान्य टिपणी
उपरोक्त संदर्भ क्र. १ नुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संदर्भ क्र. २ नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची (SQAAF) निर्मिती करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र. ३ नुसार सन २०२५-२०२६ मध्ये सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAF टॅबमध्ये स्वयं-मूल्यांकनासाठीची लिंक दि.२७ फेब्रुवारी २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरील लिंक द्वारे आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांचे सन २०२५-२६ मधील SQAAF स्वयं मूल्यांकन पूर्ण करणे आवश्यक आहे.
तरी, सन २०२५-२०२६ मध्ये होणाऱ्या स्वयं-मूल्यांकनाबाबत पूर्व तयारीच्या सूचना आपल्या स्तरावरून शाळांना ऑनलाइन / ऑफलाइन बैठकीचे आयोजन करून देण्यात याव्यात.
Digitally signed by
HEMANT SHARACHCHANDRA VASEKAR Date: 17-02-2026 15:03:38
(डॉ. हेमंत वसेकर, भा.प्र.से.)
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रति, विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व) प्रशासनाधिकारी मनपा/नपा (सर्व)
शिक्षण निरीक्षक, मुंबई (सर्व)
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
संपर्क क्रमांक (०२०)२४४७८१२२
ईमेल: sqaafmh@maa.ac.in
प्रत माहितीस्तव सविनय सादर :
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे
३. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon