DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

MSRTC Tirthatan Scheme हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन योजना

 MSRTC Tirthatan Scheme

MSRTC Tirthatan Scheme हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन योजनेबाबत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now


ST Sange Tirthatan Yojana

ST with Pilgrimage scheme

MSRTC Tirthatan Scheme

Regarding the implementation of the 'Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray ST Sange Tirthatan' scheme

Regarding the implementation of the 'Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray ST with Pilgrimage' scheme

राप/वाह/चालन / ५४५
परिपत्रक क्र. ०२/२०२६

दिनांक:- ० जानेवारी २०२६.
https://eshala.in/st-sange-tirthatan-yojana/

विषय :- 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन' योजनेबाबत.

संदर्भ :- जाक्र/मंत्री/परिवहन/जनरल /५०/२०२६, दिनांक २९.०१.२०२६.

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त मा. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तथा मंत्री (परिवहन) महाराष्ट्र राज्य यांनी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन' योजना राबविणेबाबत घोषणा केली आहे.

हे ही वाचा -

महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" राबविण्यास मान्यता देणेबाबत.
महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक:- ज्येष्ठना-२०२४/प्र.क्र.१८९/सामासु मंत्रालय, विस्तार, मुंबई- ४०००३२ दिनांक :- १४ जुलै, २०२४ वाचा या ओळीला स्पर्श करून

सदर योजना ही सर्वसामान्य नागरीकांना / प्रवाशांना परवडेल अशा दरात 'स्वस्त व सुरक्षित' धार्मिक पर्यटन उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात येत असुन राज्य शासनाने एसटी प्रवासासाठी विविध सामाजिक घटकांना दिलेल्या सर्व सवलती या योजनेत लागू राहणार आहेत. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत व ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास या सुविधा सदर योजनेत समाविष्ट आहेत. प्रत्येक आगारातून किमान ४० प्रवाशांचे गट तयार करुन नियोजित तीर्थक्षेत्राच्या सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर योजनेमुळे धार्मिक पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे. प्रवाशांसाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक वैभवाचा अनुभव घेण्याची ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

या अनुषंगाने सर्व विभाग नियंत्रक यांना 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन' योजनेची अंमलबजावणी करणेबाबत खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.

रा.प. महामंडळाच्या दैनंदिन वाहतूकीव्यतिरिक्त जादा वाहतूक, विशेष बससेवा वाहतुक तसेच विविध धार्मिक व पर्यटनस्थळी नियोजनपूर्वक पॅकेज टुर्स अंतर्गत वाहतूक करुन महामंडळाचे वाहतूक उत्पन्नात वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सदर पॅकेज टुर्स वाहतुकीचे नामकरण 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन' असे करण्यात येत आहे.

रा.प. महामंडळामार्फत आगार / विभागीय पातळीवर विविध धार्मिक व पर्यटनस्थळी जाण्यासाठी संबधित आगार व्यवस्थापक / विभाग नियंत्रक यांनी तीर्थाटन सहलीचे स्वतः नियोजन करुन बसेस उपलब्ध करुन देण्यात याव्यात किंवा ४० प्रवाशांचा गट आल्यास त्यांचे मागणीनुसार बसेस उपलब्ध करुन देण्यात याव्यात तीर्थाटन सहली आयोजनाबाबत खालील सुचना विचारात घेण्यात याव्यात.

१. महिनानिहाय येणारे विविध सण / उत्सव विचारात घेऊन विभागांनी शालेय सुटीच्या दिवशी, सलग सुटी कालावधीत विविध मार्गाकरिता तीर्थाटन सहली नियोजन करावे. उदा. पावसाळी हंगामात विविध मान्सुन पर्यटनस्थळे, श्रावण सोमवारी महादेव मंदिराच्या स्थळांकरिता, अष्टविनायक दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, नवरात्रीमध्ये साडेतीन शक्तीपीठ दर्शन, तुळजापूर दर्शन, अक्कलकोट दर्शन, पंढरपूर दर्शन, किल्ले दर्शन, सागरी पर्यटन, थंड हवेची ठिकाणे, अभयारण्य, ताडोबा, चिखलदरा इत्यादी विविध ठिकाणांकरिता प्रवासी गरजेनुसार तीर्थाटन सहली तयार करुन चालविण्यात यावीत.

२. विविध धार्मिक व पर्यटन स्थळासाठी प्रवाशांकडुन मागणी आल्यास ४० प्रवाशांच्या गटासाठी तीर्थाटन सहलीसाठी बस उपलब्ध करुन देण्यात यावी.

३. तीर्थाटन सहली (पॅकेज टुर्स) तयार करतांना प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सामाजिक संस्था / देवस्थान ट्रस्ट यांच्याशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार निवास व भोजनाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावी.

४. तीर्थाटन सहली नियोजन करतांना विविध पर्यटनस्थळाबाबत शासनाकडून/स्थानिक प्रशासनाकडून असलेले निर्बंध / सूचनांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी.

५. तीर्थाटन सहली अंतर्गत बसेसचे मार्ग निश्चित करतांना ०१ किंवा त्यापेक्षा अधिक दिवसाचे मार्ग निश्चित करुन अंतराप्रमाणे तिकीट दर आकारणीकरुन प्रवास भाडे निश्चित करण्यात यावे.

६. राज्य शासनाने रा.प. महामंडळाच्या बसेसमधुन विविध सामाजिक घटकांना प्रवास भाड्यात दिलेल्या सवलती महाराष्ट्र राज्याचे हद्दीपर्यंत अनुज्ञेय राहतील.

७. विशेषतः महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाडयात अनुज्ञेय असलेली ५० टक्के सवलत व ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लागू असलेली मोफत प्रवास सवलतधारी प्रवाशांना सदर योजनेचा लाभहोईल या दृष्टीने तीर्थाटन सहलीचे आयोजन करण्यात यावे.

८. तीर्थाटन सहलीमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांकडुन देखील प्रवास भाडयामध्ये अपघात सहायता निधी रक्कम समाविष्ट असल्याने अपघात नुकसान भरपाई प्रकरणी रा.प. नियमानुसार परिपत्रकीय सुचना लागू राहतील.

९. नीर्थाटन सहलीमध्ये निवास, चहा/नास्ता व भोजनाची सोय संबंधित प्रवाशांनी स्वखर्चाने करावी. मात्र मुक्कामाचं ठिकाण ठरविण्यासाठी रा.प. महामंडळाकडुन मदत करण्यात यावी.

१०. नीर्थाटन सहलीसाठी किमान ३५ सीटचे आरक्षण होणे आवश्यक राहील. प्रवासी प्रतिसाद कमी असल्यास प्रवासाची तारीख बदलण्याची अथवा १००% परतावा देण्याची तरतुद राहील.

११. प्रवाशांच्या मोयीसाठी तीर्थाटन सहलीचे आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

१२. विभागांकडून आयोजित करण्यात आलेल्या तीर्थाटन सहलीबाबत रा.प. महामंडळाच्या संकेतस्थळावर, स्थानिक परिसरात, समाज माध्यमांवर व्यापक प्रसिध्दी करण्यात यावी. रा.प. महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दी करणंसाठी वाहतूक खाते, मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधून कार्यवाही करावी.

१३. खाजगी एजंट/संस्थेमार्फत /पंकज टुर्स ऑपरेटर्स यांचेकडुन पॅकेज टुर्स बससेवेसाठी आगार/विभागास बसेसची मागणी आल्यास सदर योजनेअंतर्गत धार्मिक व पर्यटनस्थळी बसेस उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

१४. खाजगी एजंट / पॅकेज टुर्स ऑपरेटर्स यांनी प्रस्तावित मार्ग व त्याप्रमाणे नियोजन विभाग नियंत्रक यांना सादर करावे. त्याप्रमाणे संबंधित विभागाने नमुद मार्गाचे प्रवास भाडे आकारणी ठरविण्यात यावी. ग्रुप बुकिंग आरक्षणास बस उपलब्ध करुन देण्यात यावी. सदर तीर्थाटन सहलीसाठी देखील प्रवाशांना प्रवास भाडयातील विविध सामाजिक घटकांना देण्यात आलेल्या सवलती लागू राहतील.

१५. खाजगी एजंट / पॅकेज टुर्स ऑपरेटर्स यांचेमार्फत आरक्षित करण्यात येणारे टुर्स बाबत खाजगी एजंट /पॅकेज टुर्स ऑपरेटर्स यांनी स्वताः व स्वखर्चाने प्रसिद्धी करावी.

१६. खाजगी एजंट / पॅकेज टुर्स ऑपरेटर्स यांचेमार्फत आरक्षित करण्यात येणा-या तीर्थाटन सहलीकरिता प्रवासा दरम्यान चहा, नास्ता, जेवण व राहण्याची व्यवस्था ही सर्व व्यवस्था ठरविलेल्या अधिकृत एजंटव्दारे राहिल. याबाबत कोणतीही जबाबदारी रा.प. महामंडळाची राहणार नाही. चहा, नास्ता, जेवण व राहण्याची व्यवस्थेबाबत तक्रारी निराकरण करण्याची जबाबदारी एजंटची राहिल.

१७. तीर्थाटन सहलींचे नियोजनासाठी प्रत्येक आगार पातळीवर व विभागीय पातळीवर समन्वयक अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी. समन्वयक अधिकारी यांनी आपले आगार/विभाग मार्फत विविध प्रसंगी तीर्थाटन सहलीचे नियोजन करुन अंमलबजावणीबाबतची कार्यवाही करण्यात यावी.

१८. समन्वयक अधिकारी यांनी तीर्थाटन सहलीचे पुर्व नियोजन करुन आवश्यक बसेसबाबत आगार व्यवस्थापक/विभाग नियंत्रक यांना दिनांक निहाय तपशील सादर करावा जेणेकरुन बसेसचे नियोजन करणे सुलभ होईल.

-वरील सुचनांनुसार 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन' योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी.

उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक


प्रति,
विभाग नियंत्रक,
रा.प.मुंबई / ठाणे / पालघर / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग / नाशिक / अहिल्यानगर / धुळे / जळगांव / पुणे /सातारा/कोल्हापूर / सांगली / सोलापूर / छत्रपती संभाजी नगर / नांदेड / बीड / परभणी / धाराशिव / लातूर / जालना /नागपूर / चंद्रपूर / गडचिरोली / भंडारा / वर्धा / अमरावती / यवतमाळ / अकोला / बुलडाणा विभाग.
MSRTC Tirthatan Scheme हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन योजनेबाबत


Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon