School Quality Assurance & Accreditation Framework SQAAF
शाळा गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास (School Quality Assurance & Accreditation Framework-SQAAF) मान्यता प्रदान करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक: १५ मार्च, २०२४
वाचा :- संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र क्र. राशैसंप्रप/संकीर्ण/ SQAAF/२०२४/४६९, दि.१९.०१.२०२४
प्रस्तावना :-
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील परि. ८ मध्ये शालेय शिक्षणासाठी मानक ठरविणे व अधिस्वीकृती याबाबत सविस्तर उहापोह करण्यात आला आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील परि. ८.५ (D) खालील प्रमाणे आहे.
'राज्यातील शैक्षणिक मानके आणि अभ्यासक्रमांसह शैक्षणिक बार्बीचे संचालन SCERT (NCERT च्या सल्ल्याने आणि सहकार्याने) करेल. SCERT ला एक संस्था म्हणून पुनरुज्जीवित केले जाईल. SCERT सर्व हितसंबंधींशी विस्तृत सल्लामसलत करुन शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि अधिस्वीकृती फ्रेमवर्क (SQAAF) विकसित करेल. CRC, BRC आणि DIET यांच्या पुनरुज्जीवनासाठी "परिवर्तन व्यवस्थापन प्रक्रिया" देखील SCERT राबवेल. ज्याद्वारे या संस्थांची क्षमता आणि कार्यसंस्कृती ३ वर्षात बदलून त्या उत्कृष्ट कार्यक्षम संस्था म्हणून विकसित होतील. दरम्यान, शाळा सोडण्याच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना सक्षमता प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया प्रत्येक राज्यातील मूल्यांकन/परीक्षा मंडळांद्वारे हाताळली जाईल.'
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी 'सार्थक' ही पुस्तिका तयार करण्यात आली असून त्याद्वारे एकूण २९७ टास्क्स निश्चित करण्यात आले आहेत. त्यातील टास्क क्र. २१५ खालीलप्रमाणे आहे.
School Quality Assurance & Accreditation Framework (SQAAF) will be developed by SCERT as per guidelines developed by NIEPA & NCERT.
संदर्भाधीन पत्रान्वये शाळा गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास (School Quality Assurance & Accreditation Framework-SQAAF) मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
या शासन निर्णयासोबत जोडलेल्या शाळा गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास (School Quality Assurance & Accreditation Framework-SQAAF) शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य शाळा मानक प्राधिकरण (SSSA) यांची असेल.
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या
या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०३१५२११८५६९२२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon