Nipun Maharashtra Abhiyan Chachni
जा.क्र/राशैसंप्रपम/ग.वि./निपुण महाराष्ट्र /२०२६/१८
दि.२०/०२/२०२६
विषय : निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता २ री ते ५वी च्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत...
संदर्भ-
१) राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२०
२) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९/ एसडीई-६, दिनांक २७ ऑक्टोबर २०२१
३) शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचेकडील पत्र दि. २० ऑगस्ट २०२४ (निपुण भारत उपक्रमसुधारित लक्ष्ये)
४) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/निपुण भारत अभियान/२०२४-२५/०५२२५दि.२५ ऑक्टोबर २०२४
५) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९//एसडीई-६, दिनांक ०५ मार्च, २०२५
६) प्रस्तुत कार्यालयाचे पत्रजा.क्र. SCERT-४४.०/११/२०२५-MATHSI/१५९०९९५/२०२५ दि.०९ डिसेंबर २०२५
७) प्रस्तुत कार्यालयाचे पत्रजा.क्र. SCERT-४४.०/११/२०२५-MATHSI/१७२६४८०/२०२६ दि. १७ फेब्रुवारी २०२६
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, भारत सरकार यांच्या निपुण भारत अभियानांतर्गत इयत्ता २री पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्ये प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्याने इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत मार्च २०२५ ते जून २०२५ दरम्यान राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर चाचणी घेऊन त्याची माहिती VSK chatbot वर नोंदवलेली आहे.
ऑगस्ट २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत "निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) अॅप" मध्ये पर्यवेक्षीय यंत्रणेतर्फे पुनर्चाचणी नोंदी करण्यात आलेल्या आहेत. सदर पुनर्चाचणीचा अहवाल दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रस्तुत कार्यालयात मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तसेच प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आलेला होता. तसेच डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ मध्ये सर्व विद्यार्थ्यांची मासिक अध्ययन स्तर चाचणी शिक्षकामार्फत पूर्ण झालेली असून, त्याचे सविस्तर सांख्यिकीय विश्लेषण शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे समक्ष दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजी ऑनलाईन बैठकीत सादर करण्यात आलेले आहे.
सदर अभियानाचा पुढील टप्पा (मासिक मूल्यमापन) सुरु होत असून, त्याची सुनियोजित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तथापि राज्यातील सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळा (सर्व माध्यम) याचा चाचणीत समावेश करण्यात आलेला आहे
अ.क्र महिना कालावधी१ फेब्रुवारी २३ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६२ मार्च २३ मार्च २८ मार्च २०२६
वरील नमूद कालावधी व तारखेनंतर "निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) अॅपमध्ये" चाचणी घेण्याची सुविधा बंद केली जाईल व त्यानंतर शिक्षकांना चाचणी घेता येणार नाही, ठराविक कालावधीतच चाचणी व नोंदणी पूर्ण होईल याची खात्री करावी. मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता २री ते ५वी विद्यार्थ्यांची चाचणी "मराठी वाचन, मराठी लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया या चार विषयांची होणार असून, मराठी व्यतिरिक्त इतर सर्व माध्यमातील इयत्ता ३री ते ५वीच्या विद्यार्थ्यांची चाचणी फक्त "मराठी वाचन" या विषयाचीच घेण्यात यावी.
शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना झालेल्या कामाचे/नोंदीचे अहवाल व विश्लेषण "निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) अॅपमध्येच" तात्काळ उपलब्ध होण्याची सुविधा आहे. त्याचबरोबर जिल्हा पातळीवरील सर्व यंत्रणेस स्वतंत्र डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याचा वापर, पाठपुरावा व कृती आराखड्यासाठी करता येईल. पर्यवेक्षकीय यंत्रणेची विश्लेषणाच्या कामकाजासाठी लागणाऱ्या वेळेचीही बचत होईल. अॅपमध्ये वरीलप्रमाणे सर्व माहिती अद्ययावत केल्यानंतर शिक्षकांना व मुख्याध्यापकांनाही शाळानिहाय अहवाल देखील पाहता येणार आहे.
राज्यातील सर्व शाळांची निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत अध्ययनस्तर चाचणी व नोंदणी सुरु होत असल्याने वरीलप्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदरील प्रक्रिया पूर्ण असलेल्या शाळेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांनाच निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) या अॅपचा वापर सुयोग्य रीतीने करता येईल याची नोंद घ्यावी. पर्यवेक्षकीय यंत्रणेने आपल्या अधिनस्त शाळांची वरीलप्रमाणे कार्यवाही होईल याची खात्री करावी.
सोबत
१. निपुण महाराष्ट्र (एससीइआरटीएम) अॅप प्ले स्टोर लिंक -
NIPUN Maharashtra (SCERTM)
(डॉ. हेमंत वसेकर भा.प्र.से.)
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ७०८, आर.बी कुमठेकर मार्ग, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०.
संपर्क क्रमांक (०२०)२४४७८१२२
ईमेल: mathsdept@maa.ac.in
प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यामिक), जिल्हापरिषद (सर्व), प्रशासन अधिकारी (शिक्षण), नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत (सर्व) शिक्षण निरीक्षक (पश्चिम/दक्षिण/उत्तर), मुंबई
प्रत माहितीस्तव सादर,
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे.
मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई,
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
मा. आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
प्रत कार्यवाहीस्तव सादर,
मा. संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र, पुणे
मा. संचालक (प्राथमिक शिक्षण) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र, पुणे
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon