Election Duty Mandhan Wadh GR
Regarding payment of remuneration/honour, overtime allowance/election allowance etc. to officers/employees appointed in connection with general/by-elections to Lok Sabha/Assembly Assembly - Revised rates.
लोकसभा / विधानसभेच्या सार्वत्रिक / पोटनिवडणूकीसंबंधी नियुक्त केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना पारिश्रमिक /मानधन, अतिकालिक भत्ता / निवडणूक भत्ता इ. देणेबाबत -सुधारित दर.
दिनांक : २४.११.२०२५
वाचा :-
१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. सीईएल-२०२४/प्र.क्र.१२७/२४/३३, दि.१८.०४.२०२४.
२) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. सीईएल-२०२४/प्र.क्र.६२५/२४/३३(३), दि.०१.०७.२०२४.
३) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. सीईएल-२०२४/प्र.क्र.७०७/२४/३३, दि.१६.०७.२०२४.
४) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. सीईएल-२०२४/प्र.क्र.४५/२४/३३(नि.३) (३), दि.१६.०१.२०२५.
५) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. ४६४/INST/EPS/२०२५/Remuneration & TA/DA, दि.०८.०८.२०२५.
६) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. ४६४/INST/EPS/२०२५/Honorarium, दि.०८.०८.२०२५.
प्रस्तावना :-
भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितीत लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक/पोट निवडणूकांच्या कामासाठी नियुक्त करण्यात येणा-या अधिकारी/कर्मचारी यांना द्यावयाचे पारिश्रमिक / मानधन, अतिकालिक भत्ता / निवडणूक भत्ता इत्यांदीचे दर शासनाच्या संदर्भाधीन क्र.१ ते ४ येथील शासन निर्णयांन्वये निश्चित केलेले आहेत. भारत निवडणूक आयोगाने त्यांचे संदर्भाधीन क्र.५ व ६ येथील दि.०८.०८.२०२५ रोजीच्या पत्रांन्वये निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करावयाच्या अधिकारी/कर्मचारी यांना द्यावयाचे पारिश्रमिक / मानधन, अतिकालिक भत्ता / निवडणूक भत्ता इ. दरांमध्ये सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सदर पत्रातील सूचनांना अनुसरुन भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितीतील राज्यातील आगामी लोकसभा/विधानसभा निवडणुकांच्या कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणा-या निवडणूक अधिकारी/कर्मचारी यांना द्यावयाचे पारिश्रमिक / मानधन, अतिकालिक भत्ता / निवडणूक भत्ता इत्यादींच्या अनुषंगाने सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
शासन निर्णय :-
भारत निवडणूक आयोगाच्या पत्र क्र.४६४/INST/EPS/२०२५/Remuneration & TA/DA, दि.०८.०८.२०२५ व पत्र क्र.४६४/INST/EPS/२०२५/Honorarium, दि.०८.०८.२०२५ अन्वये देण्यात आलेल्या सूचनांना अनुसरुन भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितीतील महाराष्ट्र राज्यातील आगामी लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक/पोट निवडणूकांच्या कामासाठी नियुक्त करण्यात येणारे अधिकारी/कर्मचारी यांना द्यावयाचे पारिश्रमिक /मानधन, अतिकालिक भत्ता / निवडणूक भत्ता इत्यादीबाबत पुढीलप्रमाणे सुधारित दर मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे:-
२. उपरोक्त तक्त्यात नमूद करण्यात आलेल्या सुधारित दरांव्यतिरिक्त संदर्भाधीन क्र.१ ते ४ येथील शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या इतर बाबींमध्ये कोणताही बदल करण्यात येत नसून त्या पूर्वीप्रमाणेच राहतील. "उपरोक्त सुधारित दर हे प्रस्तुत शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू होतील."
३. उपरोक्त बाबींवर होणारा खर्च प्रकरणपरत्वे मागणी क्र.ए-०२, २०१५-निवडणूका, १०५-संसदेच्या निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च, (००) (०१) संसदेच्या निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च, (२०१५००५९), १३-कार्यालयीन खर्च" किंवा "२०१५-निवडणूका, १०६-राज्य/संघराज्यक्षेत्र विधानमंडळ निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च, (००) (०१) राज्य/संघराज्यक्षेत्र विधानमंडळ निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च, (२०१५००६८), १३-कार्यालयीन खर्च" किंवा "२०१५-निवडणूका, १०४-लोकसभा व राज्य संघराज्य क्षेत्र विधानसभा यांच्या एकाच वेळेस घेतल्या जाणा-या निवडणुकांचा खर्च, (२०१५००४१), १३-कार्यालयीन खर्च" ह्यापैकी लागू असलेल्या लेखाशीर्षाखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
४. निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणारे अधिकारी/कर्मचारी यांना द्यावयाचे पारिश्रमिक / मानधन, अतिकालिक भत्ता / निवडणूक भत्ता इत्यादीबाबत निर्गमित करण्यात येणा-या ज्ञापनाची प्रत वित्त विभाग/व्यय-४ यांना चिन्हांकित करण्यात यावी.
५. सदरचा शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.६२१/व्यय-४, दि.१७.१०.२०२५ अन्वये व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २८२/सेवा-६, दि.११.११.२०२५ अन्वये तसेच प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५११२४१६५५३४०२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
GR PDF COPY
अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय क्रमांक : बीयुडी-२०२५/प्र.क्र.१४०/२५/का.-३३ (नि.-३), मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon