DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Vande Mataram वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रम/उपक्रमाबाबत

Vande Mataram


Regarding the programs/activities being implemented throughout the year to mark the 150th anniversary of the Vande Mataram song

वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रम/उपक्रमाबाबत.

महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण ८२२५/प्र.क्र.५०५(ई.क्र.१३९७१३३)/सां.का.४ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक : ३१ ऑक्टोबर, २०२५

वाचा :

- १) उपसचिव, (एनआय), गृह मंत्रालय, दिल्ली यांचे क्र.।-१९०३४/११/२०२५-एनआय-।।/३७६९३६३, दिनांक २४.१०.२०२५ रोजीचे पत्र.

२) सचिव, संस्कृती मंत्रालय, दिल्ली यांचे अर्धशासकीय पत्र क्र. सीएम-२१/१/२०२५-सी & एम, दिनांक २७.१०.२०२५.

प्रस्तावना:-

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची आनंदमठ ही कादंबरी मालिका स्वरूपात प्रकाशित झाली. वंदे मातरम दिनांक ७ नोव्हेंबर, १८७५ रोजी अक्षय नवमीच्या दिवशी लिहिले गेले असे मानले जाते. स्वातंत्र्य चळवळीत वंदे मातरम कोट्यवधी भारतीयांचा युद्धघोष बनले. १८९६ मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात वंदे मातरम गायले. नंतर, काँग्रेसच्या बैठकींत वंदे मातरमचे पहिले दोन श्लोक गाणे नित्यक्रम बनले. हळूहळू ते स्वातंत्र्यसैनिकांचे गीत बनले. आझाद हिंदच्या तात्पुरत्या सरकारच्या घोषणेवेळी वंदे मातरम गायले गेले. सन १९०५ बंगालच्या फाळणीविरुद्धच्या निषेधाचा वंदे मातरम हा महत्त्वाचा भाग होता. सन १९०७ मॅडम भिकाजी कामा यांनी स्टुटगार्ट, बर्लिन येथे भारताबाहेर प्रथमच तिरंगा ध्वज फडकवला. ध्वजावर वंदे मातरम असे शब्द लिहिलेले होते. दिनांक २४ जानेवारी, १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेत एक निवेदन केले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले की स्वातंत्र्य लढ्यातील वंदे मातरमची महत्त्वाची भूमिका पाहता राष्ट्रगीत जन गण मन प्रमाणेच त्याला दर्जा असेल आणि त्याचा तितकाच सन्मान केला जाईल. संविधान सभेतील त्यांच्या भाषणाने वंदे मातरमला राष्ट्रगीताप्रमाणेच दर्जा आहे हे प्रस्थापित केले आणि भारतीय जनतेला प्रेरणा देण्यातील त्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखले गेले. संदर्भाधीन पत्रांन्वये सदर कार्यक्रम/उपक्रम वर्षभर पूर्ण राज्यामध्ये राबविण्यासाठी समिती गठीत करणे आणि सदरबाबतच्या सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

वंदे मातरम गीतास दिनांक ७ नोव्हेंबर, २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याने संदर्भाधीन केंद्र शासनाच्या पत्रान्वये तसेच अर्धशासकीय पत्रान्वये वर्षभर पूर्ण राज्यामध्ये राबविण्यासाठी दिलेल्या सूचनेस अनुसरुन खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे:-

Regarding the programs/activities being implemented throughout the year to mark the 150th anniversary of the Vande Mataram song

०२. सदर कार्यक्रम/उपक्रम राबविण्यासाठी विभागीय आयुक्त यांनी सदरबाबतचा आढावा घ्यावा तर जिल्हाधिकारी यांना समितीमध्ये आवश्यक त्या विभागाचा आधिकारी पदाधिकारी समाविष्ट करण्याची मुभा राहील.

०३. सदर समितीने खालीलप्रमाणे तसेच संदर्भाधीन पत्र तसेच अर्धशासकीय पत्रान्वये दिलेल्या सूचनांनुसार चार टप्यात कार्यवाही करुन कार्यक्रम / उपक्रम यशस्वीपणे पार पाडावयाचा आहे.

१. पहिला टप्पा ७ ते १४ नोव्हेंबर, २०२५

२. दुसरा टप्पा १९ नोव्हेंबर, २०२५ ते २६ जानेवारी, २०२६ (प्रजासत्ताक दिन अंतर्भूत)

३. तिसरा टप्पा ७ ते १५ ऑगस्ट, २०२६ (हरघर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत)

४. चौथा टप्पा १ ते ७ नोव्हेंबर, २०२६ (समारोप समारंभ)

०४. दिनांक २४.१०.२०२५ रोजी झालेल्या दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक पार पडली. संदर्भाधीन पत्र तसेच अर्धशासकीय पत्रातील प्रमुख कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत. याकरीता केंद्र शासनाने पाठविलेली सादरीकरणाची प्रत तसेच अर्धशासकीय पत्राची प्रत सुलभ कार्यवाहीसाठी सोबत जोडली आहे:-

१. ७ नोव्हेंबर रोजी देशभर तहसील पर्यंत व्यापक लोकसहभागासह व्हीआयपी कार्यक्रम आयोजित केले जातील. देशभर प्रमुख व्यक्तिमत्त्वे आणि नागरिकांसह सामूहिक गायन नियोजित केले जाईल.

२. विविध दिवशी वंदे मातरमचे सामूहिक गायन आयोजित करावे आणि ते मोहिमेच्या संकेतस्थळावर अपलोड करावे.

३. वंदे मातरमचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शाळांमध्ये वंदे मातरमला समर्पित विशेष सभा, निबंध स्पर्धा, वादविवाद, पोस्टर तयार करणे इ. उपक्रम आयोजित करावेत. वंदे मातरमच्या सांस्कृतिक इतिहासावरील संशोधनासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी. वंदे मातरमच्या इतिहासावर एक पुस्तक प्रसिद्ध करावे.

४. सीएपीएफ बँड, राज्य पोलीस बँड सार्वजनिक ठिकाणी वंदे मातरम आणि देशभक्तीच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम सादर करावेत आणि या कार्यक्रमांचे दिनदर्शिका प्रसिद्ध करावे.

५. वंदे मातरमवर आधारित क्विझ आयोजित करावी.

६. अधिक गर्दी असलेल्या ठिकाणी वंदे मातरमवर प्रदर्शन आयोजित करावे.

७. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम थीम समाविष्ट करावी. वंदे मातरम टॉर्च रिले आयोजित करावी. छावण्यांमध्ये लष्करी बँडद्वारे आणि शाळा, महाविद्यालये, एनसीसी इ.च्या बँडद्वारे कॅम्पसमध्ये वंदे मातरम संगीत कार्यक्रम आयोजित करावेत.

८. सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत राज्यामध्ये वंदे मातरम ऑडिओ-व्हिडिओ बूथ उभारले जावेत. त्यात वंदे मातरम गाण्याचे रेकॉर्डिंग आणि पोर्टलवर अपलोड करण्याची सुविधा करावी.

९. पोर्टलमध्ये वंदे मातरमची 'कॅराओके' सुविधा दिली जावी. ज्यामध्ये नागरिक स्वतःच्या आवाजात गाऊन वंदे मातरम अपलोड करू शकतील.

१०. ७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री, राज्यपाल, उपराज्यपाल यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करावा.

११. राज्यात सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित करावेत.

१२. राज्यात तहसील पातळीवर सर्व शहरामध्ये कार्यक्रम आयोजित करावेत.

१३. केंद्र सरकारच्या विभागांच्या सहकार्याने राज्य सरकारच्या अखत्यारितील संस्थांमार्फत वर्षभर कार्यक्रम राबवावेत.

१४. परिच्छेद क्रमांक ३ मध्ये नमूद ४ टप्प्यांशी सुसंगत कार्यक्रम आयोजित करावेत.

०५. यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग नोडल विभाग असेल तर संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई (श्री. बिभिषण चवरे, मोबाईल क्रमांक ९५०३८७८३८४, ०२२-२२०४३५७१, ०२२-२२८४२६३४) हे नोडल अधिकारी असतील.

०६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५१०३११५४५०२०१२३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

    शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक 

 अवर सचिव, महाराष्ट्र शासन


Action Plan for Commemoration of 150 Years of Vande Mataram

Regarding the programs/activities being implemented throughout the year to mark the 150th anniversary of the Vande Mataram song




Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon