RSBVP
Regarding organizing Taluka and District Level Children's Scientific Exhibition in conjunction with the 53rd State Level Children's Scientific Exhibition (RSBVP)-2025-26.
क्रमांकः रा.वि.शि.सं (प्राविप्रा) / 53 वेराबावैप्र/2025-26 //20251825381
दिनांक: 24/10/2025
विषय:- 53 व्या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी (RSBVP)-2025-26 च्या अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी आयोजित करणेबाबत.
संदर्भ: 1) एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली, भारत सरकार यांचे दिशानिर्देश 2025-26:
उपरोक्त संदर्भाकित विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाचे -53 के राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी (RSBVP) दिनांक 01 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 (अंदाजित कालावधी) या दरम्यान 5 दिवस कालावधीचे आयोजित करण्याचे प्रस्तावितः आहे:
यावर्षी एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली च्या संदर्भीय दिशानिर्देशान्वये विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय "विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM "(STEM for 'Vikasit and Atmanirbhar Bharat) असा निश्चित केला आहे. सामाजिक, पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून पुढीलप्रमाणे
एकूण सहा उपविषय निर्धारित केलेले आहेत.
1. शाश्वत शेती (Sustainable Agriculture)
2. कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक ला पर्याय
(Waste Management and Alternatives to Plastic)
3. हरित उर्जा (Green Energy)
4. उदयोन्मुख तंत्रज्ञान (Emerging Technologies)
5. मनोरंजक गणितीय मॉडेलींग (Recreational Mathematical Modeling)
6 आरोग्य आणि स्वच्छता (Health and Hygiene)
7. जल संवर्धन आणि व्यवस्थापन (Water Conservation and Management)
प्रदर्शन कालावधी :
(1) राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाची पूर्व तयारी म्हणजे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होय. आपल्या जिल्हयात पुढील कालावधीत प्रदर्शनाचे आयोजन करावे.
अ.क्र. विज्ञान प्रदर्शनाचा स्तर
कालावधी
(1) तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनदिनांक :
05 नोव्हेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025
(2) जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक :
01 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2025
(3) राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक (संभाव्य कालावधी):
01 जानेवारी ते 15 जानेवारी
2) राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (माध्यमिक शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धा 2025-26:
दरवर्षी प्रमाणे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य (माध्यमिक शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत फक्त माध्यमिक शिक्षक सहभागी होतील. माध्यमिक शिक्षक म्हणजे इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत शिकविणारे शिक्षक. या स्पर्धेतून जिल्हास्तरावर एका उत्कृष्ट अशा माध्यमिक शिक्षकाच्या शैक्षणिक साहित्याची निवड करण्यात यावी. सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांनाही याबाबत कळवावे.'
3) राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (प्राथमिक शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धा 2025-26-
सन 2006-07 या वर्षापासून राज्यस्तरावर प्राथमिक शिक्षकांनी तयार केलेल्या (गणितं व विज्ञान) - शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. या चालू वर्षात राज्यस्तरीय अध्यापक.' निर्मित शैक्षणिक साहित्य (प्राथमिक शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धा 2025-26 आयोजित करण्याचे प्रस्तावित. - आहे. प्राथमिकं शिक्षक म्हणजे इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत शिकविणारे शिक्षक. तरी जिल्हयांतील सर्व" शाळांनां या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कळवावे. या स्पर्धेतूने जिल्हास्तरांवर एका उत्कृष्ट अशा प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याची निवड कारण्यात यावी.
4) राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांचे प्रायोगिक साधनांचे प्रदर्शन व स्पर्धा 2025-26:
सन 2006-07 या वर्षापासून राज्यस्तरावर प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांनी तयार केलेल्या (गणित व विज्ञान) वैज्ञानिक उपकरण / प्रतिकृतीचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांचे प्रायोगिक साधनांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्हास्तरावर वरील प्रमाणे प्रदर्शन आयोजित करावे व सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांना प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करावे.
निवड प्रक्रिया :
1) विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनीय वस्तू : राज्यातील आदिवासी भाग असलेल्या जिल्हयांनी उच्च प्राथमिक
स्तरापर्यंतच्या गटातून (इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंत) तीन (3), दिव्यांग गटातून एक (01) व आदिवासी गटातून एक (01) असे एकूण (05) माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून (इयत्ता 9 वी ते 12 वी) तीन (3), दिव्यांग (01व आदिवासी गटातून एक (01) असे एकूण पाच (05) असे दोन्ही शिक्षण परिषद, चर्चासत्रातून दवंडीद्वारे देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करावे. विज्ञान प्रदर्शन हे केवळ औपचारिकता राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
6) प्रदर्शन वस्तूंची निवड तज्ञांमार्फत करतांना पुनरावृत्ती (Repetitions) होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी मागील पाच वर्षांतील निवड झालेल्या तालुका व जिल्हास्तरावरील निवड याद्या तज्ज्ञांना पुरवाव्यात म्हणजे पुनरावृत्ती (Repetitions) टाळता येईल. प्रदर्शनीय वस्तूंचे मूल्यमापन निकषानुसार वस्तुनिष्ठ व्हावे. याबाबत पालक व विद्यार्थांकडून कोणतीही तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी.
(7) सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाचे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी (RSBVP)-2025-26 तथा 53 वे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन 2025-26 चे आयोजन होत आहे. त्या निमित्याने जनतेत जनजागृती करावी. राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन स्थळ व संबंधित राज्याचे नाव यथावकाश कळविण्यात येईल.
सांख्यिकीय माहिती :
अ) जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आटोपताच निर्धारित प्रपत्रात माहिती भरुन त्वरीत सादर करावी.
ब) तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक यांचे शैक्षणिक साहित्य व प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर यांची वैज्ञानिक साधने याबाबत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची शिक्षकांची / प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर यांच्या उपस्थितीची माहिती तात्काळ या संस्थेकडे पाठवावी.,
उपरोक्त प्रमाणें नमूद केलेल्या मुद्यांकडे अधिक लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी. आपल्या -सुलभ संदर्भाकरिता, विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासंबंधी, नियमावली व मूल्यमापनाचे निकष यासोबत : जोडलेले आहेत. त्याप्रमाणे आवश्यकः ती कार्यवाही करून प्रदर्शन आटोपताच 25 डिसेंबर 2025 मुर्यंत अहवाल, सांख्यिकीय माहिती, इत्यादी सर्व माहिती विहित प्रपत्रात या संस्थेस न चूकता सादर करावी, अधिक माहितीसाठी NCERT ची वेबसाईट: www.ncert.nic.in पहावी.
संचालक,
राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रविनगर, नागपूर.
53 व्या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी (RSBVP)-2025-26 च्या अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी आयोजित करणेबाबत.

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon