DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा योजनेचा निधी वितरित करण्यासाठी `SNA SPARSH` कार्यपध्दतीबाबत ऑनलाईन बैठकीस उपस्थित राहणेसंदर्भात SNA SPARSH PORTAL LINK


SNA SPARSH PORTAL ONLINE TRAINING LINK 


केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा योजनेचा निधी वितरित करण्यासाठी `SNA SPARSH` कार्यपध्दतीबाबत ऑनलाईन बैठकीस उपस्थित राहणेसंदर्भात.

संदर्भ:- शासन निर्णय क्रमांक:- संकीर्ण२०२५/प्र.क्र.१३३/एसडी-१, दि.३१/०७/२०२५.

उपरोक्त विषयी आपणांस कळविण्यात येते की, समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 'SNA SPARSH प्रणालीमध्ये निधि वितरण व खर्च करण्याबाबत वरील संदर्भिय शासन निर्णयानुसार निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने SNA SPARSH अंतर्गत SNA PORTAL वर करावयाच्या कार्यपध्दतीबाबत सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, वरिष्ठ लेखा लिपिक, गट साधन केंद्रामधील लेखाविषयक काम पाहणारे कर्मचारी यांना सदर प्रणालीबाबत माहिती अवगत व्हावी याकरिता दि.०७/१०/२०२५ ते दि.१०/११/२०२५ या कलावधीत प्रति दिन चार सत्रांमध्ये ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने जिल्हा / मनपा स्तरावरील शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, वरिष्ठ लेखा लिपिक, गट साधन केंद्रामधील लेखाविषयक काम पाहणारे कर्मचारी आणि समग्र शिक्षा अंतर्गत शाळांचे सर्व मुख्याध्यापक यांनी पत्रासोबत जोडलेल्या जिल्हानिहाय शाळांच्या यादीप्रमाणे या कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रशिक्षणसाठी ऑनलाइन उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून निर्देश व्हावेत. तसेच याबाबत या कार्यालयास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करावे, ही विनंती.

मूळ टिप्पणी मा. रा.प्र.संचालक यांचे मान्यतेने.

(गोविंद कांबळे)

राज्य प्रकल्प समन्वयक, तथा सह संचालक (प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.


सोबत : वरीलप्रमाणे.

`SNA SPARSH` procedure for disbursing funds of the centrally sponsored Samagra Shiksha Yojana




प्रत माहितीस्तव सविनय सादर :-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२

२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon