Vidyarthi Samuh Sthapna
shaikshanik varsh 2026-27 antargat shalanmadhye 'vidyarthi samuh (Student Clubs) punargathan karanebabat
Regarding the reorganization of 'Student Clubs' in schools for the academic year 2026-27
दिनांकः डिजिटली स्वाक्षरीत
जा.क्र. राशैसंवप्रप/साव्यावि/विद्यार्थी समूह पुनर्गठन /२०२६-२७/
विषयः शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत शाळांमध्ये 'विद्यार्थी समूह (Student Clubs)' पुनर्गठन करणेबाबत.
संदर्भ:
१. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२०.
२. राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF) - २०२४.
३. प्रस्तुत परिषदेचे पत्र जा.क्र. राशैसंवप्रप/साव्यावि/विद्यार्थी समूह/ १४०४७८४ दि. ०३-०९-२०२५
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) - २०२० आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF) - २०२४ यानुसार शिक्षणाचा उद्देश केवळ पाठांतर किंवा पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांचा बौद्धिक, सामाजिक, भावनिक, नैतिक, सर्जनशील, शारीरिक व व्यावसायिक सर्वांगीण विकास साधणे हा आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता, आवडीनिवडी, कल्पकता व कौशल्यांना वाव देणारे अनुभवाधारित व विद्यार्थी-केंद्रित शिक्षण हे प्रमुख ध्येय आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राज्य मंडळाच्या अधिनस्थ सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये (प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय) स्थापन करण्यात आलेले 'विद्यार्थी समूह (Student Clubs)' हे विद्यार्थ्यांना नेतृत्व, सहकार्य, प्रयोगशीलता व सामाजिक सहभागाची संधी देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विद्यार्थी समूहांचे पुनर्गठन करून त्यांना अधिक प्रभावी व परिणामकारक बनविणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचा विकास होऊन शाळांमध्ये समान संधी, समावेशन, कौशल्याधारित शिक्षण व नेतृत्वगुणांचा विकास साध्य होईल. या संदर्भात सर्व संबंधित अधिकारी व शिक्षकांनी उपरोक्त संदर्भ क्र. ३ च्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
१. विद्यार्थी समूह पुनर्गठन करणेसाठीचे वेळापत्रक :
अ.क्र. टप्पा / कार्य अंतिम दिनांक जबाबदार घटक
१.शाळा स्तरावर विद्यार्थी समूह पुनर्गठन पूर्ण करणे २० ऑगस्ट २०२६
वर्गशिक्षक / मुख्याध्यापक
२.केंद्रप्रमुख
केंद्र स्तरावर माहिती संकलित करणे
२५ ऑगस्ट २०२६
३. तालुका स्तरावर अहवाल सादर करणे
गटशिक्षणाधिकारी
२८ ऑगस्ट २०२६
४.जिल्हा स्तरावर अहवाल सादर करणे
शिक्षणाधिकारी / DIET
३१ ऑगस्ट २०२६
२. अंमलबजावणी व संनियंत्रणः
जिल्हा नोडल अधिकारी: प्रभावी संनियंत्रणासाठी प्रत्येक 'जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने' (DIET) एक अधिव्याख्याता यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी व सदरील माहिती कार्यक्षेत्रातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांचेमार्फत शाळांपर्यंत तात्काळ पोहोचवावी.
पर्यवेक्षकीय भूमिकाः गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी विद्यार्थी समूहांच्या कामकाजाचे निरंतर मार्गदर्शन व संनियंत्रण करावे.
मार्गदर्शिका उपलब्धताः विद्यार्थी समूहांची रचना, उपक्रम व कामकाजाबाबतची सविस्तर 'विद्यार्थी समूह - मार्गदर्शिका (शाळा/ वर्ग स्तर)' ही पुस्तिका SCERT च्या अधिकृत संकेतस्थळावरील पुढील link वर उपलब्ध आहे.
https://www.maa.ac.in/documents/Vidyarthi Samuh.pdf
राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दि. २० ऑगस्ट २०२६ पर्यंत विद्यार्थी समूहांचे पुनर्गठन करून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावेत. तसेच स्थापन केलेल्या विद्यार्थी समूहांची प्रत्येक शाळेत सुयोग्य स्थापना, कार्यान्वयन व जिल्ह्यातील विविध स्तरावर सुयोग्य समन्वयन व्हावे यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी/ पर्यवेक्षकीय अधिकारी/ मुख्याध्यापक / शिक्षक यांना उपरोक्त संदर्भीय पत्र क्र. ३ अन्वये जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानुसार शाळा/ वर्ग स्तरावर सन २०२६-२७ मध्ये स्थापन केलेल्या विद्यार्थी समूहाची माहिती खालील नमुन्यात स्तरनिहाय संकलित करावी. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांनी DIET प्राचार्य यांचेमार्फत फक्त राज्यस्तर नमुना क्र. ४ मधील माहिती ही दि. ०७-०९-२०२६ पर्यंत परिषदेस cpddept@maa.ac.in या E-mail वर Excel व pdf स्वरुपात सादर करावी.
नमुना क्र. १:
केंद्र स्तर माहिती संकलन नमुनाः
नमुना क्र. २:
तालुका स्तर माहिती संकलन नमुनाः
नमुना क्र. ३:
जिल्हा स्तर माहिती संकलन नमुनाः
नमुना क्र. ४: राज्य स्तर माहिती संकलन नमुनाः
सदर माहिती ही विहित मुदतीत विनाविलंब सादर करावी. तसेच 'जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने' (DIET) जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केलेल्या अधिव्याख्याता यांचे नाव, संपर्क क्र. व E-mail ID ही माहिती CPD विभागास cpddept@maa.ac.in या E-mail वर कळवावी.
Digitally signed by HEMANT VASEKAR Date: 13-08-2026 14:09:56
(डॉ. हेमंत वसेकर भा.प्र.से.) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
परिपत्रक व नमुने पीडीएफ लिंक
________ ALSO RAED ________
Regarding establishment of 'STUDENTS CLUB' at school/class level for students of 1st to 12th standard in all primary and secondary schools in the state
Regarding establishment of 'Student Groups' at school/class level for students of 1st to 12th standard in all primary and secondary schools in the state.
जा. क्र. राशैसंप्रप/साव्यावि/विद्यार्थी समूह/प्रति,
दि.०२/०९/२०२५
विषय:- राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा / वर्ग स्तरावर 'विद्यार्थी समूह' (STUDENTS CLUB) स्थापन करणेबाबत
संदर्भ :- १. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२०.
२. राज्य अभ्यासक्रम आराखडा-२०२४
३. शासननिर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एस डी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च २०२४ (SQAAF)
उपरोक्त संदर्भीय विषयान्वाये, राज्यातील सर्व प्राथमिक/माध्य. शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना अध्ययनास व सर्वंकष विकासात पूरक ठरतील असे विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला, अंगभूत कौशल्याला, कल्पकतेला, सृजनशीलतेला, उर्जेला, चिकित्सक वृत्तीला आणि अनुकरणशीलतेला वाव देण्यासाठी विविध समूह स्थापन करून त्याचे सुयोग्य कार्यान्वयन करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा-शालेय शिक्षण २०२४, PGI INDICATORS, SQAAF मधिल निदर्शकांचा यात समावेश आहे. या संदर्भाने काही विद्यार्थी समूहांची माहिती सोबतच्या यादीत दिलेली आहे.
अ.क्र विद्यार्थी समूहाचे नाव
१ मराठी विषय समूह
२ इंग्रजी विषय समूह
३ हिंदी विषय समूह
४ उर्दू विषय समूह
५ इतिहास विषय समूह
६ भूगोल विषय समूह
७ नागरिकशास्त्र विषय समूह
८ अर्थशास्त्र विषय समूह
९ गणित विषय समूह
१० विज्ञान विषय समूह
११ क्रीडा समूह
१२ छंदनिहाय व सहशालेय उपक्रम समूह
१३ विद्यार्थी संघटना समूह
१४ चालू घडामोडी समूह
१५ सामान्य ज्ञान समूह
१६ स्वच्छता, आरोग्य व परिसर सुरक्षा समूह
१७ पर्यावरण संवर्धन समूह
१८ आधुनिक तंत्रज्ञान समूह
१९ शालेय कार्यक्रम व्यवस्थापन समिती समूह
२० सामाजिक कार्य व सर्वेक्षण समूह
२१ वाचन समृद्धी समूह
२२ समाज माध्यम व प्रसिद्धी समूह
२३ खगोलशास्त्र समूह
२४ माजी विद्यार्थी समूह
२५ प्रगतशील विद्यार्थी समूह
२६ पाककला व परसबाग समूह
२७ व्यावसायिक शिक्षण समूह
२८ तक्रार निवारण समूह
२९ मानसिक क्षमता व आव्हानात्मक प्रश्नपेढी समूह
३० परकीय भाषा समूह
३१ समता सहकार्य समूह
३२ आर्थिक साक्षरता समूह
३३ आपत्कालीन व्यवस्थापन समूह
३४ स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन समूह
उपरोक्त नमूद समूहांची शाळा / वर्ग स्तरावर स्थापना, कामकाज प्रक्रिया इ. बाबत मुद्देनिहाय सविस्तर माहिती सर्व शाळांसाठी ' विद्यार्थी समूह- मार्गदर्शिका (शाळा/वर्ग स्तर)' ह्या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे. सदर पुस्तिका अवलोकन करून त्यासोबत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपले कार्यक्षेत्रात कार्यवाही करावी. सदर पुस्तिका ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ह्या संस्थेच्या www.maa.ac.in ह्या संकेतस्थळावर https://www.maa.ac.in/documents/Vidyarthi Samuh.pdf या लिंकवर उपलब्ध करण्यात आलेली आहे. राज्यातील प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळेत इ. १ ली ते १२ वी च्या वर्गासाठी दि. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत विद्यार्थी समूहांची स्थापना करून कार्यान्वयन करणे आवश्यक राहील.
राज्य मंडळाच्या अधीनस्थ सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये (प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये) विद्यार्थी संख्येप्रमाणे शक्य तेवढे विद्यार्थी समूह विद्यार्थ्यांच्या आवडी व कल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ताण येऊ न देता दि. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत स्थापन करण्यात यावेत. सोबतच्या मार्गदर्शिकेत नमूद बाबींव्यतिरिक्तही प्रत्येक समूहाशी संबंधित इतर बाबींचा समावेशही समूहाच्या कामकाजामध्ये करता येईल. प्रत्येक विद्यार्थी किमान एका तरी समूहात समाविष्ट असेल याची खात्री करावी.
तसेच उपरोक्त विषयांव्यतिरिक्त नवीन विद्यार्थी समूह स्थापन करायचा असेल तर प्रथम तो उपरोक्त ३४ समूहांमध्ये समाविष्ट होऊ शकणार नाही याची शाळास्तरावरच खात्री करावी आणि नंतरच नवीन विद्यार्थी समूह स्थापन करावा. अशा नविन विद्यार्थी समूहासाठी प्रथम या पुस्तिकेतील नमुन्याप्रमाणे मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात आणि त्याची एक प्रत DIET ला माहितीस्तव पाठवावी. यावर DIET ने योग्य ते अभिप्राय शाळेला द्यावेत. सर्व DIET नी असे प्राप्त प्रस्ताव SCERT ला आवश्यक दुरुस्त्यांसह पाठवावेत. याविषयी DIET ने एक अधिव्याख्याता यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी व सर्व शाळांना ती कळवावी. विद्यार्थी समूहांची प्रत्येक शाळेत सुयोग्य स्थापना, कार्यान्वयन व जिल्ह्यातील विविध स्तरावर सुयोग्य समन्वयन व्हावे यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी/पर्यवेक्षकीय अधिकारी/मुख्याध्यापक/शिक्षक यांनी पुढीलप्रमाणे जबाबदारी देण्यात येत आहे.
अ.क्र. १ क्षेत्रीय अधिकारी/पर्यवेक्षीय अधिकारी / मुख्याध्यापक/ शिक्षक
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था)
जबाबदारी
१. जिल्हास्तरीय आढावा व समन्वयन
२. नोडल अधिकारी यांची नेमणूक व संनियंत्रण
२ शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
गट शिक्षणाधिकारी
३. विस्तार अधिकारी (शिक्षण) / केंद्रप्रमुख
४. मुख्याध्यापक
५ वर्गशिक्षक/समूह समन्वयक
विद्यार्थी समूह स्थापना, कार्यान्वयन व जिल्ह्यातील विविध स्तरावरील सुयोग्य समन्वयनासाठी मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या आहेत. याविषयी कोणतीही शंका असल्यास DIET मधील नोडल अधिकारी यांचेशी संपर्क करावा.
३. विद्यार्थी समूहाची जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रभावी कार्यवाही होत असल्याची खात्री करणे.
१. सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी समूहाची स्थापना करणे.
२. पुस्तिकेत निर्देशित विद्यार्थी समूह संरचना व कार्यपद्धती याबाबत अंमलबजावणी करणे.
३. विद्यार्थी समूह स्थापना व कार्यवाहीचा नियमित आढावा घेणे.
२ तालुकास्तरीय नियोजन, संनियंत्रण, संकलन व पर्यवेक्षण
३ बीट/केंद्रस्तरीय मार्गदर्शन, पर्यवेक्षण व संनियंत्रण
४ शाळा पातळीवर समूहांची स्थापना, उपक्रम / वेळापत्रक ठरवणे व कार्यवाही करणे.
विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, बैठकांचे आयोजन (शिक्षक व पालक) आणि कृती अहवाल तयार करणे
(राहूल रेखावार भा.प्र.से.) संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन वप्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
विद्यार्थी समूह - मार्गदर्शक सूचना
(शाळा/वर्गस्तर)
१) प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थी समूह स्थापन करून कार्यान्वित करणे आवश्यक राहील. शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत असे समुहातील उचित उपक्रम निवडावेत. तसेच उपक्रमांची पुनरावृत्ती टाळावी.
२) समूहासाठीच्या मार्गदरिकित विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक समूहाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. तथापि शाळांनी याबाबत गरजेनुसार उचित कार्यवाही करावी.
३) समूहांची निवड करताना स्थानिक विविधता, वैशिष्ट्य, उपलब्धता, गरजा, शाळा/ वर्गाची विद्यार्थी संख्या यांचा प्राधान्याने विचार करावा.
४) समूहांमध्ये विद्यार्थ्यांची निवड करताना विद्यार्थ्यांची आवड, कौशल्य, व व्यक्तिमत्त्व विकासाच्या गरजा विचारात घ्याव्यात. तसेच सदर समूह निवडीबाबत त्यांना ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.
५) समूहाच्या सुयोग्य कार्यान्वयनासाठी आवश्यकतेनुसार मासिक / द्विमासिक/त्रैमासिक / सहामाही/वार्षिक बैठक घेणे बंधनकारक आहे.
६) वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याला क्षमतेनुसार एकापेक्षा अधिक समूहात सहभागी करून घेता येईल.
७) समूहाद्वारे आयोजित करावयाचे उपक्रम निवडण्याची लवचिकता मुख्याध्यापकास राहील.
८) शालेय विषयांशी पूरक अशा अधिकाधिक समूहांची शाळा/वर्ग स्तरावर स्थापना करावी.
९) वर्गाचा स्तर, वयोगट व समूहाचे उद्देश विचारात घेऊन शाळा व वर्ग पातळीवर समुहाची स्थापना करावी व समूहाचा मार्गदर्शक/सुलभक म्हणून संबंधित शिक्षकाने जबाबदारी पार पाडावी.
१०) शाळा / वर्ग स्तरावर स्थापन केलेल्या समूहाचे योग्य समन्वयन मुख्याध्यापकांनी करावे.
११) मुख्याध्यापकांनी समूह स्थापना व कार्यान्वयनाचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सादर करावा.
१२) सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी विद्यार्थी समूहाचे सतत मार्गदर्शन, पर्यवेक्षण व संनियंत्रण करावे.
१३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी शाळाभेटी दरम्यान विद्यार्थी समूहाचे सुयोग्य संनियंत्रण करावे.
१४) शाळेबाहेरील तज्ञ व्यक्तीही समूहाशी जोडल्या जातील हा प्रयत्न करावा.
१५) कोणत्याही मार्गदर्शक/सुलभक शिक्षकाने २/३ वर्षांत आपली भूमिका उत्तरोत्तर कमी करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक कार्यप्रवण करावे.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
१. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३. शिक्षण निरीक्षक (उत्तर, पश्चिम, दक्षिण विभाग), बृहन्मुंबई.
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)



Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon