Summer Vacation Duty Of Head Master Non Teaching Staff In Schools
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे
क्र. शिसंमा/मुख्या. सुट्टी/२०२५/एस-१/2197
दि. २८/०४/२०२५
विषयः- माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उन्हाळी सुट्टीतील कामकाजाबाबत.
संदर्भ :- शासन परिपत्रक क्रमांक, एसएसएन १०९७/(८१०)/माशि-२, दि. १५.०५.१९९९.
संदर्भिय शासनपरिपत्रक सुलभ संदर्भासाठी सोबत जोडण्यात येत आहे.
उक्त संदर्भिय शासन परिपत्रकान्वये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, लिपिक व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांना उन्हाळी सुट्टीत खालील कामकाजासाठी शालेय कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
१. ११ वी ऑनलाईन कामकाज.
२. आधार / अपार आयडी कामकाज.
३. स्कूल मॅपिंग कामकाज.
४. संचमान्यता दुरुस्ती व इतर अनुषंगिक महत्वाचे कामकाज.
वरील सर्व कामकाज करणेसाठी उन्हाळी सुट्टीत शाळेतील मुख्याध्यापक, लिपिक व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाळेत उपस्थित राहून कामकाज करणेबाबत आपल्या विभागातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापक यांना तात्काळ आदेशित करावे.
प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
Regarding the summer vacation work of principals and non-teaching staff of secondary and higher secondary schools
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व.
३. शिक्षण निरीक्षक, उत्तर/दक्षिण/पश्चिम.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon