ECCE Tab Web Links
वय वर्षे ३ ते ६ या वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांच्या नोंदणीबाबत.
Balkanna Purv prathmik shikshan Kendra Nandini
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१५१/एस.डी.४ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनांक: २४ एप्रिल, २०२५
१) राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०
२) राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४
शासन परिपत्रक
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अनुसार ५+३+३+४ आकृतीबंधातील पहिली ५ वर्षे म्हणजे पूर्व प्राथमिक शाळेची ३ वर्षे (वयोगट ३ ते ६) व इयत्ता १ ली आणि इयत्ता २ री (वयोगट ६ ते ८) यांचा समावेश आहे. या ५ वर्षाच्या टप्प्याला 'पायाभूत स्तर' असे संबोधण्यात आले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूतस्तर (National Curriculum Framework Foundation Stage -NCFFS) केंद्र शासनाने तयार केला असून त्यावर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर (State Curriculum Framework Foundation Stage SCFFS) राज्याने तयार केला आहे.
२. राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये पुढील ध्येय स्पष्टपणे मांडण्यात आले आहे. "वय वर्ष ३ ते ८ वयोगटातील प्रत्येक बालकाला लवकरात लवकर मोफत, सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि वैकल्पिकदृष्ट्या सुयोग्य वातावरण मिळवून देणारे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण सहज उपलब्ध करुन देणे."
३. सद्यस्थितीत वय वर्ष ३ ते ६ वयोगटातील बालकांना अंगणवाड्या, बालवाड्या, शाळेला जोडून पूर्व प्राथमिक वर्ग व खाजगी पूर्व प्राथमिक वर्ग यामधून शिक्षण दिले जाते. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्या व अंगणवाड्या यांची नोंदणी व माहिती महिला व बाल विकास विभाग यांचेकडे उपलब्ध आहे. तथापि खाजगी पूर्व प्राथमिक वर्गाची अधिकृत माहिती सद्यःस्थितीमध्ये शासनाकडे उपलब्ध नाही. वयोगट ३ ते ६ साठी पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खाजगी केंद्रांची
माहिती एकत्रित स्वरुपात राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर तसेच पालकांनाही उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी वयोगट ३ ते ६ यांना शिक्षण देणारे केंद्र Pre. School, Nursery, Jr. K.G., Sr. K. G., पूर्व प्राथमिक वर्ग अशा कोणत्याही नावाने सुरु असलेल्या, वयोगट ३ ते ६ मधील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांची नोंदणी करण्यासाठी Pre School Registration पोर्टल शासनाकडून सुरु करण्यात आले आहे. यामध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांची सर्वसाधारण माहिती, व्यवस्थापनाची माहिती, विद्यार्थी संख्या, भौतिक सुविधा, कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माहिती यांची नोंद पोर्टलवर करावयाची आहे.
४. पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांच्या नोंदणीची सुविधा
education.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर Web Links मध्ये उपलब्ध असलेल्या Pre-School Registration Portal (ECCE) या टॅबवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यामुळे ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांनी या पोर्टलवर पुढील सात दिवसांच्या आत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येत आहे.
५. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी यासंदर्भातील कार्यपूर्ती अहवाल शासनास सादर करावा.
६. सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२५०४२४११२९१९४२२१ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
👉 शासन निर्णय शासन परिपत्रक पीडीएफ मध्ये हवा असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 👈
उप सचिव, महाराष्ट्र शासन
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon