Shala Geo Tagging Maha School GIS App
क्र. आशिका/२०२६/जिओ टॅगिंग/ई-गव्ह १४३/प्रति,
स्वाक्षरीत दिनांक
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) (जि.प.) (सर्व)
३. शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी (मनपा) (सर्व)
विषय : राज्यातील सर्व शाळांचे "Maha School GIS" ॲपवर जिओ टॅगिंग करण्याबाबत.
संदर्भ : १. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर (MRSAC) सोबत दि. ०४.०२.२०२५ रोजीचा करारनामा
२. शासन परिपत्रक क्रमांक: ईगव्ह-२०२५/प्र.क्र.७/संगणक, दिनांक. २३ एप्रिल, २०२५
३. शासन पत्र क्रमांक: संकिर्ण-२०२५/प्र.क्र.७/संगणक, दि. ०५.०२.२०२६
४. आयुक्त कार्यालयाचे पत्र क्र. आशिका/२०२५/एमआरसेंक/ईगव्ह. १४३, दिनांक. ३०/०४/२०२५
५. आयुक्त कार्यालयाचे पत्र क्र. आशिका/२०२५/Geo Tagging/ईगव्ह-१४३/१६१४३७४; दिनांक १९.१२.२०२५
६. आयुक्त कार्यालयाचे पत्र क्र. आशिका/२०२५/Geo Tagging/ईगव्ह-१४३/१६७७४४६: दिनांक.१८.०१.२०२६
७. आयुक्त कार्यालयाचे पत्र क्र. आशिका/२०२६/जिओ टॅगिंग/ईगव्ह-१४३/१९७३५९४; दिनांक. २१.०६.२०२६
८. आयुक्त कार्यालयाचे पत्र क्र. आशिका/२०२६/जिओ टॅगिंग/ईगव्ह-१४३/२०२४८७९; दिनांक. १६.०७.२०२६
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर या संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करुन भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे (geospatial technology) सर्व माहिती एकत्रित करण्याकरीता Mobile App: "Maha School GIS" अॅप विकसित करण्यात आले आहे.
उपरोक्त संदर्भीय पत्रांद्वारे तसेच व्हीसीद्वारे आढावा बैठकांमध्ये राज्यातील सर्व शाळांचे "Maha School GIS" मोबाईल अॅपद्वारे जिओ-टॅगिंग विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच प्रलंबित शाळांचे जिओ-टॅगिंग तातडीने पूर्ण करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याबाबत मा. प्रधान सचिव यांच्याकडून आढावा घेण्यात आला असून सदर बाबतीत दिरंगाई होत असलेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच विधानसभा/विधानपरिषदेमध्ये शाळांचे मॅपिंग अपूर्ण असलेबाबत वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. प्रकरणी या कार्यालयाकडून वारंवार सूचना देऊनही सद्यस्थितीत राज्यातील एकूण १,०८,०८६ शाळांपैकी १,०७,८९८ शाळांचे मॅपिंग पूर्ण झाले असून १८८ शाळांचे मॅपिंग अद्याप प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे.
शाळांच्या मॅपिंगचा अद्ययावत जिल्हानिहाय अहवाल तसेच मॅप/अनमॅप शाळांचा सविस्तर अहवाल education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील Maha School GIS Reports विभागात उपलब्ध आहे. सदर अहवालाचा आढावा घेऊन प्रलंबित शाळांचे जिओ-टॅगिंग पूर्ण करण्याची कार्यवाही ७ दिवसांत पूर्ण करण्यात यावी.
या स्मरणपत्रान्वये सूचित करण्यात येते की, प्रलंबित/सद्यस्थितीत मॅपिंग न झालेल्या चालू स्थितीतील शाळांचे मॅपिंग ७दिवसात पूर्ण करून इतर शाळांबाबतीत कारणांसह अहवाल सर्व संबंधित शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकरी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत या कार्यालयास सादर करावा. सदर कामकाज विहित मुदतीत पूर्ण न झाल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांची राहील. कामकाजात दिरंगाई अथवा निष्काळजीपणा आढळल्यास नियमानुसार शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. सदर बाबीकडे प्राधान्याने लक्ष देवून सर्व शाळांचे मॅपिंग विहित कालमर्यादेत पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी.
सर्व संबंधितांनी अनमॅप शाळांबाबतचा अनुपालन अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत तात्काळ या कार्यालयास सादर करावा. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्या विभागातील प्राप्त अनुपालन अहवालाचे संकलन करून एकत्रित अहवाल या कार्यालयास सादर करावा.
सोबत मॅप व अनमॅप शाळांचा जिल्हानिहाय सारांश अहवाल
Digitally signed by Harun Ismail Atar Date: 29-09-2026 17:32:04
(हारुन आतार) शिक्षण सहसंचालक
(प्रशासन, अंदाज व नियोजन)
शिक्षण आयुक्तालय, म. राज्य, पुणे
Regarding Geo Tagging of all schools in the state
राज्यातील सर्व शाळांचे Geo Tagging करण्याबाबत.
दिनांक :- २३ एप्रिल, २०२५
संदर्भ :-
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर यांचा
दि. ०४.०२.२०२५ रोजीचा करारनामा
प्रस्तावना :-
राज्यातील सर्व शाळांबाबतची विस्तृत माहिती केंद्र शासनाच्या UDISE plus या पोर्टलवर उपलब्ध असून यामध्ये शाळांबाबतची विविध माहिती जसे विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, संगणकीय सुविधा इ. माहिती या पोर्टलवर उपलब्ध असून या माहितीचा वापर शासन स्तरावर विविध धोरण/कार्यक्रमांची आखणी तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार करताना होत असतो. तथापि, धोरणांच्या आखणीकरीता व अंमलबजावणीकरीता अन्य माहिती जसे गांव, वाडया, वस्ती यांचे ठिकाण (Location), लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा, राज्यमार्ग/महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, दोन शाळांमधील अंतर, शाळांच्या नजिक शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती विभागाकडे सद्यःस्थितीत उपलब्ध नव्हती.
२. ही कमतरता भरुन काढण्याकरीता महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर (MRSAC) या संस्थेसोबत दि.०४.०२.२०२५ रोजी करारनामा करण्यात आला आहे. त्यामुळे MRSAC कडे उपलब्ध विविध विभागांची माहिती व UDISE plus या पोर्टलवरील शालेय शिक्षण विभागांची माहिती यांचे एकत्रिकरण करुन सदरहू माहिती एका स्वतंत्र Dash Board वर उपलब्ध करण्यात येणार आहे. या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागास संबंधित विविध योजनांच्या आखणीकरीता व अंमलबजावणीकरीता होणार आहे. त्या अनुषंगाने सदर करारनामा करण्यात आला आहे.
३. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर या संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करुन भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे (geospatial technology) सर्व माहिती एकत्रित करण्याकरीता Mobile App: "Maha School GIS" अॅप विकसित करण्यात आले आहे. सदर अॅपचे लोकार्पण मा. मंत्रीमंडळाच्या दि.२२.४.२०२५ रोजीच्या बैठकीमध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानुसार संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापक यांनी यासंदर्भात करावयाच्या पुढील कार्यवाहीबाबत सुचना निर्गमित करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करुन भौगोलिक तंत्रज्ञानाव्दारे (geospatial technology) सर्व माहिती एकत्रित करण्याकरीता Mobile App: "Maha School GIS" अॅप विकसित केले आहे.
Maha School GIS Mobile App Link
२. सदर अॅप मध्ये शाळांना त्यांचा युडायस कोड किंवा युडयस प्लस मधील संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करावयाचे आहे. त्यानंतर शाळेची युडयस प्लस मध्ये भरलेली माहिती या अॅपमध्ये दिसेल. त्यानंतर शाळेचे GIS Location (Latitude & Longitude with time stamp) Capture करुन शाळेचे नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण ५ फोटो समाविष्ट करुन शाळेने माहिती भरावयाची आहे.
३. सदर माहिती संबंधीत अॅप वर भरतांना संबंधीत मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो / माहिती अद्ययावत करण्याची खबरदारी घेण्यात यावी.
४. सदर माहिती संबंधीत अॅपवर दि. ३० एप्रिल, २०२५ पुर्वी अद्ययावत करण्यात यावी.
५. सर्व शाळांकडून ही माहिती भरून घेण्यात येत असल्याची खातरजमा संबंधीत शिक्षणाधिकारी यांनी करावी.
६. विहीत मुदतीत ही कार्यवाही पूर्ण होण्याच्या अनुषंगाने आवश्यक प्रशासकीय सूचना आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी निर्गमित कराव्यात.
७. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०४२३११५१००१०२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासन निर्णय /शासन परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
उप सचिव महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: ईगव्ह-२०२५/प्र.क्र.७/संगणक, मंत्रालय, मुंबई



Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon