DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

e Hakk Apply Online For Mutations

 e Hakk Apply Online For Mutations 

e Hakk Pranali

e Hakk Apply Online For Mutations 

Implementation of e-rights system

ई-हक्क प्रणाली अंमलबजावणीबाबत परिपत्रक 

मा. जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वतीने व जिल्हाधिकारी पुणे यांच्या मदतीने 'ई-हक्क' नावाने नवीन ऑनलाईन आज्ञावली (PDE Public Data Entry) विकसित करण्यात आलेली असून या आज्ञावलीमध्ये अधिकार अभिलेखात आवश्यक त्या नोंदी गाव नमुना सातबारावर दाखल होण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ नुसार प्रतिवृत्त देण्यासाठी जो अर्ज करावा लागतो तो अर्ज तलाठी कार्यालयात न जाता घरी बसून देखील ई- हक्क प्रणालीद्वारे दाखल करता येण्याची सुविधा दिलेली आहे. मा. शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक राभुअ-२०२१/प्र.क्र.२११/ल-१ दिनांक ०५ डिसेंबर २०२३ अन्वये ई-हक्क प्रणालीव्दारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणेत आलेली आहे. अनोंदणीकृत फेरफार नोंदीसाठी १००% ई-हक्क प्रणालीचा वापर सुरु करण्याबाबत निर्देश दिलेले आहे. मात्र ई-हक्क प्रणालीबाबत नागरीकांमध्ये अजूनही प्रचार झालेला नसल्याने नागरिकांकडून ई-हक्क प्रणालीद्वारे दाखल करण्यात येणाऱ्या अर्जाचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच खातेदारांकडून ई-हक्क प्रणालीद्वारे सादर केलेल्या अर्जाच्या मंजुरीचे प्रमाण जिल्हयात अत्यल्प आहे. ई-हक्क प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने ई-हक्क नोंदणी, ई-हक्क प्रणालीद्वारे आलेल्या अर्जावर तलाठी यांनी करावयाची कार्यवाही, ई-हक्क प्रणालीवर तलाठी स्तरावर पूर्वी नामंजूर झालेल्या नोंदीवर करावयाची कार्यवाही व ई-हक्क प्रचार व प्रसिद्धी याबाबत पुढीलप्रमाणे दिशानिर्देश देण्यात येत आहेत :-

ई हक्क प्रणालीव्दारे फेरफार नोंदीचे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये पुढील नोंदीचे अर्ज करता येतात :-

१. ई-करार नोंद.

२. बोजा चढविणे/गहाणखत. 

३. बोजा कमी करणे. 

४. वारस नोंद. 

५. मयताचे नाव कमी करणे. 

६. अज्ञान पालन कर्ता शेरा कमी करणे. 

७. एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे. 

८. विश्वस्तांचे नांव बदलणे. 

९. खातेदाराची माहिती भरणे.

१०. हस्तलिखित व संगणकीकृत तफावत संबधीचे अर्ज. 

११. मयत कुळाची वारस नोंद. 

ई-हक्क नोंदणी (खातेदार बँका व सहकारी सोसायटी) यांच्यासाठी नोंदणीबाबत. 

१. खातेदार, बँका व सहकारी सोसायटी यांनी 

LINK

या वेबसाईट मध्ये लॉगीन करून create new user account यावर जावं. 

२. नागरिकांनी स्वतःचं नाव, मधले नाव, आडनाव व सहकारी सोसायटी व बँका यांनी संबंधित सहकारी सासायटी व बँकेचे नाव दाखल करावे. 

३. स्वतःचा user id व password तयार करावा. 

४. select security question यावर जाऊन security question निवडून security answer दाखल करावे. 

५. स्वतःचा मोबाईल नंबर, ई-मेल आय डी, pan card नंबर, पिन कोड नंबर, राज्य, जिल्हा, शहर / गाव, पत्ता, अचूक नमूद करून CAPTCHA नमूद करून SAVE करणे वर क्लिक करावे. 

६. ई-हक्क प्रणालीला नोंदणी झाल्यावर नागरिक हे वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अज्ञानपालक त्याचे नाव (अपाक) कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमें) कमी करणे, विश्वस्तांचे नाव कमी करणे, संगणकीकृत ७/१२ मधील चूक दुरुस्ती करण्यासाठी अर्ज इतक्या प्रकारासाठी सर्व हितसंबंधी यांचे पत्ते व आवश्यक कागदपत्र अपलोड करून फेरफारासाठी अर्ज अपलोड करू शकतात.

७. ई-हक्क प्रणालीला नोंदणी झाल्यावर बँका व सहकारी सोसायटी ह्या ईकरार नोंदी, बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे आदी प्रकारासाठी सर्व हितसंबंधी यांचे पत्ते व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फेरफारसाठी अर्ज अपलोड करू शकतात. 

८. खातेदार नागरिक, बँका व सहकारी सोसायटी यांनी फेरफारासाठी दाखल केलेल्या अर्जात खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्यास महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील दिनांक १५ जुलै २०१० रोजीच्या परिपत्रकामध्ये नमूद केलेल्याप्रमाणे भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १९३(२), १९९, २०० नुसार कार्यवाहीस पात्र राहतील. 

खातेदार नागरिकाने ११ प्रकारातील सुविधांतर्गत अर्ज लेखी स्वरुपात (offline) दाखल केल्यास त्यास सदर अर्ज ई-हक्क प्रणालीमार्फत दाखल करणेसाठी सांगावे. खातेदार ई-हक्क प्रणालीमधुन अर्ज करणेसाठी सक्षम नसल्यास तलाठी / मंडळ अधिकारी / तहसील कार्यालय / उपविभागीय अधिकारी कार्यालय / जिल्हाधिकारी कार्यालयाने यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. संबंधित अर्जदाराचा अर्ज ई-हक्क प्रणालीमार्फत नोंदविणेची जबाबदारी नेमलेल्या कर्मचाऱ्याची राहील कुठल्याही परिस्थितीत लेखी (offline) अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

ई हक्क प्रणालीद्वारे आलेल्या अर्जावर तलाठी यांनी करावयाची कार्यवाही :-

१. ई-हक्क प्रणालीद्वारे आलेल्या अर्जाच्या अनुषंगाने तलाठी यांनी प्रतिवृत्त देणारे नागरिक खातेदार, सहकारी सोसायटी व बँका यांनी फेरफार प्रकारानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर अधिकार अभिलेखात आवश्यक त्या नोंदी घेण्याची कार्यवाही करावी. 

२. ई-हक्क प्रणालीद्वारे आलेल्या अर्जाच्या अनुषंगाने तलाठी यांनी प्रतिवृत्त देणार नागरिक खातेदार वा सहकारी सोसायटी वा बँका यांनी फेरफार प्रकारानुसार आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता केली नसेल तर अधिकार अभिलेखात आवश्यक त्या नोंदी घेण्याची कार्यवाही करावी, तसेच त्या कागदपत्रांनी अपूर्णता आहे त्याबाबत प्रतिवत्त देणार यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ११० नुसार कागदपत्र सादर करणेबाबत लेखी कळवावे. 

३. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १५१ नुसार कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत लेखी कळवूनही प्रतिवृत्त देणार यांनी कागदपत्रे यांची पूर्तता न केल्यास तलाठी यांनी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील दिनांक ३० जुलै, २००८ रोजीच्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे तपासणी सुचीत आवश्यक ते अभिप्राय नोंदवून प्रकरण निर्णयासाठी मंडळ अधिकारी यांच्याकडे पाठवावे, जी बाब तलाठी यांनी लेखी कळविली आहे त्याबाबत पुनःश्च मंडळ अधिकारी यांनी संबंधित प्रतिवृत्त देणार यांना न कळविता फेरफाराबाबत आवश्यक तो निर्णय घेणे बंधनकारक राहील. 

४. प्रतिवृत्त देणार यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्यावर सदरचा अर्ज मंजूर अथवा नामंजूर करण्याचे अधिकार तलाठी यांना नसून अधिकार अभिलेखात नोंद दाखल करूनच त्यावर मंडळ अधिकारी यांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे याची सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी नोंद घ्यावी.

• ई-हक्क प्रणालीवर तलाठी स्तरावर पूर्वी नामंजूर झालेल्या नोंदीवर करावयाची कार्यवाही :-

१. ई-हक्क प्रणालीव्दारे यापूर्वी आलेल्या अर्जाचे ज्या फेरफारामध्ये रुपांतर झालेले नाही अशा अर्जाच्या प्रकारानुसार महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभाग यांच्याकडील दिनांक १५ जुलै, २०१० रोजीच्या परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रे सादर करण्याबाबत प्रतिवृत्त देणार यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १५१ नुसार लेखी कळवावे. 

२. प्रतिवृत्त देणार यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर अधिकार अभिलेखात आवश्यक त्या नोंदी घेण्याची कार्यवाही करावी. 

३. प्रतिवृत्त देणार यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली नसेल तर अधिकार अभिलेखात आवश्यक त्या नोंदी घेण्याची कार्यवाही करावी व ज्या कागदपत्रांची अपूर्णता आहे त्याबाबत प्रतिवृत्त देणार यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व्या कलम १५१ नुसार कागदपत्रे सादर करण्याबाबत लेखी कळवावे. 

४. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १५१ नुसार कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत पुनःश्च लेखी कळवूनही प्रतिवृत्त देणार यांनी कागदपत्रे यांची पूर्तता न केल्यास

तलाठी यांनी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील दिनांक ३० जुलै, २००८ रोजीच्या परिपत्रकात नमूद केलेप्रमाणे तपासणी सूचीत आवश्यक ते अभिप्राय नोंदवून प्रकरण निर्णयासाठी मंडळ अधिकारी यांच्याकडे पाठवावे. 

जी बाब तलाठी यांनी लेखी कळविली आहे त्याबाबत पुनःश्च मंडळ अधिकारी यांनी संबंधित प्रतिवृत्त देणार यांना न कळविता फेरफाराबाबत आवश्यक तो निर्णय घेणे बंधनकारक राहील. 

५. ई-हक्क प्रणालीद्वारे यापूर्वी आलेल्या ज्या अर्जाचे फेरफारामध्ये रुपांतर झालेले आहे त्याबाबत तसा लेखी अहवाल तहसीलदार यांना द्यावा. 

६. तहसिलदार व DBA यांनी ई-हक्क प्रणालीद्वारे यापूर्वी आलेल्या सर्व अर्जाचे फेरफारांमध्ये रुपांतर होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही झाली अथवा कसे? याबाबत मासिक बैठकीमध्ये आढावा घ्यावा व ज्या अर्जाचे फेरफारांमध्ये रुपांतर झालेले आहे त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. 

ई-हक्क प्रचार व प्रसिद्धी :-

१. तहसिलदार व DBA यांनी प्रथम टप्प्यात आपल्या तालुक्यातील सर्व गावांत ई-हक्क नोंदणीबाबत सर्वप्रथम तलाठी व मंडळ अधिकारी यांना प्रशिक्षण देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. 

२. तहसिलदार व DBA यांनी व्दितीय टप्प्यात आपल्या तालुक्यातील सर्व गावांत ई-हक्क नोंदणीबाबत सर्व सहकारी सोसायटी व बँका यांना प्रशिक्षण देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.

४. प्रांताधिकारी यांनी ई-हक्क प्रणाली अंमलबजावणीबाबत दर १५ दिवसांनी आढावा घ्यावा. 

५. ई-हक्क प्रणालीमार्फत प्राप्त अर्ज विना कार्यवाही नोंद निर्गतीसाठी विहित केलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ प्रलंबित राहणार नाहीत याची संबंधित कर्मचारी / अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. 

६. तहसिलदार व DBA यांनी ई-हक्क प्रणालीच्या प्रचार व प्रसिद्धीबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon