DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Talathi Kotwal Designation Change Govt Decision

Talathi Kotwal Designation Change Govt Decision 


तलाठी आणि कोतवाल पदनाम बदल शासन निर्णय  
Talathi Kotwal Designation Change Govt Decision 

महसूल विभागातील तलाठी पदाचे पदनाम बदलून "ग्राम महसूल अधिकारी" करणेबाबत.

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.२१३/ई-१० मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक : १४ ऑक्टोबर, २०२४

प्रस्तावना:-

तलाठ्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम १४, ७६, १४९, १५०, १५१, १५३, १५४ या कलमात नमूद केलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. जिल्हाधिकारी याने नमूद केलेली नोंदणीपत्रके, रजिस्टरे व जमाखर्च लिहिण्याचे काम तलाठ्याकडे असते. जमीन महसूल व जमीन महसूल थकबाकी म्हणून सर्व रकमा त्यास गोळा कराव्या लागतात. कोणत्याही वरिष्ठ महसूल अधिकारी किंवा पोलीस सांगेल ते गावासंबंधी लिहिण्याचे काम तलाठ्यास करावे लागते. महसूल विभागातील तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून "ग्राम महसूल अधिकारी" असे पदनाम करण्याची विनंती महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांच्याद्वारे करण्यात येत होती. महसूल विभागातील तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून "ग्राम महसूल अधिकारी" असे पदनाम करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाच्या पदनामात बदल करून "ग्राम महसूल अधिकारी" असे पदनाम करण्यास पुढील अटींच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहे.:-

(१) वरीलप्रमाणे पदनाम बदलामुळे भविष्यात वेतनश्रेणी वाढी संदर्भात प्राप्त होणारी कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही. तसेच, पदनाम बदलानंतर वेतनश्रेणी / वेतनस्तर देण्याच्या अनुषंगाने भविष्यात वेतनत्रुटी समितीपुढे मागणी करता येणार नाही व अशी मागणी विचारात घेतली जाणार नाही.

(२) सातव्या वेतन आयोगानुसार "तलाठी" या पदाची वेतनश्रेणी एस-८, रु.२५५००-८११००/- अशी आहे. तलाठी या पदनामामध्ये बदल केल्यामुळे या वेतनस्तरामध्ये अथवा वेतनश्रेणीमध्ये बदल करण्याची वा वेगळयाने वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी विचारात घेतली जाणार नाही.

(३) वरीलप्रमाणे पदनाम बदलानंतर सध्याच्या गट-क संवर्गामध्ये कोणताही बदल होणार नाही वा गट बदला संदर्भातील कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 🌐 👉 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१०१४१५५७४६३९१९ असा आहे. हा आदेश

डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने 


(संजय बनकर) 
सह सचिव, महाराष्ट्र शासन

महसूल विभागातील कोतवाल पदाचे पदनाम बदलून "महसूल सेवक" करणेबाबत.

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.४१२/ई-१० मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक :- १४ ऑक्टोबर, २०२४

प्रस्तावना:-

राज्यातील कोतवालांनी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. मंत्री महोदय व मा. लोकप्रतिनिधींना केलेल्या विविध मागण्यांमध्ये कोतवाल पदाचे पदनाम बदलून "महसूल सेवक करावे, अशी मागणी केलेली आहे. कोतवालांना चतुर्थ वर्ग श्रेणी लागू करणे व इतर मागण्यांच्या संदर्भात मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि.३.७.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निदेशानुसार अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सचिव समितीची गुरूवार, दि.२९.८.२०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत समितीने कोतवाल पद हे ब्रिटीश काळापासून अस्तित्वात असल्याने कोतवाल पदाचे पदनाम महसूल सेवक करण्यात यावे, अशी शिफारस केली आहे. त्यानुषंगाने कोतवाल पदाचे पदनाम बदलून महसूल सेवक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार व कोतवालांची विनंती विचारात घेता, पुढील अर्टीच्या अधिन राहून महसूल विभागातील कोतवालांच्या पदनामात बदल करून "महसूल सेवक" असे पदनाम करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.:- (१) वरीलप्रमाणे पदनाम बदलामुळे भविष्यात शासकीय कर्मचाऱ्यांनुसार वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही. (२) वरीलप्रमाणे पदनामामध्ये बदल केल्यामुळे कोतवालांच्या मानधनामध्ये तसेच सेवाविषयक बाबींमध्येही कोणताही बदल होणार नाही वा यासंदर्भातील कोणतीही मागणी विचारात घेतली

जाणार नाही.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 🌐👉 www.maharashtra.gov.in 👈या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१०१४१५५३२५७९१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon