Documents Proof of Age are Mandatory for Players
दिनांक: १५.१०.२०२४.
विषय : शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंना वयाच्या पुरावा म्हणून कागदपत्रे अनिवार्य करण्याबाबत.
संदर्भ: संचालनालयाचे दिनांक २७.०४.२०२२ चे पत्र.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत, तालुका, जिल्हा, विभाग तसेच राज्य स्तरावर भारतीय शालेय खेळ महासंघ, सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा तसेच जवाहरलाल नेहरु चषक हॉकी स्पर्धांचे आयोजन राज्यात विविध स्तरावर करण्यात येते. सदर स्पर्धांचे आयोजन हे १४, १५,१७ तसेच १९ वर्षे वयोगटामध्ये करण्यात येते. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी शाळेकडे नोंद असलेली जन्मतारखेचा प्रवेश अर्ज व आधारकार्डची प्रत ही जन्मतारखेचा पुरावा म्हणुन घेण्यात येते.
काही खेळप्रकारांमध्ये अधिक वयाचे खेळाडू वय कमी करुन कमी वयोगटांच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असल्याच्या तक्रारी संचालनालयास प्राप्त झालेल्या आहेत. तक्रारी प्राप्त झालेल्या खेळाडूंच्या वयाबाबतची शहानिशा ते शिकत असलेल्या शाळामध्ये केली असता हेतुपुरस्पर कागदत्रांमध्ये फेरफार करुन वय कमी केल्याचे आढळुन आले आहे. तसेच काही खेळाडू शालेय क्रीडा स्पर्धा व एकविध खेळ संघटना पुरस्कृत क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या जन्मतारखा धारण करुन खेळल्याचे निदर्शनास आले आहे. सदरची बाब गंभीर असुन क्रीडा विकासास मारक ठरणारी आहे. सदरच्या गैरकृत्यांना आळा बसण्यासाठी शालेय व इतर क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी खेळाडूंचे वय निश्चित करण्यासाठी विहीत नमुण्यामधील प्रवेश अर्जासोबत खालील नमूद कागदपत्रे अनिवार्य करण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आले आहे. तथापि, पुनश्च अशाच प्रकारची प्रकरणे निदर्शनास आलेली आहेत, त्यानुसार पुनश्च आपणांस जन्मतारखेच्या पुराव्यांबाबत खालीलप्रमाणे आदेशित करण्यात येत आहे.
• जन्मतारीख निश्चित करण्यासाठी खालीलपैकी एक पुरावा असणे अनिवार्य आहे:
१. संबंधित खेळाडूचे वय १ वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्मदाखला. किंवा...
२. संबंधित खेळाडूचे वय किमान ५ वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्मदाखला. किंवा....
३. संबंधित खेळाडूच्या वयाची ५ वर्षे पुर्ण झाल्यानंतर संबंधित शासकीय विभागाचा जन्मदाखला असेल तर खेळाडूच्या १ ल्या इयत्तेतील प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टरची सत्यप्रत अनिवार्य.
• वरीलपैकी एका जन्मपुराव्यासोबत खालीलपैकी एक कागदपत्र असणे अनिवार्य आहे.
. आधारकार्ड १
२. पासपोर्ट.
हेही वाचाल
संबंधित खेळाडूचा शालेय प्रवेश अर्ज, जन्मदाखला, १ ल्या इयत्तेतील जनरल रजिस्टरमधील जन्मतारीख व आधारकार्ड तथा पासपोर्ट यामधील नमूद जन्मतारीख सारखीच असणे आवश्यक आहे. नसल्यास, अशा खेळाडूस त्या वयोगटासाठी पात्र समजण्यात येऊ नये. वरीलप्रमाणे नमुद केल्यानुसार यापुढील कालावधीत शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडूंचा वयोगटातील सहभाग हा वरील नमुद कागदपत्रे तसेच नियमाच्या आधारे निश्चीत करावा.
याबाबत शालेय स्पर्धा आयोजनविषयक परिपत्रकांमधुन आवश्यक त्या सुचना द्याव्यात. जेणेकरुन वय कमी करून सहभागी होणाऱ्या खेळाडूंमुळे क्रीडा विकासास मारक ठरणाऱ्या गैरकृत्यांना आळा घालणे शक्य होईल.
सहसंचालक,
क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.
Kheladuna Vya Purava Kagatpatre
Documents as Proof of Age Mandatory for Athletes participating in school and other sports competitions
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
क्र. क्रीयुसे/एखेसं/स्पर्धा/वय/२०२४-२५/का-४/ 2455
प्रति,
१. विभागीय उपसंचालक (सर्व)
२. जिल्हा क्रीडा अधिकारी (सर्व)
महाराष्ट्र राज्य
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon