DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Shaley Rashtriy Krida Spardha Aayojan

Shaley Rashtriy Krida Spardha Aayojan

Organizing school national sports competition 

Regarding organization of pre-national competition training camp.

 National School Field Sports Tournament

विषय:- 

६८ वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन सन २०२४-२५. 

राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर आयोजनाबाबत.

संदर्भ:- भारतीय शालेय खेळ महासंघाचे पत्र क्र.१०३३ दि.२८.०८.२०२४.

भारतीय शालेय खेळ महासंघाने ६८ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन निश्चीत केले असून संदर्भिय पत्रानुसार स्पर्धांचा अंदाजित कालावधी स्पर्धा आयोजन स्थळे कळविली आहेत. राज्याचे संघ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी सदर खेळांच्या ५ दिवसीय राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करणे प्रस्तावित असून स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे व राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचा संघ सहभागी करण्याची जबाबदारी खालीलप्रमाणे निश्चीत करण्यात आली आहे.



ज्या विभागीय उपसंचालक/जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांना संबधित खेळाच्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांची जबाबदारी सोपविलेली आहे अशा कार्यालयांनी राज्य संघाची निवड प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या खेळाडूंच्या प्रवेशिका विहीत वेळेत भारतीय शालेय खेळ महासंघाच्या संकेतस्थळावर ऑनलाईनद्वारे भराव्यात. तसेच शिबीर आयोजक कार्यालयांकडून राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर स्थळ व कार्यक्रम प्राप्त करुन घ्यावा व पात्र खेळाडूंना शिबीरस्थळी उपस्थिती देण्याबाबत सुचित करावे. या पत्रासोबत जोडलेल्या नमुण्यात सहभागी होणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक व व्यवस्थापक यांच्या ट्रॅकसुट व क्रीडा गणवेश ची मापे संचालनालयास त्वरीत सादर करावीत.
राष्ट्रीय स्पर्धेस निवड झालेल्या खेळाडूंची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर राज्य प्रवेशिकेच्या ३ प्रती भारतीय शालेय खेळ महासंघास स्पर्धास्थळी सादर करावयाच्या असून त्या प्रति आपल्या विभागातील विभागीय उपसंचालक यांच्या स्वाक्षरीने शिबीर आयोजक कार्यालयांस पाठवून त्याची एक प्रत संचालनालयास सादर करावी. तसेच राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर व राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचा संघ सहभागी करताना खालील सुचनांचे पालन काटेकोरपणे करावे.

> स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीरासाठी महत्वूपर्ण सुचना:-

१. राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीराच्या ठिकाणी खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था, परीसर स्वच्छता तसेच स्वच्छ पाणीपुरवठा याची व्यवस्था प्राधान्याने करावी.
२. स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीरासाठी आवश्यक मैदान व्यवस्था, क्रीडा साहीत्य उपलब्ध करुन द्यावे.
३. राज्यस्तरीय स्पर्धा आयोजक तसेच राज्य संघ निवड चाचणी आयोजक कार्यालयांनी राज्य संघात निवड झालेल्या खेळाडू, मार्गदर्शक, व्यवस्थापक यांची ट्रॅकसुट व गणवेशाची मापे सोबत जोडलेल्या नमुण्यात संचालनालयास त्वरीत सादर करावीत.
४. राज्यस्तरीय स्पर्धा/निवड चाचणी आयोजक कार्यालयांनी ऑनलाईन प्रवेशिका भरल्याची खात्री करावी.
५. राज्याचे खेहाडू राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनाआरक्षण प्रवास करणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
६. राष्ट्रीय स्पर्धेकरीता ज्या क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा अधिकारी तथा इतर कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध करून
दिल्या आहेत, त्यांना संबधित कार्यालय प्रमुखांनी तात्काळ कार्यमुक्त करुन स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीर व
राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचा संघ सहभागी करण्याकामी उपस्थित राहणेबाबत सुचना दयाव्यात. ७. अनुपस्थित क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा अधिकारी तथा इतर कर्मचारी यांचा अहवाल उपस्थिती दिनांक रोजी संचालनालयास न चुकता सादर करावा.
८. राष्ट्रीय स्पर्धेस निघण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार असल्याची खात्री करावी.
९. भोजन, निवास तसेच मैदान व्यवस्थेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी.
१०. उपरोक्त प्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या स्पर्धापुर्व प्र. शिबीराच्या ठिकाणा मध्ये कोणताही बदल होणार नाही याची नोद घ्यावी.
> राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूकडे खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :-
१. आधारकार्डची मूळ प्रत तसेच झेरॉक्स ३ प्रति.
२. विहीत नमुण्यामधील प्राचार्य/मुख्याध्यापक यांच्या सहीचे ओळखपत्र ३ प्रति.
३. जन्मदाखल्याची मूळ प्रत तसेच झेरॉक्स ३ प्रति.
> राष्ट्रीय स्पर्धेसाठी महत्वपूर्ण सुचना:-
१. राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा प्रवास विनाआरक्षण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
२. संघाचे व्यवस्थापक यांनी सोबत ६ बाय ४ फुट साईजचा राज्याचा झेंडा (२ नग) सोबत न्यावा.
३. सर्व संघव्यवस्थापक यांच्याकडे संचालनाकडून दिलेले Authority Letter असणे बंधनकारक आहे.
४. राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान काही अडचणी आल्यास त्याबाबत संचालनालयास तात्काळ अवगत करावे.
५. राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाल्यानंतर तात्काळ राष्ट्रीय स्पर्धेचा सविस्तर अहवाल संचालनालयास सादर करावा.
६. ज्या खेळाडूंनी स्पर्धेत प्राविण्य मिळविले आहे, अशा खेळाडूंची प्राविण्याबाबतची अचूक माहिती
संचालनालयास उपलब्ध करुन द्यावी अन्यथा एखादा खेळाडू शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.
- राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण व राष्ट्रीय स्पर्धा अहवालासोबत सादर करावयाच्या बाबीः-
१. राष्ट्रीय स्पर्धेचा सविस्तर अहवाल.
२. राष्ट्रीय स्पर्धेची भाग्यपत्रीका व अंतिम निकाल.
३. चषक व इतर रोख स्वरूपात मिळालेल्या बक्षिसांची माहीती.
४. राष्ट्रीय स्पर्धेत संघ सहभागी झालेबाबत संघाची प्रवेशिका. (साक्षांकित झेरॉक्स)
५. ट्रॅकसूट-गणवेश, प्रमाणपत्र वाटप सहभाग व प्राविण्यबाबतची माहीती. (परिशिष्ट एक) ६. स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर कालावधीतील उपस्थितीपत्रक. (परिशिष्ट दोन)
७. सहभागी खेळाडूंना अदा केलेल्या प्रवासखर्चाचा तपशिल. (परिशिष्ट तीन)
८. शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंना अदा केलेला हातखर्ची भत्ता. (परिशिष्ट चार)
९. सहभागी मार्गदर्शक/व्यवस्थापक यांना अदा केलेल्या प्रवासखर्चाचा तपशिल. (परिशिष्ट पाच)
१०. सहभागी मार्गदर्शक/व्यवस्थापक यांना अदा केलेल्या दैनिक भत्याचा तपशिल. (परिशिष्ट सहा)
११. शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रत्यक्ष झालेल्या बाबनिहाय खर्चाची सविस्तर माहीती. (परिशिष्ट सात)
वरीलप्रमाणे नमुद सुचनेनुसार स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीर व राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वरील नमुद माहितीसह राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाल्यानंतर १० दिवसांच्या आत संचालनालयास सादर करावा.

(डॉ. राजेश देशमुख) 
आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.

महाराष्ट्र शासन

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे-४११ ०४५.

संकेतस्थळ : https://sports.maharashtra.gov.in

क्र. क्रीयुसे/राशाक्रीस्प/शिबीरे/२०२४-२५/का-४/१८५८

दि. ०४ सप्टेंबर २०२४

राष्ट्रीय स्पर्धा प्राधान्य.

प्रति,

१. विभागीय उपसंचालक, (सर्व)

२. जिल्हा क्रीडा अधिकारी, (सर्व)

68th School National Sports Tournament 2024-25. Regarding organization of pre-national competition training camp.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon