Remuneration Increase of MDM PMPOSHAN Data Entry Operators
दिनांक: १३ सप्टेंबर, २०२४
प्रस्तावना :-
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कंत्राटी तत्त्वावर डाटा एन्ट्री ऑपरेटर्स कार्यरत आहेत. सदर डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांना संदर्भाधिन दि.०१ जून, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये रु.२०,६५०/- प्रती माह इतके मानधन देण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांचे मानधन तसेच, किमान वेतन अधिनियम, १९४८ नुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना यांना देण्यात येत असलेल्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांचे मानधन दरमहा रु. २५,०००/- इतके करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर मानधन वाढ दि.०१ सप्टेंबर, २०२४ पासून लागू राहील.
Also read - प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतील स्वयंपाकींचे मानधन वाढविले वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
Also read - प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ अंतर्गत करावयाच्या कार्यवाही बाबत वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
२. यासाठीचा खर्च केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत व्यवस्थापन, संनियंत्रण आणि मूल्यमापन (MME) या घटकाकरिता मंजूर असलेल्या अनुदानामधून भागविण्यात यावा.
३. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२६७/१४७१, दि.२७/०६/२०२४ आणि वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.८७४/व्यय-५, दि.२०/०८/२०२४ अन्वये मिळालेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.
४. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०९१३१९३५११२३२१ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(प्रमोद पाटील)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
PMPOSHAN Increase in salary of data entry operators
PMPOSHAN Increase In Remuneration of Data Entry Operators
In Remuneration
Remuneration Increase of MDM PMPOSHAN Data Entry Operators
In Remuneration
in remuneration
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः शापोआ-२०२२/प्र.क्र.४०/एस.डी.३ , मंत्रालय,मुंबई
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon