परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य असणारा राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवा सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत.
दिनांक: २३ सप्टेंबर, २०२४.
प्रस्तावना :
वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक ३१ मार्च, २०२३ यास अनुसरुन संदर्भ क्रमांक २ अन्वये, दिनांक ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे अशा (अ) शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान, (ब) रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तिवेतनधारकास व रुग्णता निवृत्तिवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन /रुग्णता निवृत्तिवेतन लागू होईल. (क) तसेच १००% अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे.
वित्त विभागाने संदर्भ क्रमांक ३ येथील परिपत्रकान्वये संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयानुसार अनुज्ञेय असलेल्या लाभासंदर्भाने कार्यपद्धती निश्चित केली आहे. सदर परिपत्रकातील सूचनेस अनुसरुन या विभागाच्या संदर्भ क्र. ४ अन्वये येथील परिपत्रकान्वये उक्त कार्यपद्धती योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात आली आहे.
संदर्भ क्र.५ येथील परिपत्रकान्वये नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत दिनांक ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्टीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार उक्त कार्यपद्धती निश्चित करताना जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापिठे व तत्सम अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय, योग्य त्या फेरफारासह लागू राहील. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याची कार्यवाही त्यांच्या स्तरावरुन करावी असे सूचित केले आहे. वित्त विभागाच्या सदर सुचनेनुसार पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. सदर आदेश निर्गमित करताना जे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्य आहेत, आणि ज्यांची नियुक्ती ०१.११.२००५ पूर्वी झाली आहे, परंतु ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे पद दि.०१.११.२००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आले असल्याने त्यांचे बाबतीत आदेश निर्गमित करण्याची बाब शासन विचाराधीन होती.
शासन परिपत्रकः
वित्त विभागाच्या दिनांक ३०/०५/२०२४ रोजीच्या परिपत्रकामध्ये उक्त लाभ अनुज्ञेय करण्याबाबतची जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे, ती कार्यपद्धती त्यामधील नमूद अटी व शर्तीसह परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य असणारा राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याबाबतीत अनुसरण्यात यावी.
याअनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील. सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उचित कार्यवाही करावी.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या🌐 👉 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०९२३१४५७४४४०२२ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: अंनियो-२०२३/प्र.क्र.२८/टिएनटी-६ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
वाचा :
१. शासन निर्णय क्रमांकः अंनियो-३४१५/प्र.क्र.२७६/टीएनटी-६, दि.१९/०९/२०१९
२. शासन निर्णय वित्त विभाग क्रमांकः रानियो-२०२२/प्र.क्र.३४/सेवा ४, दि. ३१ मार्च, २०२३
३. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. अंनियो-२०२३/प्र.क्र.२८/टिएनटी-६, दि.१४ जुन, २०२३
४. शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांकः रानिप्र-२०२३/प्र.क्र.५७/सेवा-४, दि. २४ ऑगस्ट, २०२३ ५. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. अंनियो-२०२३/प्र.क्र.२८/टिएनटी-६, दि.०६ सप्टेंबर, २०२३
६. शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांकः रानिप्र-२०२४/प्र.क्र.३५/सेवा-४, दि. ३० मे, २०२४
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon