DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Student Quality Development Campaign Circular

Student Quality Development Campaign

Student Quality Development Campaign Circular

Vidhyarthi Gunvatta Vikas Mahaabhiyan

विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान

दिनांकः २९ जूलै ०२४

विषयः- विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक ०१.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४


परिपत्रक :-

भाग एक- शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय हे राज्यातील प्रत्येक विद्यार्थी / विद्यार्थिनीस गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देणे हे आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत गुणवत्ता पूर्ण शिक्षणा करिता विविध योजना राबविल्या जात आहेत. या ध्येय, धोरणांची व विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरांवर प्रभावी अंमलबजावणी, पडताळणी तसेच वेळोवेळी या अभियानांच्या फलनिष्पत्तीचा विचार करून सुधारणा करणे आवश्यक असते. मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २६.०७.२०२४ रोजी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने माहे ऑगस्ट-२०२४ मध्ये "विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान" राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते काय, तसेच अंमलबजावणीमध्ये येणा-या अडथळयांचा विचार करुन, आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्यास्तव सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी "विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान" अंतर्गत दिनांक ०१.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४ या कालावधीदरम्यान परिशिष्ट-अ मध्ये जोडल्याप्रमाणे शाळांचे निरीक्षण करावयाचे आहे व अहवाल सादर करावयाचे आहेत.. 

अभियानाची कार्यदिशा :

१. अभियानादरम्यान पहिल्या २० दिवसात प्रत्यक्ष शाळाभेटी करणे, तद्नंतरच्या ०६ दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा/ उपायोजना करणे, तदनंतरच्या ०४ दिवसामध्ये अनुपालनाची खात्री करणे.
२. आठवडयातील प्रत्येक सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस कार्यलयीन कामकाज करणे. उर्वरित तीन/चार दिवस शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी यांनी शाळा भेटी करणे. अ.क्र.१ मध्ये नमूद प्रमाणे कार्यवाही करणे.
३. सरल पोर्टलवर केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी/ शिक्षणाधिकारी/प्राचार्य/विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी/निरीक्षण अहवाल लॉगीन मधून दररोज अद्यावत करणे.
वरील मोहिमेसाठी आपल्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपसंचालक यांनी जास्तीत जास्त शाळा तपासल्या जातील अशा प्रकारचे उद्दीष्ट ठरवून द्यावे. संबंधितांनी वरील मुद्दयांवर प्रभावी निरीक्षण करुन बिनचूक माहिती संकलित करावी. त्यांचे लगतचे पर्यवेक्षीय अधिकारी यांनी स्वतःचे उद्दीष्टांव्यतिरिक्त त्यांचे अधिनस्त कर्मचा-यांनी केलेल्या निरीक्षण शाळांची आवश्यकतेनुसार पडताळणी करावी. यामध्ये विद्याथ्यर्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना योग्य प्रकारे पोहचत आहे काय याची खातरजमा होणे आवश्यक आहे.

भाग दोन:-

पालक, विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन तसेच विविध मा. लोकप्रतिनिधी यांच्याकडून आपल्या विभागातील शासकीय कार्यालयांकडे निवेदने/अर्ज प्राप्त होत असतात. अशा अर्जावर / निवेदनांवर वेळेत कार्यवाही होण्यास्तव विभागाने २५० पेक्षा जास्त सेधा "लोकसेवा हमी कायद्यांतर्गत घोषित केलेल्या आहेत. तसेच या व्यतिरिक्त ब-याच सेवा विभागामार्फत सर्वच स्तरावर देण्यात येतात. या सर्व सेवा लाभार्थ्यांना विहीत वेळेत मिळाव्यात असे अपेक्षीत आहे.या करीता दिनांक ०१.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४ या दरम्यान कार्यालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात यावा. यासाठी सर्वसाधारण आवक नोंदवही तसेच संबंधित कार्यासनाच्या कार्यविवरण पंजी (वर्कशीट) नोंदीचा संदर्भ घेण्यात यावा. त्यावर निर्णय घेण्याची कार्यवाही करून याबाबतच्या नोंदी परिशिष्ट-व मध्ये ठेवण्यात याव्यात. वेळोवेळी नजीकच्या संनियंत्रण अधिकारी यांनी सदर नोंदी काळजीपूर्वक तपासाव्यात व तसे साक्षांकन करावे.

वरील दोन मोहिमा विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने सर्व संबंधितांनी गांभीर्यपूर्वक या अभियानात सक्रीय सहभाग घेउन यशस्वीरीत्या सोबत जोडलेल्या दोन्ही परिशिष्टामधील माहिती उपसंचालक व संचालक यांनी नियमित संकलित करावी. याबाबत सप्टेंचर महिन्याच्या पहिल्या आठवडयात मा. मंत्री महोदय (शालेय शिक्षण), मा. प्रधान सचिव (शालेय शिक्षण) व आयुक्त (शालेय शिक्षण) क्षेत्रीय स्तरावर विभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. वरील दोन्ही बाबींची फलनिष्पत्ती तपासणार आहेत, याची नोंद घ्यावी.



(सूरज मांढरे, भा.प्र.)
आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत,पुणे 
जा.क्र./ आशिका/२०२४/वि. गुणवत्ता/४६४२


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon