विषय :- शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत शाळांमध्ये तिथी भोजन (स्नेहभोजन) उपक्रम राबविण्याबाबत.
संदर्भ : १. मा. सचिव, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे निर्देश दि. ०९.०७.२०२४ ३. मा. आयुक्त (शिक्षण) यांचे निर्देश दि. १६.०७.२०२४.
२. मा. उपसचिव, शालेय शिक्षण विभाग यांचे निर्देश दि. १२.०७.२०१५.
४. प्राथमिक शिक्षण संचालनालयद्वारा आयोजित दि. २३.०७.२०२४ रोजीच्या व्हिसी मधील सूचना व निर्देश
केंद्रशासन निर्देशानुसार संपूर्ण देशभरात दि. २२ ते २८ जुलै, २०२४ या दरम्यान "शिक्षण सप्ताह" या
उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रस्तुत उपक्रमांतर्गत आठवड्यातील प्रत्येक दिवशी एका विशिष्ट उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रस्तुत शिक्षण सप्ताह दरम्यान शनिवार, दि. २७ जुलै, २०२४ रोजी "Eco Clubs for Mission Life / School Nutrition Day आणि रविवार, दि. २८ जुलै, २०२४ रोजी "Community Involvement Day (Including Tithi bhojan, Vidyanjal etc." समुदास सहभाग दिवस (तिमी भोजन, विद्यांजली इ.) इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
वरील प्रमाणे नमूद उपक्रमांतर्गत "समुदास सहभाग दिवस" या दिवशी राज्यातील सर्व माध्यमाच्या व
सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधून तिथी भोजन (स्नेहभोजन) उपक्रम राबविला जाईल याकरीता सर्व शाळांना प्रोत्साहीत करण्यात यावे तसेच सर्व शाळांमधून तिथी भोजन (स्नेहभोजन) उपक्रमाची अंमलबजावणी होईल याकरीता क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत आवश्यक नियोजन करण्यात वाचे.
केंद्रशासनाने निर्धारित केलेनुसार तिथी भोजन (स्नेहभोजन) उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी
करण्याकरीता खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. 1.
गावातील दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था आणि शाळा व्यवस्थापन समिती
सदस्यांना उक्त विशेष दिवशी " तिथी भोजन (स्नेहभोजन) देण्याकरीता आवाहन करण्यात यावे.
सर्व शाळामधून समुदाय सहभाग दिवशी तिथी भोजन (स्नेहमोजन) उपक्रमाचे आयोजन शाळेने करावे.
प्रस्तुत उपक्रमांतर्गत पूर्ण जेवण, मिठाई किंवा पूरक पोषक आहार (उदा. मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ते, मनुका, आक्रोड, बेदाणे, फळे, शिजविलेले पदार्थ, मिष्टांन इत्यादीचा समावेश असलेले अन्न / आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावा.
• तिथी भोजन (स्नेहमोजन)" उपक्रमांतर्गत भोजनात कोणत्या पदार्थाचा समावेश करावा याबाबत संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने व देणाऱ्या व्यक्तीनी परस्पर सहमतीने एकत्रित निर्णय घ्यावा.
खाद्य पदार्थ ताजे व पौष्टिक असावे, तांदूळ गहू/नाचणी, शेवगा शेंग/डाळी सोबत हिरव्या पालेभाज्या प्राधान्याने दिल्या जाव्यात. बाजारातील वैष्टनबच्द पदार्थ (जंक फूक) तसेच उघडयावरील आणि शिळे अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नयेत, यासोबतच जंक फूडच्या हानिकारक प्रभावांबद्दल विद्यार्थी आणि पालक तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी.
विद्यार्थी हे देखील त्यांच्या दैनंदिन जीवनात अन्न पदार्थाची नासाडी कमी करून, ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जन कमी करण्याकरीता त्यांचे बहुमूल्य योगदान देऊ शकतात याची जाणीव सर्व विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी. खाद्य पदार्थाचे विद्यार्थ्यांना वितरण करताना वितरकाने शाळेत उपस्थित रहावे, तसेच खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्येच व दुपारच्या सुट्टीत तथा शालेय वेळेतच देण्यात यावेत. vi) सदर भोजनातून अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता संबंधित वितरक आणि शाळेने घेणे
आवश्यक आहे. आहाराचे वितरणाकरीता आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. समुदास सहभाग दिवस (तिथी भोजन, विद्यांजली इ.) उपक्रम राबविण्याकरीता संदर्भ ४ अन्वये दि २३.०७.२०२४ रोजीच्या व्हि. सी. गाये देण्यात आलेल्या सर्व सूचना व निर्देशांचे पालन करुन
चक्त उपक्रम अधिकाधिक शाळांमध्ये यशस्वीपणे राबविला जाईल याकरीता आवश्यक नियोजन आपले स्तरावरुन करण्यात यावे.
उक्त निर्देशाप्रमाणे दि.२८ जुलै, २०२४ रोजी 'Community Involvement Day (Including Tithi bhojan, Vidyanjali etc." समुदास सहभाग दिवस तिथी भोजन, विद्यांजली इ.) मोठ्या प्रमाणात साजरा
करण्यात येईल तरोच राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमाबाबतची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद,
मुंबई यांनी उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर विहित वेळेत अद्यावत करणेत यावी.
प्रत माहितीसाठी सबिनय सादर मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा
सदरचे परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
⏬⏬⏬⏬⏬
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
विभाग, मंत्रालय, मुंबई
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे
जा.क्र. प्राशिसं/पीएम पोषण/स्नेहभोजन/२०२४/०५०५८
प्रति,
१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका
ई-मेल:-mamdep@gmall.com
दि. २४.००७.२०२४.
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सर्व
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon