DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Free Education Scheme for girls GR

Free Education Scheme for girls GR

Implementation of Free Education Scheme for girls Pursuing Higher Education

Implementation of Free Education Scheme for girls Pursuing Higher Education

दिनांक : १९.०७.२०२४

परिपत्रक

विषय : उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत 
Implementation of Free Education Scheme for girls Pursuing Higher Education
संदर्भ : 
१. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. शिष्यवृ. २०२४/ प्र.क्र. १०५/ तांशि-४ दि. ०८.०७.२०२४.
२. मा. शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे परिपत्रक क्र. उशिस/शिष्य- २०२४-२५/मुमोशि/३८५३ 
दि. १९.०७.२०२४.

    उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, शासन निर्णय दि. ७.१०.२०१७ नुसार राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये/ तंत्र निकेतने / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. ८.०० लक्ष किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुला-मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या १०० टक्के लाभ देण्यात येतो. 
    
    तसेच संदर्भाधित शासन निर्णयान्वये, व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process- CAP) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. रु. ८.०० लक्ष किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील नविन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेश असलेल्या (अर्जाचे नुतनीकरण केलेल्या) मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून वर्ष २०२४-२५ पासून शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या १०० टक्के लाभ देण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण या योजनेची अंमलबजावणी करणेकरीता महाविद्यालयांना पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

१. मुलींना मोफत शिक्षण या योजनेची माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर ठळकपणे प्रसिध्द करावी.

२. महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेच्या प्रमुखाने प्रवेशावेळी सर्व पात्र मुलींना सदरहू योजनेची सविस्तर माहिती तसेच शिष्यवृत्तीची पूर्वतयारी करणेकरीता आवश्यक कागदपत्रांची माहिती द्यावी.

३. सदरहू योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणेकरीता महाविद्यालयामधील जाणकार अध्यापकांची स्कॉलरशिप नोडल ऑफिसर (Scholarship Nodal Officer) म्हणून नेमणूक करण्यात यावी.

४. महाविद्यालयाच्या स्तरावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांबाबत माहिती होणेकरीता तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणेकरीता स्कॉलरशिप नोडल ऑफिसर (Scholarship Nodal Officer) यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र शिष्यवृत्ती कक्ष निर्माण करण्यात यावा.

५. मुलींना मोफत शिक्षण या योजनेबाबतची सविस्तर माहितीचा फलक महाविद्यालयाच्या दर्शनी भागात लावावा. सदरहू फलक हा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच विद्यार्थ्यांच्या दृष्टीक्षेपात ठळकपणे येईल अशा स्वरुपात लावण्यात यावा.

६. शिष्यवृत्ती योजनांचे आवेदन पत्रे सादर करणेबाबत प्रात्यक्षिक प्रशिक्षण (Hands on Training) महाविद्यालयाच्या स्तरावर आयोजित करावे.

७. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणेकरीता महाविद्यालयातील स्कॉलरशिप नोडल ऑफिसर (Scholarship Nodal Officer) यांचा संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावावा.
वर नमूद केल्यानुसार मुलींना मोफत शिक्षण या योजनेच्या अंमलबजावणीबाबत दिलेल्या निर्देशानुसार महाविद्यालय, संस्था, विद्यापीठ मधील स्कॉलरशिप नोडल ऑफिसर (Scholarship Nodal Officer) यांची नाव, पदनाम व संपर्क क्रमांक याबाबतची माहिती या कार्यालयास पत्राद्वारे समक्ष आणि ईमेलद्वारे jdpunescholarship@gmail.com या ईमेल आयडीवर तात्काळ सादर करावी. तसचे मुलींना मोफत शिक्षण या योजनेच्या अंमलबजावणीबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास अहवाल सादर करावा. तसेच कोणतीही पात्र विद्यार्थीनी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची सर्व महाविद्यालय, संस्था, विद्यापीठ यांनी दक्षता घ्यावी.


(डॉ. केशव तुपे)
सहसंचालक, 
उच्च शिक्षण, पुणे विभाग, 
पुणे

महाराष्ट्र शासन शिक्षण सहसंचालक, उच्च शिक्षण १७, डॉ. आंबेडकर रोड, पुणे विभाग, पुणे
जा.क्र. महाडीबीटी-२०२४-२५/मुलींनामोफतशिक्षण/शिष्यवृत्ती शाखा / ६३७६


उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजना प्रश्नोत्तरे

Free Education Scheme Questions and Answers for Girls Pursuing Higher Education


१ राज्य शासनाने उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी चे शिक्षण मोफत केले हे खरे आहे काय ?

उत्तर - होय, हे खरे आहे.

शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ व त्यापूर्वी ज्या विद्यार्थीनीनी प्रवेश घेतलेला आहे व सध्या विविध शैक्षणिक सत्रात शिकत आहेत अशा महाराष्ट्रातील अधिवास धारक व वादग्रस्त महाराष्ट्र कर्नाटक सीमा क्षेत्रातील ज्या विद्यार्थीनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करतील अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ पासून पुढे लागू राहील. पालकांचे रु. ८.०० लक्ष किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या मुलींच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी चे शिक्षण मोफत केले आहे.

२ या योजनेसाठी अर्ज कोठे करावा ?
उत्तर -  सदर योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे  LINK  या संकेतस्थळावरुन विहित मुदतीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यात यावा. 

३ मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेत कोणत्या शुल्काचा समावेश आहे ?
उत्तर -  प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमांचे वार्षिक शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क (Tuition Fee व Exam Fee) या शुल्काचा समावेश आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शुल्क नियामक प्राधिकरण व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सक्षम प्राधिकरणाने निश्चित केलेले १०० टक्के मर्यादेपर्यंतचे शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती स्वरुपात देण्यात येईल. सदरचे शुल्क हे शासन मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांकरीता संबंधित विद्यापीठ, तंत्रशिक्षण मंडळ, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इत्यादी कडून आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क व शासन मान्यता प्राप्त बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे १०० टक्के मर्यादेपर्यंत परीक्षा शुल्क शिष्यवृत्ती स्वरुपात पात्र विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात येईल.

४) अर्ज भरावयाची अंतिम मुदत कोणती ?

उत्तर - याबाबत वेळोवेळी स्वतंत्रपणे महाविद्यालयांना निर्देश देण्यात येतात. तसेच अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रक महाडीबीटी पोर्टलवर प्रसिध्द करण्यात येते. लिंक

५) या योजनेच्या लाभासाठी अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

उत्तर -

१. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्याचा पुरावा.

२. अधिवास प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाने दिलेले

३. उत्पन्न प्रमाणपत्र कुटूंबातील दोन्ही पालकांचे मागील वर्षाचे एकत्रित उत्पन्न प्रमाणपत्र. सदर प्रमाणपत्र हे किमान संबंधित तहसिलदार अथवा सक्षम प्राधिकारी यांचे असावे.

४. लहान कुटुंबाचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.

५. अभ्यासक्रमात खंड असल्यास खंड प्रमाणपत्र

६. नवीन अर्ज करतांना १० वी / १२ वी ची गुणपत्रिका आवश्यक तसेच नूतनीकरणे करीता मागील वर्षाची गुणपत्रिका आवश्यक आहे.

६ ही कागदपत्रे कोठे उपलब्ध होतील ?

उत्तर - अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्न प्रमाणपत्र आपले सरकार पोर्टलद्वारे संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज केल्यास उपलब्ध होतील. (https://aaplesarkar.mahaonline.gov.in)

७ ही योजना शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ पासून लागू केली असल्याने या आधी प्रवेश घेतलेल्या व अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या पदवी अभ्यासक्रमातील मुलींना ही योजना लागू आहे का ?

उत्तर -

शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ व त्यापूर्वी ज्या विद्यार्थीनी प्रवेश घेतलेला आहे व सध्या विविध शैक्षणिक सत्रात शिकत आहेत अशा महाराष्ट्रातील अधिवास धारक व वादग्रस्त महाराष्ट्र कर्नाटक सीमा क्षेत्रातील ज्या विद्यार्थीनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करतील अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पुढे लागू राहील.

८ माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेल्या / उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेल्या मुलींनी पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असल्यास पदविका अभ्यासक्रमासाठी सदर योजना लागू आहे का ?
उत्तर - होय.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय दि. ७.१०.२०१७ मध्ये नमुद असलेल्या पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांना सदर योजना लागू आहे.

९ प्रवेश घेताना मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क महाविद्यालयास भरावे लागणार आहेत का ?
उत्तर -
१. शिक्षण शुल्क प्रवेश घेताना मुलींना शिक्षण शुल्क महाविद्यालयास भरावे लागणार नाही. सदर योजनेतंर्गत मुलींना अनुज्ञेय असणाऱ्या शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीची रक्कम ही संबंधित मुलींकडून प्रवेशाच्या वेळी आगाऊ स्वरुपात घेण्यात येऊ नये व विद्यार्थ्यांनीची पिळवणुक होणार नाही याची योग्य ती खात्री शैक्षणिक संस्था करेल याबाबत विभागामार्फत निर्देश देण्यात येत आहेत.
२. परीक्षा शुल्क पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणारी परीक्षा शुल्क लाभाची रक्कम ही थेट स्वरुपात लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात संबंधित प्रशासकीय विभागाकडून वितरीत होणार असल्याने सदरचे शुल्क महाविद्यालयास भरणे आवश्यक आहे. योजनेसाठी आवेदनपत्र सादर केलेल्या व अटी व शर्तीची पूर्तता होत असलेल्या विद्यार्थीनीस या शुल्काची प्रतिपुर्ती करण्यात येईल.

१० शैक्षणिक वर्ष जून पासून सुरु झाले असल्याने यापूर्वी प्रवेश घेतलेल्या मुलींनी महाविद्यालयाकडे भरलेले शिक्षण शुल्क मुलींना परत मिळणार का ?
उत्तर - होय. सदर योजना शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ व त्यापूर्वी ज्या विद्यार्थीनीनी प्रवेश घेतलेला आहे व सध्या विविध शैक्षणिक सत्रात शिकत आहेत अशा विद्यार्थीनीसाठी लागू असल्याने सन २०२४-२५ साठी प्रवेश घेतलेल्या मुलींच्या महाविद्यालयाकडे भरलेल्या शिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती करण्यात येईल.

११ याकरीता शिक्षण शुल्क भरलेले असेल तर अर्ज करतेवेळी भरण्यात आलेले शिक्षण शुल्क नमूद करण्यात यावे.
उत्तर - सदर योजना कायम विनाअनुदानित महाविद्यालयामधील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना लागू आहे का ?
उत्तर - होय.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय दि. ७.१०.२०१७ मध्ये नमुद असलेल्या पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांना सदर योजना लागू आहे.

१२ या योजनेचा लाभ कुटूंबातील किती मुलींना लागू आहे ?
उत्तर - या योजनेचा लाभ कुटूंबातील केवळ दोन अपत्यांपुरता मर्यादित आहे 

१३ दुरस्थ अथवा अर्धवेळ स्वरुपात चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल ?

उत्तर - नाही.

सदर योजना पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी मागील सत्रातील किमान ५० टक्के उपस्थितीची अट पूर्ण करणाऱ्या मुलींना लागू आहे.

१४ या योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे का ?

उत्तर - होय.

महाराष्ट्र आधार (वित्तीय व इतर सहाय्य, लाभ आणि सेवा यांचे लक्ष्यित वितरण) अधिनियम २०१६ अन्वये दिनांक १३.०४.२०१७ रोजी राजपत्रात प्रसिध्द केलेली अधिसूचना (असाधारण क्रमांक ८७) व दि. १५.०४.२०१७ मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन अर्जासोबत पात्र इच्छुक अर्जदारांनी त्यांचा आधार क्रमांक देणे आवश्यक आहे. तसेच ज्या बँक खात्यात पात्र लाभार्थ्यांना रक्कम प्रापत करुन घ्यावयाची आहे असे खाते ऑनलाईन अर्जासोबत दिलेल्या आधारक्रमांकाशी संलग्न असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

१५ सदर योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे ?

उत्तर - सदर योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EBC/ EWS), इतर मागास प्रवर्गातील (OBC), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) या प्रवर्गातील पात्र मुलींना लागू आहे.

१६ ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींबाबत कोणाशी संपर्क करावा ?

१. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य / नोडल अधिकारी.

२. संबंधित विभागीय सहसंचालक कार्यालयातील शिष्यवृत्तीचे काम पाहणारे नोडल अधिकारी / कर्मचारी.

३. MahaIT च्या महाडीबीटी पोर्टलवरील "Grievance Section" मध्ये अडचणींची नोंद करावी.

१७ योजनेबाबतची सखोल माहिती / मार्गदर्शक तत्वे कोठे पाहावयास मिळतील ?

उत्तर - महाडीबीटी पोर्टलवर योजनेची संपूर्ण माहिती नमूद आहे.

उच्च शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ  लिंक वर टिचकी मारा   तंत्र शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ लिंक वर टिचकी मारा  तसेच कला संचालनालयाचे https://doa.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सुध्दा योजनेची संपूर्ण माहिती नमूद आहे.

१८ विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करते वेळी पूर्वतयारी म्हणून कोणत्या बाबी आवश्यक आहेत ?

उत्तर -

१. आधार संलग्नित बँक खाते

२. महाविद्यालयांची प्रवेश पावती (Scanned Copy)

३. अधिवास प्रमाणपत्र.

४. उत्पन्न दाखला.

१९ अर्जाची पडताळणी कशा प्रकारे केली जाते ?

उत्तर -

अर्जदाराने महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन भरलेल्या अर्जाची छाननी खालील ३ स्तरावर करण्यात येते.

१. महाविद्यालय

२. विभागस्तर

३. संचालनालय (राज्यस्तर)

२०अर्ज भरतेवेळी काही त्रुटी / चुकीचा भरला गेल्यास अर्ज जमा केल्यानंतर अर्जाची दुरुस्ती कशी करता येते का ?

उत्तर - होय.

ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्यात दुरुस्ती करावयाची झाल्यास संबंधित महाविद्यालयाशी संपर्क करुन आवेदनपत्र कोणत्या स्तरावर आहे याबाबत पाहणी करुन दुरुस्तीस संधी देण्यात येते. तथापि राज्यस्तरावरुन अर्ज नामंजूर होण्यापूर्वी विहित मुदतीत सदर बदल करण्याची सुविधा आहे.

२१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली किंवा कसे याबाबतची माहिती कशी समजू शकेल ?

उत्तर - आवेदनपत्र सादर करतेवेळी विद्यार्थ्यास शिष्यवृत्तीचा User Id व Password उपलब्ध होतो, याआधारे शिष्यवृत्ती अर्जावर होत असलेली कार्यवाही विद्यार्थ्यास ऑनलाईन दिसून येते.

२२ मंजूर शिष्यवृत्ती किती टप्यात बँक खात्यात जमा केली जाते ?

उत्तर - मंजूर शिष्यवृत्ती सत्र निहाय दोन टप्प्यात बँक खात्यात जमा केली जाते.

२३ या योजने अंतर्गत लाभ प्राप्त करण्याकरिता केवळ CAP मार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशीत विअद्यार्थीनी पात्र आहेत काय ?

उत्तर - होय.

व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता दरवर्षी शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (Centralized Admission Process CAP) मार्फतच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थीनींकरिता ही योजना लागू आहे.

२४ इतर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेले विद्यार्थीनी सदरहू योजनेचा लाभ घेऊ शकतात का ?

उत्तर - नाही.

शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांपैकी केवळ कोणत्याही एकाच योजनेंतर्गत लाभ मिळण्यास संबंधित विद्यार्थीनी पात्र असेल.

२५ सदरहू योजना कोणास लागू नाही.

उत्तर - खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठे यामध्ये प्रवेशित विद्यार्थीनी तसेच व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश घेणाऱ्या मुलींना सदरहू योजना लागू नाही.

प्रति,
१. प्राचार्य, सर्व अशासकीय अनुदानित / विना अनुदानित कायम विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालये, पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्हा तसेच केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली.
२. कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
३. कुलसचिव, डेक्कन महाविद्यालय व पदव्युत्तर संस्था, पुणे.
४. कुलसचिव, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे.
५. कुलसचिव, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, पुणे.
६. कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.
७. कुलसचिव, श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.
८. कुलसचिव, कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक.
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon