DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Sudharit Vetanshreni Vetanstar Nichiti GR

Sudharit Vetanshreni Vetanstar Nichiti

https://www.dnyanyatritantrasnehi.com/2024/06/sudharit-vetanshreni-vetanstar-nichiti.html

राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या शिफारशीनुसार शासनाच्या मान्यतेने वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गाची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे / सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत.

As per the recommendation of the State Pay Revision Committee 2017 with the approval of the Government regarding the retention of the pay scale of the original post / fixing the pay in the revised pay scale

महाराष्ट्र शासन 
वित्त विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: वेपुर ११२१/प्र.क्र.५/सेवा-९ मंत्रालय, मुंबई

दिनांक - १२ जून, २०२४

वाचा :- 
१) शासन निर्णय क्रमांक: वेपुर ११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दिनांक १३ फेब्रुवारी, २०२३
२) शासन परिपत्रक क्रमांक: वेपुर-११२३/प्र.क्र.५/सेवा-९, दिनांक २२ फेब्रुवारी, २०२४

शुध्दीपत्रक :-
वाचा येथील क्र.२ येथील दिनांक २२ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या परिपत्रकातील क्र.२ च्या पृष्ठावर तिसऱ्या ओळीत "१.१.२०१६ रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर " या वाक्याऐवजी " १.१.२०१६ रोजी व तद्नंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर " असे वाक्य वाचण्यात यावे.

क्र.२ च्या पृष्ठावर पाचव्या ओळीत दि.१.१.२०१६ रोजी च्या पुढे " किंवा तद्नंतर " या शब्दांचा समावेश करण्यात यावा.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०६१२१६१४५७७८०५ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(वि. अ. धोत्रे) 
उप सचिव, महाराष्ट्र शासन



(शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक वेपूर- ११२३/प्र.क्र.५/सेवा-९, दिनांक २२.२.२०२४ चे सहपत्र


(पहा म.ना.से. (वेतन) नियम १९८१ मधील नियम १५)


(शासन निर्णय दिनांक १३ फेब्रुवारी, २०२३ नुसार पूर्वीच्या वेतनस्तरात निश्चित होणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतन निश्चित झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी)
विकल्पाचा नमुना


१) कर्मचाऱ्याचे नाव 

२) धारण केलेले पद :

३) शासन अधिसूचना दिनांक ३० जानेवारी, २०१९ नुसार मंजूर केलेला वेतनस्तर **.

४) शासन निर्णय, दिनांक १३ फेब्रुवारी, २०२३ नुसार सुधारित केलेला वेतनस्तर

५) कार्यालयाचे नाव....


२. मी श्री./श्रीमती/कुमारी असा विकल्प देत आहे की, माझी दिनांक १.१.२०१६ रोजी शासन अधिसूचना दिनांक ३० जानेवारी, २०१९ नुसार माझ्या ...या पदास लागू केलेल्या वेतनस्तरात्/आश्वासित प्रगती योजनेंतर्गत देय होणाऱ्या पहिल्या / दुसऱ्या/तिसऱ्या लाभानुसार लागू होणाऱ्या वेतनस्तरात दिनांक १.१.२०१६ रोजी वेतननिश्चिती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत वित्त विभाग, शासन निर्णय क्र. वेपूर ११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दिनांक १३ फेब्रुवारी, २०२३ अन्वये सदर पदास खंड २ नुसार वेतनस्तर लागू केला आहे. त्यानुसार सुधारित वेतनस्तरात माझी दिनांक १.१.२०१६ रोजी शासन अधिसूचना दिनांक ३० जानेवारी, २०१९ नुसार वेतननिश्चिती केल्यास व तद्नंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजनेंतर्गत देय होणाऱ्या पहिल्या / दुसऱ्या तिसऱ्या लाभानुसार वेतननिश्चिती केल्यास माझ्या पूर्वीच्या वेतनस्तरात निश्चित होणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतन निश्चित होत आहे. तरी मी वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक वेपूर-११२३/प्र.क्र.५/सेवा-९ दिनांक २२.२.२०२४ अन्वये दिलेल्या सुविधेनुसार पुढीलप्रमाणे विकल्प देत आहे.

हे ही वाचा - 

राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या अहवाल खंड-२ मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतनस्तरविषयक वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण.


१) मी दिनांक १.१.२०१६ पासून शासन अधिसूचना दिनांक ३० जानेवारी, २०१९ नुसार लागू झालेल्या वेतनस्तराची निवड करतो/करते.
    • माझ्या पुढील वेतनवाढीच्या दिनांकापर्यंत....
    • माझे वेतन रु.. . पर्यंत वाढवणाऱ्या नंतरच्या वेतनवाढीच्या दिनांकापर्यंत
    • मी पद रिक्त करेपर्यंत किंवा विद्यमान वेतनस्तरात वेतन घेण्याचे बंद करेपर्यंत.
हा विकल्प अंतिम असून, त्यामध्ये या दिनांकानंतर सुधारणा करण्यात येणार नाही.

ठिकाण :
दिनांक :

सही :
नाव :


(केवळ कार्यालयाने भरावयाचे)

प्रमाणित करण्यात येते की, कायम / स्थानापन्न पद धारण करीत असलेल्या

 श्री / श्रीमती / कुमारी यांनी हा विकल्प, यथोचितरित्या
स्वाक्षरीसह व विहित दिनांकापूर्वी मला सादर केला आहे.

सही :

ठिकाण :

दिनांक :

  लागू नसेल ते खोडावे

* * वेतन स्तर क्रमांक नमूद करावा.

नाव :
कार्यालय प्रमुख :

सदर परिपत्रक पीडीएफमध्ये हवे असल्यास या ओळीला स्पर्श करा

हे ही वाचा

राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या अहवाल खंड-२ मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतनस्तरविषयक वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण.


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon