DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Cashless Arogya Yojana For Teachers GR


Cashless Arogya Yojana to be implemented from June 2024 for teachers and non-teaching staff of private aided schools

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय (विस्तार), दालन क्र.४३६, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दूरध्वनी - ०२२-२२७९३१६९

क्रमांक : संकीर्ण-२०२४/(प्र.क्र. १/२४)/टीएनटी-५

ईमेल -tnt5.sesd-mh@gov.in

दिनांक : ११ जून, २०२४

प्रति,

१) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे

२) संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

३) संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

विषय - राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जून २०२४ पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत.

Cashless Arogya Yojana to be implemented from June 2024 for teachers and non-teaching staff of private aided schools

संदर्भ:- १) बैठक-२०२२/प्र.क्र.२१/२२/टिएनटी-५

२) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे निवेदन दि.३०.५.२०२४ चे पत्र.

महोदय,

उपरोक्त विषयासंदर्भात अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे निवेदन प्राप्त झालेले आहे. निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे.

सदर निवेदनानुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त १००% अनुदानित व अंशतः अनुदानित / प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक / तांत्रिक / अध्यापक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विभागनिहाय, जिल्हानिहाय व वर्गवारीनिहाय संख्या व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय प्रतिपूर्तीकरिता होणाऱ्या खर्चाची मागील पाच वर्षाची वर्षनिहाय माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्रात कृपया आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह तात्काळ सादर करावी, ही विनंती.

दिनांकः 11/6/2024

आपली,

(डॉ. स्मिता देसाई) 
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासनPrevious
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon