Direct Recruitment of Players in Government Service
Direct Recruitment of Players in Government Service
Direct recruitment of top quality athletes in government service
अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबतचे धोरण शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि.०९/१२/२०१० अन्वये विहित केले असून याबाबत शासन निर्णय दि.२१/०५/२०११, दि.१०/०४/२०१३ व दि.०१/१०/२०१५ अन्वये सुधारित आदेश दिले आहेत. खेळाडूंना थेट नियुक्तीसंदर्भातील प्रस्तावावर शिफारशीसाठी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. सदर समितीने, खेळाडूंच्या थेट नियुक्तीसंदर्भात सुधारित धोरण सादर करण्याचे निदेश दि.२९/११/२०१८ च्या बैठकीत दिले. याअनुषंगाने अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबत खालीलप्रमाणे सुधारीत धोरण प्रस्तावित करण्यात येत आहे -
(१) थेट नियुक्तीसाठी प्रस्तावित पदे -
थेट नियुक्तीसाठी पात्र खेळाडूंची संख्या जास्त आहे. तेवढया संख्येने पदे रिक्त नसल्याने, विविध प्रशासकीय विभागातील पदांवर तसेच क्रीडा विभागातील पदांवर नियुक्ती देणे शक्य होणार नाही. तसेच विविध विभागातील पदांवर नियुक्तीनंतर, त्या पदाच्या विभागीय परीक्षा उत्तीर्ण करणे, परिविक्षा कालावधी पूर्ण करणे इ. ची पूर्तता करावी लागते, अन्यथा विविध प्रशासकीय बाबी उद्भवतात. त्याचप्रमाणे त्या कर्तव्ये पार पाडताना, खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रीत करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या खेळातील कामगिरीवर प्रतिकूल परीणाम होतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन, क्रीडा विभागाच्या आस्थापनेवर, केवळ खेळाडूंसाठी गटनिहाय खालीलप्रमाणे पदे निर्माण करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे :-
संपूर्ण शासन निर्णय व शासन परिपत्रके वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी 👉 फक्त या ओळीला स्पर्श करा
अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबत... 👉 अधिक जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon