DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Shalapurv Tayari Abhiyan 2024 - 25



Shala purv tayari abhiyan 2024-2025 circular 
ज्ञानसेवा तु सावल्यम्

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. महाराष्ट 708, सदाशिवपेठ, कुमठेकरमार्ग, पुणे - 411030

020-24476938

balshikshandept@maa.ac.in

जा.क्र. राशैसंप्रपम/बालशिक्षण/SRP/२०२४/०१९५८

दि. ०५/०४/२०२४

प्रति,

१. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई.

२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).

३. शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, सर्व.

४. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, ICDS विभाग, जिल्हा परिषद, (सर्व)

५. प्रशासन अधिकारी, म.न.पा. सर्व.

विषयः- शाळापूर्व तयारी अभियान २०२४-२५ ची यशस्वी अंमलबजावणी करणेबाबत. 

Shala Purva taiyari Abhiyan yashasvi Amal bajani karne

संदर्भ : १. STARS २०२४-२५ PAB मान्यतेचे पत्र 

दि. ३१ मार्च २०२४.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये मागील वर्षी एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीत इयत्ता पहिलीला

दखलपात्र बालकांसाठी "शाळापूर्व तयारी अभियान" अंतर्गत "पहिले पाऊल" हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात

राबविण्यात आला आहे. त्यानुसार संदर्भ १ नुसार STARS २०२४-२५ नुसार या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी "शाळापूर्व तयारी अभियानाची" अंमलबजावणी करण्यात येत आहे. शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ माहे एप्रिल २०२४ आणि मेळावा क्र. २ माहे जून २०२४ मध्ये आयोजित करण्यात यावे. दोन्ही मेळाव्यादरम्यान १ ते ८ आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालकांकडून करून घ्यावी. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक मदत करावी.




अ. क्र.

उपक्रम तपशील

सहभागी

आयोजन जबाबदारी

कालावधी

राज्यस्तरीय प्रशिक्षण

DIET, महानगरपालिका, महिला व बालविकास विभाग प्रतिनिधी, प्रथम संस्था (प्रत्येकी १ व्यक्ती) + प्राचार्य, DIET, शिक्षणाधिकारी (प्राथ.), DPO = एकूण ७ व्यक्ती

१ दिवस (ऑनलाईन) दि. ८ एप्रिल २०२४

SCERTM पुणे

जिल्हास्तरीय कार्यशाळा

प्रत्येक तालुक्यातून (BRC, URC) पुढील पैकी दोन व्यक्ती (शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विषय साधन व्यक्ती)

१ दिवस (प्रत्यक्ष) १०/०४/२०२४

DIET

तालुकास्तरीय कार्यशाळा

प्रत्येक केंद्रातून पुढील पैकी दोन व्यक्ती (केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, शिक्षक)

१ दिवस (प्रत्यक्ष) १२/०४/२०२४

DIET +BEO+CDPO

केंद्रस्तरीय प्रशिक्षण

शिक्षक, अंगणवाडी सेविका, लीडर माता, स्वयंसेवक

१ दिवस (प्रत्यक्ष शिक्षण परिषदेत) १३/०४/२०२४

केंद्रप्रमुख

शाळास्तर मेळावा क्र. १

मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक, लीडर माता, माता, स्वयंसेवक

१ दिवस (प्रत्यक्ष) दि. १५ ते २० एपिल २०२४ यापैकी कोणताही एक दिवस)

मुख्याध्यापक, शिक्षक

शाळापूर्व तयारीच्या कृती/उपक्रम

माहे एप्रिल ते जून २०२४ दरम्यान इयत्ता पहिलीत दखलपात्र बालके, पालक, लीडर माता, माता, स्वयंसेवक

आठ ते बारा आठवडे

मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका

शाळास्तर मेळावा क्र. २

मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक, लीडर माता, माता, स्वयंसेवक

 

१ दिवस (प्रत्यक्ष) उर्वरित महाराष्ट्र- दि. १५ ते २० जून २०२४. विदर्भ - दि. २८ ते ०३ जुलै २०२४.

मुख्याध्यापक, शिक्षक


क) प्रशिक्षण आयोजनाच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
१. राज्यस्तर प्रशिक्षण : राज्यस्तर एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दिलेल्या नियोजन / वेळापत्रकानुसार करणे. जिल्हस्तरावरून सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नावे  LINK   Training गुगल लिंक द्वारे मागविणे. सदर प्रशिक्षण सकाळी १० ते २ या कालावधीत झूमच्या माध्यमातून ऑनलाईन घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणाची लिंक स्वतंत्रपणे whatsapp गटावर शेअर करण्यात येईल.


२. जिल्हा स्तर प्रशिक्षण: प्राचार्य, DIET यांनी जिल्हास्तर एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दिलेल्या नियोजन / वेळापत्रकानुसार करावे. जिल्हास्तरावरील प्रशिक्षणासाठी एक दिवसीय कार्यशाळेसाठी प्रति प्रशिक्षणार्थी १०००/- रुपये यामर्यादेत जेवण, चहा, कार्यशाळेसाठी बॅनर व पोस्टर, कार्यशाळेसाठी लागणारी स्टेशनरी,

प्रवास भत्ता व सुलभक मानधन यासाठी खर्च करण्यात यावा. ३. तालुकास्तरीय प्रशिक्षण तालुकास्तर प्रशिक्षणाचे आयोजन वेळापत्रकाप्रमाणे प्राचार्य, DIET यांनी सबंधित गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयाने करावे. जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती हे तालुकास्तरावर तज्ञ मार्गदर्शक / सुलभक म्हणून काम करावे. तालुकास्तरावरील प्रशिक्षणासाठी एक


WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now


दिवसीय कार्यशाळेसाठी प्रति प्रशिक्षणार्थी ३००/- रुपये यामर्यादेत जेवण, चहा, कार्यशाळेसाठी बॅनर व पोस्टर,

कार्यशाळेसाठी लागणारी स्टेशनरी, प्रवास भत्ता व सुलभक मानधन यासाठी खर्च करण्यात यावा.

४. केंद्र स्तरीय प्रशिक्षण दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषेदेचे आयोजन नियोजित तारखेस करण्यात यावे. तालुकास्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती यांनी केंद्रस्तरीय प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक / सुलभक म्हणून काम करावे. केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेसाठी एकूण १५००/- रुपये यामर्यादेत चहा, कार्यशाळेसाठी बॅनर, कार्यशाळेसाठी लागणारी स्टेशनरी यासाठी खर्च करण्यात यावा.

ड) उपरोक्त कार्यवाही करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी. :

१. उपरोक्त सर्व स्तरावरील प्रशिक्षण घेताना प्रशिक्षण उपस्थिती, प्रशिक्षण अभिलेखे, छायाचित्रे, चित्रफिती आपल्या स्तरावर जतन करून ठेवाव्यात.

२. संदर्भ क्र. १ अन्वये STARS २०२४-२५ अंतर्गत मंजूर निधी मा. राज्य प्रकल्प संचालक, MPSP, मुंबई यांचेकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावरील एक दिवसीय प्रशिक्षणासाठी आर्थिक निकषांप्रमाणे झालेला प्रत्यक्ष खर्च संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना वर्ग करण्यात येईल.

३. प्रशिक्षणाचे सुस्पष्ट व्हिडीओ (२ किंवा ३ मिनिटांचे), फोटो इ. माहिती समाजसंपर्क माध्यमांवर (फेसबुक, द्वीटर, इन्स्टाग्राम, इ.) #shalapurvtayari२०२४ या HASHTAG (#) चा वापर करून अपलोड करावेत. समाजसंपर्क माध्यमांवर पोस्ट अपलोड करताना स्थळाचे नाव व जिल्हा नमूद करावा.

४. उपरोक्त सर्व प्रशिक्षणे तसेच शाळास्तरावरील पहिल्या व दुसऱ्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती संकलित करण्यासाठी बालशिक्षण विभाग व प्रथम संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या वेबपोर्टलच्या  LINK    वापर करण्यात यावा.

५. जिल्ह्यातील जि.प., म.न.पा., व न.पा.च्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन व आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हा परिषद-शिक्षण विभाग, प्रशासन अधिकारी, म.न.पा. व न.पा. व। CDS विभाग यांच्या समन्वयाने करावे. मेळावे आयोजन करणेबाबतचे नियोजन पर्यवेक्षकीय अधिकारी व शाळांना कळवावे.

६. गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे नियोजन करावे.

७. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तासांचा असावा.

८. शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.

९. मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे, याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावर प्रभातफेरी, दवंडी देवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच यापूर्वी उपलब्ध करून दिलेले पोस्टर्स, बॅनर्स लावून जनजागृती करण्यात यावी व त्यामाध्यमातून इयत्ता पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे.

१०. उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात याव्यात. सदर ७ स्टॉल्स पुढीलप्रमाणे : १) नोंदणी (रजिस्ट्रेशन), २) शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास), ३) बौद्धिक विकास, ४) सामाजिक आणि भावनात्मक विकास, ५) भाषा विकास, ६) गणनपूर्व तयारी, ७) पालकांना मार्गदर्शन.

११. शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने प्राचार्य, डायट, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, ICDS विभाग यांनी समन्वयाने सर्व गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रशासन अधिकारी, म.न.पा. व न.पा. यांची बैठक आयोजित करून आवश्यक सूचना द्याव्यात. तसेच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांना प्राचार्य, DIET यांनी प्रत्यक्ष शाळेवर शाळा पूर्व तयारी मेळाव्याच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करावे. तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय

अधिकारी यांना विविध शाळेत शाळा पूर्व तयारी मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी नियोजन करण्यात यावे. १२. गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे नियोजन करावे. तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना देखील शाळा स्तरावर शाळा पूर्व तयारी मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात यावे.

१३. मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना #Shalapurva TayariAbhiyan२०२४, व #शाळापूर्वतयारीअभियान २०२४ या हॅशटॅगचा (#) उपयोग करावा. तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT, महाराष्ट्रच्या  LINK   या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.

१४. दोन्ही मेळाव्यांमधील दरम्यानच्या कालावधीत इयत्ता पहिलीत दखलपात्र असलेल्या मुलांचे पालक / माता यांनी "शाळेतले पहिले पाऊल" या पुस्तिकेच्या आधारे तसेच मेळावा व साप्ताहिक बैठकीतील मार्गदर्शनानुसार घरी करून घ्याव्यात.

१५. शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे आयोजन सुव्यवस्थित रित्या व्हावे या करिता सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी योग्य सनियंत्रण करावे व मेळाव्यास भेटी द्याव्यात.

१६. सर्व तज्ञ मार्गदर्शक / सुलभक, पर्यवेक्षकीय अधिकारी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांनी पहिल्या मेळावा झाल्यानंतर दुसरा मेळावा होईपर्यंत शाळा परिसरातल्या बालकांच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा व त्याचे निरीक्षण दिलेल्या लिंकमध्ये भरावे.

१७. शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बालकांच्या शाळापूर्व तयारीची जोडणी पुढील शैक्षणिक सत्रात शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षकांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्यक्रमाशी / विद्याप्रवेश मोड्यूलशी करावी.

१८. शाळा पूर्व तयारी अभियानाच्या विविध स्तरावरील अंमलबजावणीस प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी. १९. शाळा पूर्व तयारी अभियान २०२४-२५ पूर्ण झाल्यानंतर उपक्रमाच्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल प्रस्तुत कार्यालयास सादर करण्यात यावा.

 (शरद गोसावी)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर :

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

२. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

३. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे

४. संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र, पुणे

बालशिक्षण विभाग - शाळा पूर्व तयारी अभियान

उपरोक्त परिपत्रक पीडीएफमध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध स्पर्श करा 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon