DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Implementation of e Kuber system

Implementation of e Kuber system

implementation of e-Kuber system Circular 
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट, 
मुंबई-४०० ००१

दूरध्वनी क्र ०२२-२२०१३६१७

क्रमांकः - सेवार्थ २०२३/प्र.क्र.६८/वित्त-५

प्रति, 
मा. संचालक लेखा व कोषागारे, कस्तुरी इमारत, तळमजला, पेट्रोलियम हाऊसजवळ, चर्चगेट, 
मुंबई-४०० ०२०.
Email ID: nilima.shinde@nic.in

दिनांक : ७ मे, २०२४.

विषय :- ई-कुबेर प्रणालीबाबत

संदर्भ :- या कार्यासनाचे पत्र क्र. सेवार्थ २०२३/प्र.क्र.६८/वित्त-५, दि. १५ सप्टेंबर, २०२३.

महोदया,
उपरोक्त विषयान्वये आपणांस कळविण्यात येते की, जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक कर्मचारी वगळून) वेतन देयकांचे प्रदान यापुढे ई-कुबेर प्रणालीव्दारे करावयाचे असल्याने पंचायतराज सेवार्थ टीमने सदर प्रणालीतील कर्मचा-यांची माहिती ई-कुबेर प्रणालीशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यास सुरुवात केलेली आहे.

हेही वाचाल 

शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएमपी (Cash Management project)/ ई- कुबेर (E-Kuber) प्रणालीमार्फत द्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत.महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः वेतन-१२२१/प्र.क्र.३५/टिएनटी - ३ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२तारीखः ४ जानेवारी, २०२४.  वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा


२. याबाबत पंचायतराज सेवार्थ टीमने ई-टेस्टींगसाठी फाईल आपणाकडे पाठविली असून यासोबत मॅपिंगसाठी व बीम्स इंटीग्रेशन मध्ये कोणते अपडेट करण्याची आवश्यकता आहे याची माहिती आपले स्तरावरुन देणे आवश्यक आहे.

३. पंचायतराज सेवार्थ प्रणाली ही ई-कुबेर प्रणालीशी संलग्न करण्यासाठी व वरील सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने सदर बाबींची पुर्तता होईपर्यंत पंचायतराज सेवार्थ प्रणाली मार्फत होणारी जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक कर्मचारी वगळून) वेतन देयके ही प्रचलित पध्दतीनेच स्वीकारण्याच्या सूचना सर्व जिल्हा कोषागार अधिका-यांना आपले स्तरावरुन देण्यास आपणांस विनंती करण्यात येत आहे.

आपला,
(रा.प्र. भोईर)

प्रत माहितीस्तव रवाना:-
उप सचिव तथा सहसंचालक, महाराष्ट्र शासन
१) सहसंचालक (सुधारणा), संचालनालय, लेखा व कोषागारे, ५ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई ४०००३२.
२) मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषदा (सर्व) यांना पुढील कार्यवाहीसाठी.


हेही वाचाल 👇 


शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र राज्य, मध्यवर्तीइमारत, डॉ. अॅनी बेझंट रोड, पुणे-४११ ००१.

दूरध्वनी : (020) 24530396

e-mail: doesecondary1@gmail.com

क्र.शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/वेतन/ई-कुबेर/2021


दिनांक :-०५/०४/२०२४.

05 APR 2024


प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.

२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. सर्व

३) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई. ४) अधीक्षक, वेतन व भनिनि पथक, माध्यमिक, सर्व


विषय- ई-कुबेर प्रणाली कार्यान्वित करणेबाबत.

Regarding implementation of e-Kuber system

संदर्भ- वित्त विभाग संचालनालयालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांचे पत्र क्र. संलेवको/सुधारणा शाखा/ ई-कुबेर/२०२४/११४ दि. १९/०३/२०२४.

उपरोक्त विषयी संदर्भीय पत्र दि. १९/०३/२०२४ चे पत्राची प्रत सोबत जोडली आहे. (प्रत संलग्न)

उपरोक्त विषयास अनुसरून आर्थिक वर्ष सन २०२४-२५ दि. ०१.०४.२०२४ पासून (VPDAS व I-PLA वगळता) पूर्ण

क्षमतेने E-Kuber प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रदानाचे इतर सर्व पर्याय (ECS, NEFT, CMP, CMP Fast Plus etc) आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या प्रदानाकरीता दि. ०१.०४.२०२४ पासून बंद (Deactivate) करण्यात येतील. सबब सर्व कार्यालयांनी E-Kuber प्रणाली दि. १.४.२०२४ पासून पूर्ण क्षमतेने लागू करण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करणेबाबत संदर्भिय पत्रान्वये निर्देश देण्यात आलेले आहे. तरी संदर्भिय पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी.

👇👇👇👇👇

उपरोक्त संदर्भीय परिपत्रक / पत्र वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.

प्रत- 
जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व)
प्रशासन अधिकारी (अंदाज व नियोजन)

प्रत- माहिती व तात्काळ आवश्यक कार्यवाहीसाठी.
श्री. पवन जोशी, बिझनेस अॅनालिस्ट, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई-३२ यांनी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने तात्काळ शालार्थमध्ये आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.

प्रत- माहितीस्तव.
१) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे-१
२) श्रीम. रोहिणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई-३२
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon