DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Vidyarthi Rangotsav Karyakram Link


महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
700, गदानिषपेठ, कुमठेकरमार्ग, पुणे - 411030
जा.क्र.रारीसंप्रप/कलाक्रीडा/रंगोत्सव, समृद्धी कार्यक्रम / गुदत वा/२०२४-२५/०७३८१

दि.३०/१२/२०२४

प्रति,
. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, अगरायती, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, नाशिक, नागपूर. १
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३. शिक्षणाधिकारी (प्राथामिक/माध्यमिक), जि. प. (सर्व)
४. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई.

विषयः -
प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम (सन २०२४-२५) अंतर्गत नोंदणीसाठी दोन दिवस मुदत वाढ (दि.३० डिसेंवर ते ३१ डिसेंबर २०२४) वावत...

संदर्भः
१. मा. राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई यांचे निधी मान्यतेचे कार्यालयीन आदेश जा.क्र. मप्राशिप/सशि/लेखा/Rangotsav/ELE-REC/SCERT/२०२४- २५/२६७६, दि.०६/०९/२०२४.
२. GOI, MOE, Dept. Of School Education & Literacy, Samagra Shiksha PAB Minutes F.No.१०-१/२०२४-IS.१, Dated ५ March २०२४.
३. मा. राष्ट्रीय समन्वयक, कला उत्सव व समृद्धी कार्यक्रम, NCERT NEW DELHI, यांचे पत्र जा.क्र. F.No.१०-१/DEAA/SAMRIDDHI/१८६५, दि. २१ नोव्हेंबर २०२४.
४. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा.क्र. मराशैसंप्रप/कलाक्रीडा/रंगोत्सव-समृद्धीप्रस्ताव/२०२४-२५/०५६६१, दि.०३/१२/२०२४.
५. मा. उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा.क्र.मराशैसंप्रप/कलाक्रीडा/रंगोत्सव, समृद्धी कार्यक्रम/२०२४-२५/०५६६२, दि.०३/१२/२०२४.

उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रांन्वये एन.सी. ई. आर. टी. व एस. सी. ई. आर. टी. यांच्या संयुक्त विद्यमाने रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रम सन २०२४-२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रंगोत्सव कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षक यांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून तब्बल ६३७ एवढ्या प्राथमिक शिक्षक यांनी रंगोत्सव कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. समृद्धी कार्यक्रमासाठी माध्यमिक शिक्षक यांचा साधारण प्रतिसाद लाभला असून तब्बल ७३ एवढ्या माध्यमिक शिक्षक यांनी समृद्धी कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. नाताळ सण, स्नेहसंमेलने, सुट्टीचा कालावधी अनेक शिक्षक यांना सदर कार्यक्रमासाठी नोंदणी करण्यात मर्यादा येत असल्याची सार्वत्रिक भावना होती. तद् नुषंगाने राज्यातील सर्व शिक्षक यांची मुदत वाढ देण्याची आग्रहाची मागणी लक्षात घेता रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रम रान २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत नोंदणी करण्यासाठी दोन दिवस मुदत्त पाव राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, गहाराष्ट्र पुणे च्या वतीने देण्यात येत आहे. ही मुदत वाढ दि. दि.३० डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीसाठी असेल. दोन्ही स्पर्धेत लिंक अपलोड करायची अंतिम मुदत रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत असेल.
त्यानुसार बदललेले वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल व संदर्भीय पत्र क्र. ५ नुसार दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांनी परिक्षणाची कार्यवाही पुढील प्रमाणे करावी.

१. जिल्हा स्तरावर - दि. ०१ जानेवारी २०२५ ते दि. ०३ जानेवारी २०२५ पर्यंत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी रंगोत्सव व समृध्दी कार्यक्रमाचे परीक्षण करावे. यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना राज्यस्तरावरून रंगोत्सव व समृद्धी उपक्रमाच्या प्राप्त व्हिडीओ जिल्हानिहाय वर्गीकरण करून पाठविण्यात येतील. जिल्हास्तरावर जिल्हानिहाय प्राप्त व्हिडीओचे आपले अधिकारी यांचे मार्फत अथवा अन्य शिक्षणतज्ज्ञ परीक्षक यांचे मार्फत परीक्षण करून रंगोत्सव कार्यक्रमाचे *०५० उत्कृष्ट अध्ययन कृतींचा व समृद्धी कार्यक्रमाच्या *०३० उत्कृष्ट अध्ययन कृतींचा समावेश असलेल्या व्हिडीओची लिंक आपल्या विभागातील RAA/ नेमून दिलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना पाठवावेत.

२. विभागस्तरावरः- दि. ०४ जानेवारी २०२५ ते दि. ०७ जानेवारी २०२५ पर्यंत प्रादेशिक विद्या प्राधिकरण व नेमून दिलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी रंगोत्सव व समृध्दी कार्यक्रमाचे परीक्षण करावे. या अंतर्गत राज्यातील प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर, लातूर, नाशिक, पुणे यांनी सदर रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमांतर्गत प्राप्त व्हिडीओचे विभागस्तरावर आपले अधिकारी यांचे मार्फत किंवा आवश्यक असल्यास बाह्य परीक्षक नियुक्त करून परीक्षण करावे आणि रंगोत्सव कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागातून ०३० उत्कृष्ट विद्यार्थी व शिक्षक यांचे संघ आणि समृद्धी कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागातून '१' उत्कृष्ट संघ अशी नामनिर्देशने परिषदेतील कला व क्रीडा विभागाच्या ans.sportsdept@maa.ac.in या ई मेल आयडी वर दि. ०७/०१/२०२५ पर्यंत पाठवावे. (यासंदर्भात सदर कामकाज विषयक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था किंवा प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांना काहीं अडचण आल्यास संबंधित अधिकारी यांनी प्रस्तुत कार्यालयातील अधिकारी सचिन चव्हाण (विभाग प्रमुख, कला व क्रीडा तथा वर्ग १ राजपत्रित अधिकारी) यांचेशी ९६२३०२७४५३ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.)

३. राज्यस्तरावरील कार्यवाही :-
राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERTM) येथे रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत आठ विभागाकडून प्राप्त २४ उत्तम अध्ययन कृतींच्या शिक्षक व विद्यार्थी यांच्या संघांना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येईल. तसेच राज्यस्तरावर SCERTM येथे समृद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावर आठ विभागाकडून प्राप्त ०८ उत्तम अध्ययन कृतींच्या शिक्षक संघांना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येईल. रंगोत्सव व समृद्धी राज्यस्तरावरील कार्यक्रमचे आयोजन दि.११ व दि.१२ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात येईल. रंगोत्सव कार्यक्रम राज्यस्तरापर्यंतच मर्यादित आहे. तथापि समृद्धी कार्यक्रमांतर्गत राज्य स्तरावरील सादरीकरण करणाऱ्या उत्कृष्ट एका संघास राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नामनिर्देशित केले जाईल.

प्राथमिक शिक्षक यांचेसाठी रंगोत्सव आणि माध्यमिक शिक्षक यांचेसाठी हा रामृध्दी आहे. रंगोत्सव अंतर्गत

 २ प्राथमिक शिक्षक (इयत्ता ३ री ते ८ वी) यांनी Art Integrated pedagogy, sport Integrated pedagogy, toy based pedagogy, story telling या पैकी एका विषयायर अध्ययन अध्यापन Video बनवून त्याची ड्राईव्ह लिंक खाली दिलेल्या लिंकवर पेस्ट करायची आहे.

"रंगोत्सव कार्यक्रम लिंक
https://forms.glo/nPiyWRFzD9sBKpWRC

समृध्दी कार्यक्रम अंतर्गत २ माध्यमिक शिक्षक (इयत्ता ९ वी ते १२ वी) यांनी Art integrated pedagogy या विषयावर अध्ययन अध्यापन Video बनवून त्याची ड्राईव्ह लिंक खाली दिलेल्या लिंकवर पेस्ट करायची आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत १ विषय शिक्षक व १ शिक्षक विविध कलांचे अध्यापन करणारे असावेत.

"समृद्धी कार्यक्रम लिंक
https://forms.gle/BLXY२३hUQW३uirNQC

तरी उपरोक्त रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासाठी आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांना व्हिडीओची लिंक वरील प्रमाणे दिलेल्या गुगल लिंक वर अपलोड करणे साठीची मुदत्त वाढ करण्यात आल्या बाबत सूचित करावे.

उपसंचालक कला व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

हे ही वाचाल -

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, 708, सदाशिवपेठ, कुमठेकरमार्ग, 
पुणे


दि. २९/०२/२०२४

जा.क्र.राशैसंप्रप/कलाक्रीडा/रंगोत्सव कार्यक्रम/२०२३-२४/१०५३ प्रति,

१. प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई

२ प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

३. शिक्षणाधिकारी (प्राथ./.), जि. प. (सर्व)

४. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई.

विषयः : प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम सन २०२३-२४ आयोजन करणे बाबत...

संदर्भ: १. PAB Minutes २०२३-२४

२. D.O. No.1-२/२०२२-Sch.3, भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे दि.६ ऑक्टोबर २०२३ चे पत्र प्राप्त दि. १९/१०/२०२३

३. मा. उपसंचालक, कला व क्रीडा विभाग, प्रस्तुत कार्यालय, यांचे पत्र जा.क्र. मराशैसंप्रप/कलाक्रीडा/रंगोत्सव प्रस्ताव/२०२३/४५३३, दि. १४/०९/२०२३

४. मा. राज्य प्रकल्प समन्वयक सहसंचालक (प्रशासन), मप्राशिप, मुंबई यांचे पत्र जा.क्र.मप्राशिप/सशि/रंगोत्सव/का अ/२०२३-२४/३२४८,दि.०५/१२/२०२३

उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रानुसार, रंगोत्सव कार्यक्रमात, सादरीकरण करण्याच्या दृष्टीने शाळांतील इयत्ता ३री ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी/शिक्षकांसाठी राज्यस्तरावरील रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अनुभवात्मक शिक्षणामुळे शालेय वि
द्यार्थ्यांमध्ये सहयोग, स्वयं-पुढाकार, स्वयं-दिशा, स्वयं-शिस्त, संघ भावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

सदर रंगोत्सव कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी खुला आहे. रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत शाळांनी Arts Integration, Sports Integration, Toy Based Pedagogy, Story Telling या चार मुद्द्यांच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन-अध्यापन करतांना विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडीओ लिंकमध्ये माहिती भरून अपलोड करावयाचे आहेत.



राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई आणि प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांनी आपल्या जिल्ह्यात शिक्षणाधिकारी (प्राथ.) व शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांचे सहकार्याने सर्व शाळांना याबाबतचे परिपत्रक काढून

परिषदेकडील पत्रात दिलेल्या लिंकवर नोंदणी करणे आणि व्हिडीओची लिंक पेस्ट करणे याबाबत

सूचित करावयाचे आहे. दि. ७ मार्च २०२४ ही जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम तारीख आहे. आपल्या जिल्ह्यांतील शाळांच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार उपरोक्त लिकमध्ये माहिती भरून वरील ४ प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या एक किंवा प्रत्येक प्रकारातील एक या प्रमाणे व्हिडीओची लिंक दि. ७ मार्च २०२४ पर्यंत लिंकवर पेस्ट करणे हे

करणे अपेक्षित आहे. तदनंतर लिंकवर प्राप्त व्हिडीओचे परीक्षण करण्यासाठी राज्यस्तरावर ३ परीक्षकांची एक

समिती गठीत करून उत्कृष्ठ व्हिडीओंची निवड करण्यात येऊन दि. १८ व १९ मार्च रोजी

राज्यस्तरावर प्रत्यक्ष सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाईल.

राज्यस्तरावर प्रथम प्रत्येक प्रकारातील एका गटास, विविध उत्कृष्ट कृती पैकी उत्तम सादरीकरण, उत्तम परिणामकारकता, गटातील एकसंघ भावना इत्यादी करिता प्रमाणपत्र देण्यात येतील तसेच सर्व सहभागी गटांना प्रमाणपत्रे दिली जातील. राज्यस्तरावर उपस्थित राहणाऱ्या

संघांना प्रवासभत्ता, निवास व भोजन याची व्यवस्था परिषदेतर्फे करण्यात येईल. यासाठी आपल्या अधिनस्त सर्व कार्यालये व शाळांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात

यावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील असे पाहावे. रंगोत्सव कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व्हिडीओ राज्यस्तरावरून दिलेल्या लिंकवर पेस्ट

करणेसंबंधित मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी. सोबत- १. मार्गदर्शक सूचना

मा. संचालकांच्या मान्यतेनुसार

(डॉ. माधुरी सावरकर)
उपसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, 
पुणे ३०

विषयः : प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम सन २०२३-२४ आयोजन करणे बाबत...
परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध 

प्रत माहितीस्तव सविनय सादर:-

मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे १
मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon