DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Shikshak shikshakektar samayojan GR

Shikshak shikshakektar samayojan GR 


 Adjustment of Additional Teaching Non Teaching Staff Shikshak shikshakektar samayojan

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक. एसएसएन-२०१७/प्र.क्र.२२/१७ टिएनटी-२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक:- १५ मार्च, २०२४

वाचा :- १) शासन परिपत्रक क्रमांक व्हिएलएस-१४१२/(३६९/१२१/प्राशि-३. दि.०४ डिसेंबर, २०१२.

२) शासन परिपत्रक क्रमांक एसएसएन-२०१४/प्र.क्र.१५/१४/टीएनटी-२. दि.२८ नोव्हेंबर, २०१४.

३) शासन परिपत्रक क्रमांक एसएसएन-२०१६/प्र.क्र.४७/१६/टीएनटी-२, दि.०२ ऑगस्ट, २०१६.

४) शासन निर्णय क्रमाक एसएसएन-२०१७/प्र.क्र.(२२/१७)/ टीएनटी-२, दि.०४ ऑक्टोंबर, २०१७,

५) शासन निर्णय क्रमांक एसएसएन -२०१९/प्र.क्र.१११/१९/टीएनटी-२, दि.१२ डिसेंबर, २०२२

प्रस्तावना :-
राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची कार्यपध्दती दिनांक ४ डिसेंबर, २०१२ व दिनांक २८ नोव्हेंबर, २०१४ च्या परिपत्रकान्वये निश्चित करण्यात आली आहे. तसेच, शासन निर्णय दि.०२.०८.२०१६ व दि.०४.१०.२०१७ अन्वये सुधारित कार्यपध्दती ठरविण्यात आली आहे. सदरहू शासन निर्णयातील तरतूदी व महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ नियम २६ अन्वये बिंदुनामावलीनुसार व विषय साधर्म्यानुसार अन्य शाळेतील रिक्त पदावर करण्यात येत आहे.

राज्यामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग, नगर विकास विभाग या चार विभागामार्फत राज्यात आजमितीस १,२०,३४५ शाळा चालविल्या जातात, त्यामध्ये खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थ सहाय्यीत शाळा तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असे राज्य शासनाकडून या शाळांना अनुदान प्रकार/व्यवस्थापन प्रकारानुसार विभाजित केले आहे.

शाळा व्यवस्थापन प्रकार, नियुक्ती प्राधिकारी, अनुदान प्रकार या तिन्ही मुख्य प्रकारासोबतच शाळा व शिक्षकांचे उपरोक्त उपप्रकार आहेत. या उपप्रकारांचा विबार करतांना समायोजनाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार समायोजनामध्ये स्तरीय अडथळे येत असल्यामुळे अतिरिक्त असणाऱ्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करताना अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे समायोजना करीता विहीत कालमर्यादेची तरतुद सध्या अस्तित्वात नसल्याने अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजनास होणाऱ्या विलंबामुळे विनाकारण विनाकाम आर्थिक भार शासनास सहन करावा लागतो. त्यामुळे राज्यातील खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रीयेतील अडथळे दुर करुन त्यामध्ये सुसुत्रता आणण्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेले सर्व शासन निर्णयाचे एकत्रिकरण करुन समायोजनाच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्याची बाब शासनस्तरावर विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली (DISE) च्या अनुषंगाने राज्यात शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण पुरेसे आहे. तथापि, संचमान्यता/पटपडताळणीमुळे विद्यार्थी संख्या कमी होणे किंवा वर्ग/तुकड्या बंद पडणे, शाळेची मान्यता काढून घेणे या कारणास्तव जे शिक्षक अतिरिक्त ठरत असतील, अशा शिक्षकांचे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती नियमावली), १९८१ मधील नियम २६ अनुसार अनुदानित खाजगी प्राथमिक/ उच्च प्राथमिक / माध्यमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे त्वरीत अन्य ठिकाणी समायोजन होणे अनिवार्य आहे. त्यानुसार राज्यातील खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेतील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करताना यापुढे खालील कार्यपध्दतीचे अनुपालन करण्यात यावे.

२.समायोजनाची कार्यपध्दती :-

१) शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार सर्वप्रथम नियुक्ती प्राधिकारी यांनी दरवर्षी माहे सप्टेंबर, ३० अखेरचा पट (आधार वैधता) विचारात घेऊन संच मान्यता १५ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावी. आपल्या सर्व शाळांमधील रिक्त

२) दरवर्षी १६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नियुक्ती प्राधिकारी यांनी पदांची यादी व अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांची यादी संकेत स्थळावर प्रकाशित करावी. नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर अंतर्गत रिक्त पदावर अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्याऱ्यांचे समायोजन करावे. तद्नंतर रिक्त पदांची/अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी (असल्यास) यांची यादी विहीत नमुन्यात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / उपसंचालक यांच्याकडे ३१ ऑक्टोबर पूर्वी सादर करावी.

३) शिक्षणाधिकारी (जिल्हा परिषद) प्राथमिक/माध्यमिक यांनी जिल्हास्तरावर अनुदान प्रकार (अनुदानित/अंशतः अनुदानित) व व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन १५ नोव्हेंबर पूर्वी पूर्ण करावे.

४) वरील ३ नुसार समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा/अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी (असल्यास) यांची यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास १५ नोव्हेंबर पर्यंत सादर करावी.

५) विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन ३० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावे व उर्वरित रिक्त पदांचा तपशील/अतिरिक्त कर्मचारी यांची यादी संचालक (प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक) याच्याकडे १ डिसेंबर पूर्वी सादर करावी. पुढे अधिक वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी सदर शासन निर्णय उपलब्ध कार्यवाही विहीत कालमर्यादेत पार पाडणे बंधनकारक असेल.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या


या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०३१५१७२५२३७१२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने सांक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

TUSHAR VASANT MAHAJAN

(तुषार महाजन) उप सचिव, महाराष्ट्र शासन.
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon