DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Shikshak Durgam Bhagat Badli Nadene GR

Shikshak Durgam Bhagat Badli Nadene GR

Zilla Parishad Mahila shikshika Durgam Bhagat Niyukti Badli Nadene

जिल्हा परिषदेमधील महिला शिक्षकांना दुर्गम व अतिदुर्गम भागामध्ये नियुक्ती न देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : आंजिब-४६१७/प्र.क्र.५६७/आस्था-१४ २५- मर्झबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट, मंबई-४०० ००१, दिनांक : १५ फेब्रुवारी, २०१८

प्रस्तावना-

     राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या शाळांवर केली जाते. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अशा शिक्षकांच्या वेळोवेळी बदल्या देखील केल्या जातात. मात्र, जिल्हा परिषदेंतर्गत असणाऱ्या काही शाळा दुर्गम व अतिदुर्गम भागात आहेत. काही शाळांच्या ठिकाणी पोहचण्यास पायी दोन दोन तास चालावे लागते. काही शाळांकडे जातांना जंगलातुन वा निर्जन ठिकाणावरुन जावे लागते. काही शाळा ज्या ठिकाणी आहेत तेथील स्थानिक परिस्थितीमुळे शिक्षकांना मुक्काम करणे देखील अडचणीचे होते. ही वस्तुस्थिती असली तरी अशा ठिकाणी पुरुष शिक्षकांबरोबर महिला शिक्षक देखील काम करीत आहेत. वास्तविक एवढ्या लांब पायी चालून वा जंगलातुन निर्जन ठिकाणावरुन चालणे महिला शिक्षकांसाठी अत्यंत अवघड आहे. या सर्व बाबी विचारात घेता जिल्हा परिषदे अंतर्गत महिला शिक्षकांसाठी स्थानिक परिस्थिती प्रतिकुल असलेल्या शाळांमध्ये दुर्गम अतिदुर्गम भागामध्ये तसेच जाण्या-येण्यासाठी गैरसोईच्या असलेल्या शाळांमध्ये महिला शिक्षकांसाठी नियुक्ती न देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :-

      महिला शिक्षकांना अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये काम करावयास लागू नये म्हणून शासन महिला शिक्षकांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

१) राज्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या ज्या शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आलेल्या आहेत व अशा शाळा ज्या अतिदुर्गम भागात आहेत आणि स्थानिक परिस्थितीमुळे महिला शिक्षकांना काम करण्यास प्रतिकुल अशा अवघड क्षेत्रातील शाळा महिला शिक्षकांसाठी काम करण्यास प्रतिकुल म्हणून घोषित करण्याची कार्यवाही सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी करावी.

शासन निर्णय क्रमांका आंजिब-४६१७/प्र.क्र.५६७/आस्था-१४

२) अशा प्रकारे महिला शिक्षकांना काम करण्यास प्रतिकुल घोषित केलेल्या शाळामध्ये महिला शिक्षकांना प्रशासकीय बदलीने अथवा नियुक्तीने पदस्थापना देण्यात येऊ नये.

३) सध्या अशा जागी काही महिला शिक्षिका कार्यरत असल्यास त्यांनी मे. २०१८ च्या बदली प्रक्रियेत अर्ज करावेत. महिलांसाठी प्रतिकुल म्हणून घोषित केलेल्या शाळेवर सध्या कार्यरत असणाऱ्या महिला शिक्षकांना बदलीचा अधिकार प्राप्त होईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या

संकेतस्थळाला जोडले जाण्यासाठी फक्त ओळीला स्पर्श करा

  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१८०१०९१०४०५७५०२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे,

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रि.शं. कांबळे)

अवर सचिव, 

महाराष्ट्र शासन


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon