Kayam Vina Anudanit Shala Tappa Anudan Dene Circular GR
Kayam Vinaanudanit Naisargik Varg Atirikt Tukdya Tappa Anudan Dene
Government of Maharashtra Directorate of Primary Education Maharashtra State Central Building Dr. Annie Besant Road,
Pune 411001
क.प्राशिसं/खा.प्रा.शा.मु./५०४/2529
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक,
पुणे विभाग,
पुणे
महाराष्ट्र शासन प्रामिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉ. अनी बेझंट मार्ग, पुणे ४११००१.
दिनांकः २६.०३.२०२४
27 MAR 2024
विषय : २० जुलै, २००९ नंतर २३ सप्टेंबर २०२३ अन्वये शिक्षणाधिकारी/प्रशासकीय अधिकारी यांनी दिलेल्या कायम विनाअनुदानित नैसर्गिक वर्ग/अतिरिक्त तुकड्या ग्राह्य धरून टप्पा अनुदान देणे बाबत
संदर्भ :
१) श्री. सुनिल पानसरे, पुणे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समिती, कोल्हापूर यांचे दिनांक ११.०३.२०२४ चे निवेदन.
२) शासनपत्र क्रमांकःप्राशाअ-२०२३/प्र.क्र.१२२/एसएम-४, दि. १२.०२.२०२४
संदर्भ क्रमांक १ च्या पत्रान्वये, शासन निर्णय दिनांक २३.०९.२०२३ नुसार, दिनांक २० जुलै, २००९ नंतर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. पुणे व प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ, मनपा, पुणे यांनी परवानगी दिलेल्या कायम विना अनुदानित नैसर्गिक वर्ग/अतिरिक्त तुकड्या मान्य करून त्यावर असणाऱ्या शिक्षक पदांना अनुदान देण्याची विनंती श्री. सुनिल पानसरे, पुणे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समिती, कोल्हापूर यांनी त्यांच्या दिनांक ११.०३.२०२४ च्या निवेदनाद्वारे केली आहे.
संदर्भ क्रमांक २ अन्वये, शासन निर्णय दि. २३.०९.२००३ अन्वये, इ. २ री ते ७ वी पर्यंतचे नसर्गिक वाढीचे वर्ग तसेच अतिरिक्त तुकड्या मंजूर करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना प्रदान करण्यात आले होते. सदर अधिकार शासन निर्णय दि. २८.०८.२०१५ नुसार काढून घेण्यात आले आहेत. परंतु, शासन निर्णय दिनांक २८.०८.२०१५ पूर्वी नैसर्गिक तत्वावर मान्यता दिलेल्या तुकड्यांना अधिकृत धरणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. ज्या शाळा शासन निर्णय दि. ६.०२.२०२३ अन्वये २० टक्के अनुदानास पात्र करण्यात आल्या आहेत त्या शाळांना उक्त शासन निर्णयातील तरतूदीनुसार अनुदान वितरणावावत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक
(प्राथमिक),
महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीस्तव :
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. पुणे
२) प्रशासकीय अधिकारी, शिक्षण मंडळ, मनपा, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर :
१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे. .
२ श्री. प्रमोद कदम, कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, पुणे
प्रत : श्री. सुनिल पानसरे, पुणे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा, कृती समिती, कोल्हापूर.
⏬⏬⏬⏬⏬⏬
उपरोक्त परिपत्रक पीडीएफ मध्ये डाउनलोड हवे असल्यास खालील दिलेल्या लिंकला स्पर्श करा
👁️👁️😀📂👉 लिंक
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon