DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Employee suspended in Violation of CoC

Employee suspended Violation of CoC

परिषद जिल्हा नांदेड

गटशिक्षणाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग पंचायत समिती,

• जि.प. हायस्कूलच्या पाठीमागे गट साधन केंद्र, लोहा

जाक्र/पसलो/गशिअ/विधानसभा कॅप्म/1970/2024 गटशिक्षणाधिकारी कार्यालय लोहा

दिनांक :- 20/10/2024.

कारणे दाखवा नोटीस 

प्रति, 

श्री. रुस्तुम दासु राठोड, (स.शि.) जि.प.प्रा.शा. नंदु तांडा तालुका - लोहा.


विषय :- विधानसभा निवडणूक 2024 लोहा/कंधार अचार संहितेचा भंग केले बाबत. 

संदर्भ :- 1. मा. निवडणुक निर्णय अधिकारी 88 लोहा विधानसभा मतदारसंघ यांचा दुरध्वनी संदेश

दिनांक 20/10/2024. 2. मा. तहसिलदार, तहसिल कार्यालय, लोहा यांचा दुरध्वनी संदेश दिनांक 20/10/2024.

आपणास सूचित करण्यात येते की, विधानसभा निवडणूक 2024 संदर्भान आचार संहिता लागु झाली आहे. सदर आचार संहितेचे काळात कोणत्याही पदाधिका-याचा किंवा पक्षाचा प्राचार करणे किंवा त्यांचा सत्कार करणे हा आचार संहिता संहितेचा भंग आहे.

दिनांक १९/१०/२०२४ रोजी नांदेड येथे एका राष्ट्रीय पक्ष्याचा कार्यक्रमात खासदार व आमदारांना शुभेछा देताना आपला फोटो वायरल झाला आहे. एका राष्ट्रीय पक्ष्याचा कार्यक्रमात खासदार व आमदारांना शुभेछा देताना आचार संहितेचा भंग केल्याचे निदर्शनास येत आहे. तरी आचार संहितेचा भंग केल्यामुळे आपल्यावर प्रशासकिय कारवाई का अनुसरण्यात येवु नये

याबाबताचा खुलासा उदया दिनांक 21/10/2024 रोजी माझ्या समक्ष सादर करावा. खुलासा असमाधानकारक असल्यास किंवा अप्राप्त असल्यास आपले काही म्हणणे नाही असे समजुन आपला शिस्तभंगाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल यांची गांर्भीयाने नोंद घ्यावी.

गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, लोहा


प्रतिलिपी :-

1. मा. शिक्षणाधिकारी (प्रा) जि.प. नांदेड यांना माहिती स्तव सविनय सादर.

2. मा. तहसिलदार, तहसील कार्यालय, लोहा यांना माहिती स्तव सविनय सादर.

3. मा. गटविकास अधिकारी वर्ग-1 पं.स. लोहा यांना माहिती स्तव सविनय सादर.

गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, लोहा


हेही वाचाल 

Employee suspended in case of violation of code of conduct 

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद नांदेड.

दुरध्वनीः ०२४६२-२३४६६ फॅक्स ०२४६२-२३४६६८

ई-मेल zpnanded@gmail.com

dyceogadzpnanded@gmail.com

वेब साईड-www.zpnanded.in

जा.क्र. /जिपनां/साप्रवि/आस्था-२/1785/२०२४


दिनांक २८/०३/२०२४


वाचा :-

१. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४.

२. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६७.

३. महाराष्ट्र नागरी सेवा (स्वियेतर सेवा, निलंबन, बडतर्फी, यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१.

४. सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ ची आदर्श आचारसंहिता दिनांक. १६.०३.२०२४.

५. गट विकास अधिकारी, पंचायत समिती नायगांव यांचा अहवाल दिनांक. २८.०३.२०२४.


आदेश

ज्याअर्थी संदर्भ क्रं. ४ नुसार, नांदेड जिल्हयामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ ची आदर्श आचारसंहिता दिनांक. १६.०३.२०२४ पासुन लागु झालेली असुन, संदर्भ क्रं. ०५ अन्वये, श्री. धोटे यु.एस. वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती नायगांव यांनी वॉट्सअॅपव्दारे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावावतचा संदेश देऊन आदर्श आचारसंहितेच्या नियमाचा उल्लघंन केला आहे. यावरुन श्री. धोटे यु.एस. वरिष्ठ सहाय्यक हे महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६७ मधील कलम ३ व ४ चा भंग केल्याचे स्पष्ट होते.


🙋

नक्की वाचा आदर्श आचारसंहिता काय करावे आणि काय करू नये वाचण्यासाठी फक्त ओळीला स्पर्श करा


त्याअर्थी संदर्भ क्रं. १ मधील तरतुदीनसार, श्री. धोटे यु.एस. वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती नायगांव यांना आदेश निर्गमनापासुन जिल्हा परिषद सेवेतुन निलंबित करण्यात येत आहे. निलंबन काळात संबधिताचे मुख्यालय पंचायत समिती माहुर. हे राहील. 1

महाराष्ट्र नागरी सेवा (स्वियेत्तर सेवा, निलंबन, बडतर्फी यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ चे नियम ६८ (एक) (ए) प्रमाणे अर्धवेतनी रजेवर असतांना जेवढे वेतन व भत्ते मिळत होते तेवढा निलंबन भत्ता अनुज्ञेय राहील. निलंबन काळात कोणताही खाजगी व्यवसाय संबधीतास करता येणार नाही तसे निर्दशनास आल्यास त्यांच्या विरुध्द नियमाप्रमाणे वेगळी शिस्तभंगाची कार्यवाही करण्यांत येईल.

स्वाक्षरीत /-

(मिनल करनवाल, भा.प्र.से.)


मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड.


प्रतिलिपी

१. मा. जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांना माहितीस्तव सविनय सादर.

२. मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद नांदेड.

३. गट विकास अधिकारी पंचायत समिती नायगांव/माहुर यांना पुढील कार्यवाहीस्तव.

४. संबंधितास.


मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, करिता.

स्थळ प्रतीवर मा.मु.का.अ. यांचे स्वाक्षरीत असे/-



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon