SSC HSC Board EXAM First priority Paper Checking Exemption from other work to moderator valuer circular
M. S. Board Of Secondary And Higher Secondary Education, Mumbai Divisional Board, Vashi, Navi Mumbai-400 703.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळ, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३.
क्र. मुंविमं/माध्य. गोप/ 4653 वाशी, नवी मुंबई-400703
प्रति,
दिनांक : 22/03/2024
मुख्याध्यापक,
मुंबई विभागीय मंडळ कार्य क्षेत्रातील, सर्व मान्यताप्राप्त माध्य. शाळा.
विषय:- फेब्रु मार्च 2024 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तरपत्रिका संकलनाबाबत...
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, फेब्रु-मार्च-2024 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अंतर्गत आपल्या शाळेतील परीक्षक/नियामक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तरपत्रिकासंकलनाचा दिनांक निहाय तक्ता सर्व नियुक्ती परीक्षक/नियामक यांना देण्यात आलेला आहे.
🙋
हेही वाचा
तथापि आपणास देण्यात आलेल्या दिनांक निहाय तक्यानुसार उत्तरपत्रिका जमा करणे बाबत आपणास सूचित करण्यात येते की, "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निकालाचे काम 45 दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक असल्याने' आपल्या शाळेतील शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीचे काम हे वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने संबंधीत परीक्षक/नियामकांना परीक्षण व नियमन करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे. त्यादरम्यान परीक्षण/नियमनाचे काम बाधीत होईल असे कोणतेही काम संबंधीतांस देण्यात येवू नये.
तसेच सदर परीक्षक/नियामक यांना आपल्या शाळेच्या कामातून तूर्तास शिथिल करण्यात यावे. "आपल्या शाळेतील परीक्षक/नियामक यांच्यामुळे मंडळाच्या निकाल प्रक्रीयेस विलंब झाल्यास शाळा प्रमुख म्हणून सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.
(डॉ सुभाष बोरसे)
विभागीय सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळ, वाशी नवी मुंबई
SSC HSC Board EXAM First priority Paper Checking Exemption from other work to moderator valuer circular
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon